नवोदय परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड २०२२ | navodaya exam 2022 hall ticket download 

How to download navodaya hall ticket download 2022

नवोदय परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड २०२२ | navodaya exam 2022 hall ticket download 

नवोदय हॉल तिकीट डाउनलोड २०२२ | navodaya hall ticket download 2022

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इयत्ता सहावी करता प्रवेश   करिता   जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा JNVST exam  घेतली जाणार आहे या परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे प्रवेश पत्र जवाहर नवोदय विद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहे .  याठिकाणी आपण प्रवेश पत्र डाऊनलोड कसे करायचे याची सविस्तर माहिती घेणार आहोत How to download navodaya hall ticket download 2022

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 6 वी ही दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी 11.30 Am ते 1.30 Pm मध्ये होणार आहे . याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी . 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पत्र डाऊनलोड |  How to download navodaya hall ticket download 2022

प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील माहिती ती आपल्या सोबत असू द्या.

1. विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन नंबर ( जवाहर नवोदय विद्यालय फॉर्म भरल्यानंतर आपल्या समोर विद्यार्थ्याचा  जो एप्लीकेशन फॉर्म जनरेट झाला असेल त्याच्यावर  सुरुवातीला एक रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे . )

2. विद्यार्थ्यांची जन्मतारीख – ( जवाहर नवोदय विद्यालय फॉर्म भरताना जी जन्मतारीख आपण पण दिलेली आहे तीच जन्मतारीख या ठिकाणी आवश्यक आहे.) 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची वेबसाईट 

To download navodaya hall ticket 2022 website

या ठिकाणी खालील लिंक वर क्लिक करून आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याच्या लॉगिन पेज वर जाऊ  शकता . 

https://cbseitms.nic.in/(X(1)S(me5iyiwscwkahby4y5ehzqvv))/AdminCard/AdminCard

 आपणास देखील आवडेल 

जवाहर नवोदय विद्यालय सराव प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी 

 येथे क्लिक करा

 लॉगिन पेज वर गेल्यानंतर आपल्या समोर अशाप्रकारे स्क्रीन दिसेल . 

यामध्ये विद्यार्थ्यांचा रजिस्ट्रेशन नंबर व जन्मतारीख निवडून खाली असलेला कॅपच्या कोड मध्ये बेरीज वजाबाकी याचे उत्तर लिहावे

 व साइन इन sign in  हे बटन प्रेस करावे . 

 आपली माहिती बरोबर असल्यास आपल्यासमोर प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची लिंक उपलब्ध होईल .

आपण त्यावर क्लिक करून आपल्या विद्यार्थ्यांचे  जवाहर नवोदय विद्यालय  प्रवेश पत्र  डाउनलोड प्रिंट  करू शकता .

कपाळफोडी रानभाजी माहिती व रेसिपी | kapalphodi ranbhaji recipe in marathi

कपाळफोडी रानभाजी माहिती व रेसिपी | kapalphodi ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव –Physalis Pubescens

कुळ -सॅपिडिएसी

उपयुक्त भाग –  पाने

स्थानिक नाव –फोफांडा

कालावधी  – वार्षिक (वेलवर्गीय फुले: ऑक्टोंबर डिसेंबर)

पाककला

साहित्य – कपाळफोडीची पाने, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर

कृती

> कपाळफोडीची पाने स्वच्छ धुऊन चिरुन घ्यावीत.

> एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व चिरलेली भाजी उकळुन घ्यावी.

> नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे.

> नंतर एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर तळून घ्यावे.

> नंतर त्यामध्ये भाजी टाकुन मंद गॅसवर शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजी तयार होईल.

पानांचा ओवा रानभाजी माहिती व रेसिपी | Ova ranbhaji recipe in marathi

पानांचा ओवा रानभाजी माहिती व रेसिपी | Ova ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव -Plectranthus amboinicus.

इंग्रजी नाव – Aromatic Coleus

उपयुक्त भाग  -पाने

Ova ranbhaji recipe in marathi

साहित्य – पानाचा ओवा पाने, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर कृती

> एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व खुडलेली भाजी उकळुन घ्यावे.

> नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे.

> नंतर एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर तळून घ्यावे.

> नंतर त्यामध्ये भाजी टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजी तयार होईल. 

केना रानभाजी माहिती व रेसिपी | Kena ranbhaji recipe in marathi

केना रानभाजी माहिती व रेसिपी | Kena ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव – Commelina Benghalensis

कुळ –कॉमिलीनिएसी

स्थानिक नाव – केना

उपयुक्त भाग – पाने

कालावधी –पावसाळा

पाककला

केनाचे वडे Kena ranbhaji recipe in marathi

साहित्य – केना. तांदळाचे पिठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर

कृती

● एक पातेले घेउन त्यात कापलेली केना भाजी घेऊन त्यात तांदळाचे पिठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर टाकुन व आवश्यकतेनुसार पाणी टाकुन मळून घ्यावे.

> नंतर एक कढई घेउन त्यात तेल गरम करून त्यात वरील मिश्रणाचे वडे बनवून लालसर होईपर्यंत

तळून घ्यावे.

★ अशा प्रकारे आपल्या आवडीची वडे तयार होतील.

केनाचे थालीपिठ

साहित्य – केना, तांदळाचे पिठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथबीर, ओवा, तीळ, कृती

> एक पातेले घेऊन त्यात कापलेली केना भाजी घेऊन त्यात तांदळाचे पिठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर, ओवा, तीळ टाकुन व आवश्यकतेनुसार पाणी टाकुन पातळ मिश्रण करावे.

> नंतर गॅसवर तवा गरम करून त्यावर चमच तेल टाकुन त्यावर वरील मिश्रण टाकुन वर्तुळाकृती पसरवावे व त्याला झाकुन घ्यावे.

> काही वेळानंतर झाकणी काढून त्याला पलटवून पुन्हा एक चमच तेल टाकुन शिजवावे.

● अशा प्रकारे आपल्या आवडीची केनाचे थालीपीठ तयार होतील.

अळू रानभाजी माहिती व रेसिपी | Alu ranbhaji recipe in marathi

अळू रानभाजी माहिती व रेसिपी | Alu ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव –Colocasia esculenta 

कुळ –Araceae

स्थानिक नाव – आरवी, घोपा

पाककला

अळूची पानांची वडी Alu ranbhaji recipe in marathi alu vadi

साहित्य- अळुची पाने. वेसन, तेल, तिखट, मीठ, हळद, कृती –

> सर्वात प्रथम बेसन गव्हाच्या पिठाप्रमाणे मळुन घ्यावे.

> त्यामध्ये चवीनुसार तिखट, मिठ, हळद मिसळून घ्यावे.

> मळलेले बेसन पीठ अळूच्या प्रत्येक पानावर पसरवुन त्वरित अळूची पाने एकावर एक ठेऊन

गुंडाळून घ्यावे. 

> नंतर आळुच्या पानाच्या गुंडाळ्या वाफेवर शिजवून घ्यावे.

> नंतर त्याचे बारीक तुकडे किवा वडया करून तव्यावर तेलात टाकुन तळून घ्यावे.

> अशा प्रकारे अळुच्या पानांची स्वादवडी तयार होईल.

अळुची पानांची भाजी

साहित्य-अळुची पाने, बेसन, तेल, जिरा, तिखट, मीठ, हळद, मिरची, बारीक चिरलेला कांदा, कोथींबीर कृती –

> सर्वात प्रथम वेसन गव्हाच्या पिठाप्रमाणे मळून घ्यावे.

> त्यामध्ये एक चमचा हळद व एक चमचा मिठ मिसळुन घ्यावे.

> मळलेले बेसन पीठ अळूच्या पानावर पसरवुन त्वरित अळूची पाने गुंडाळून घ्यावे.

> नंतर आळुच्या पानाच्या गुंडाळ्या वाफेवर शिजवून नंतर तेलामध्ये तळून घ्यावे.

> नंतर त्याचे वारीक तुकडे करुन घ्यावे.

→ नंतर भाजी करण्यासाठी एक पातेले घेऊन त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढे तेल, जिरा, तिखट, गरम मसाला, कांदा टाकून तळून घ्यावे नंतर त्यामध्ये आळूची तुकडे किंवा वड्या टाकुन शिजवुन घ्यावे. अशा प्रकारे अळूच्या पानांची भाजी तयार

शेवगा रानभाजी माहिती व रेसिपी |Shevaga ranbhaji recipe in marathi

शेवगा रानभाजी माहिती व रेसिपी |Shevaga ranbhaji recipe in marathi

शेवगा –

शास्त्रीय नाव -Moringa oleifera

उपयुक्त भाग – पाने, शेंगा, फुले, मुळ

कुळ –  मारिगेएसी

कालावधी – वार्षिक (वृक्ष) बहार – जानेवारी ते एप्रिल

पाककला

शेवगा पराठा Shevaga ranbhaji recipe in marathi

साहित्य – शेवग्याची कोवळी पाने साधारण दहा, तांदळाचे पीठ चार कप, तिखट, मीठ, हळद,

कृती

> शेवग्याची पाने कोवळी घ्यावे

> नंतर त्यात ४ कप तांदळाचे पीठ घ्यावे.

> नंतर एका वाट्यात पीठ व पाणी घेऊन त्यात अर्धा ग्लास पाणी मिसळून ते पीठ मळून घ्यावे व त्यात तिखट, मीठ, व हळद मिसळून घ्यावे.

> नंतर त्याचे पराठ्याची आकारानुसार जाड पोळी तयार करून तव्यावर पूर्ण शिजेपर्यंत काळपट होईपर्यंत शिजवून घ्यावे. अशा प्रकारे सुंदर चविष्ट पराठे तयार करावेत.

शेवगा भाजी

साहित्य-अर्धा किलो शेवगा शेंगा, चिरलेला बारीक कांदा, लसुन पाकळ्या, मटन मसाला, हळद, मीठ, गोडा मसाला, तेल, टमाटर

कृती

•● प्रथम शेंगाचे टरफल शिलुन घ्यावे व आतील कोवळा भाग काढून घ्यावा व त्याचे दोन तुकडे करावे. आकाराचे

→ नंतर गॅसवर एका पातेल्यात तेलात कांदा व लसुन टाकावे.

> नंतर वाटलेला मटन मसाला, हळद, मीठ, गोडा मसाला, टमाटर, टाकून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावे.

> नंतर त्यात कापलेला शेंगा टाकुन शिजेपर्यंत ढवळत राहावे साधारण 20 ते 25 मिनिटे नंतर भाजी बघावी शेंगा हाताने दाबल्यास मऊ लागतात. अशाप्रकारे स्वादिष्ट व रुचकर शेवगा शेंगा भाजी बनवावी,

पाथरी रानभाजी माहिती व रेसिपी |Pathari ranbhaji recipe in marathi

पाथरी रानभाजी माहिती व रेसिपी |Pathari ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव – Launea procumbens 

उपयुक्त भाग – पाने

कुळ – अ‍ॅस्टरोएसी

कालावधी  –वर्षभर (फुले : नोव्हेंबर – डिसेंबर)

पाककला –

पातुर ची भाजी

साहित्य- पाथरीची चिरलेली भाजी, ताक, मीठ, हिरवी मिरची, लाल मिरची, साखर, चणाडाळ, शेंगदाणे, बेसन, तेल, मेथी, मोहरी, हिंग, हळद, जिरे इ.

कृती –

> पाथरीची चिरलेली भाजी उकडून घ्यावी व पाणी टाकून द्यावे.

> डाळ, दाणे, भिजवून तासाभराने दाणे, डाळ वेगवेगळे शिजवावे.

> पाथरीची भाजी शिजवून घ्यावी. तेव्हाच मीठ, साखर, बेसन व ताक घालुन एकजीव करावे.

> डाळ, दाणे घालावे. फोडणीत दोन्ही मिरच्या व इतर साहित्य घालुन त्यात एकजीव केलेली भाजी

ओतावी व ढवळत राहून उकळावे.

> ताकाऐवजी चिंचेचा कोळ व गुळ घालुनही भाजी करता येईल.

आंबुशी रानभाजी माहिती व रेसिपी | Ambushi ranbhaji recipe in marathi

आंबुशी रानभाजी माहिती व रेसिपी | Ambushi ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव – Oxalis Corniculata

इंग्रजी नाव – Indian Sorrel

कुळ – Oxalidaceae

स्थानिक नाव – आंबुटी, आंबाती आंबटी, भुईपर्पटी इ.

पाककला : Ambushi ranbhaji recipe in marathi

साहित्य-आंबुशीची पाने, तुरडाळ (किंवा मुग, मसुरडाळ), दाणेकुट, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, तेल, डाळीचे पीठ, लसुन पाकळ्या, मोहरी, हिंग, हळद, गुळ इ.

कृती –

> तेलाच्या फोडणीत लसून परतुन घेणे

> आंबुशची भाजी व डाळ कुकुरमध्ये शिजवून, घोटून त्यात डाळीचे पीठ लावावे.

> फोडणीत भाजी घालावी. वाटलेली मिरची पेस्ट, मीठ, दाणेकुट व गुळ घालुन शिजवावी.

आंबुशी

शास्त्रीय नाव – Oxalis Corniculata

इंग्रजी नाव – Indian Sorrel

कुळ – Oxalidaceae

स्थानिक नाव – आंबुटी, आंबाती आंबटी, भुईपर्पटी इ.

पाककला :

साहित्य-आंबुशीची पाने, तुरडाळ (किंवा मुग, मसुरडाळ), दाणेकुट, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, तेल, डाळीचे पीठ, लसुन पाकळ्या, मोहरी, हिंग, हळद, गुळ इ.

कृती –

> तेलाच्या फोडणीत लसून परतुन घेणे

> आंबुशची भाजी व डाळ कुकुरमध्ये शिजवून, घोटून त्यात डाळीचे पीठ लावावे.

> फोडणीत भाजी घालावी. वाटलेली मिरची पेस्ट, मीठ, दाणेकुट व गुळ घालुन शिजवावी.

कुडा रानभाजी माहिती व रेसिपी | Kuda ranbhaji recipe in marathi

कुडा रानभाजी माहिती व रेसिपी | Kuda ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव  – Holarrhena pubescens

इंग्रजी नाव –  Konesi Bark Tree

स्थानिक नाव –  पांढरा कुडा

कुळ- Apocynaceae

पाककला

कुडा फुले भाजी Kuda ranbhaji recipe in marathi

साहित्य – कुडा फुले, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर

कृती –

> एक पातेले घेउन त्यात एक ग्लास पाणी व कुडाची फुले उकळुन घ्यावे.

> नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे.

> नंतर एक पातेले घेउन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद तळून घ्यावे.

> नंतर त्यामध्ये अकळलेले कुडाची फुले टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची कुडाची फुलेची भाजी तयार होईल.

टाकळा रानभाजी माहिती व रेसिपी | Takala ranbhaji recipe in marathi

टाकळा रानभाजी माहिती व रेसिपी | Takala ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव – Cassia Tora

कुळ – Caesalpinaceae

इंग्रजी नाव – Foetid Cassia

स्थानिक नाव – तरोटा, तरवटा

उपयुक्त भाग – पाने

आढळ – चंद्रपूर, मुल, सावली, भद्रावती, चिमूर, नागभिड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा

पाककला

तरोटा भाजी Takala ranbhaji recipe in marathi

साहित्य – तरोटा/टाकळयाची भाजी, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद,

टमाटर, कोथींबीर

कृती –

● एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व खुडलेली भाजी उकळुन घ्यावे.

→ नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे.

> नंतर एक पातेले घेउन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर तळून घ्यावे.

> नंतर त्यामध्ये भाजी टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजी तयार होईल.

> मेथीच्या भाजीसारखीच टाकळ्याची भाजी करतात किंवा आपल्या आवडीनुसार भाजी बनवू शकता.

> हि औषधी तणभाजी असल्याने त्यात साधे मसाले (हिरवी मिरची, तेल, मिठ) घालून भाजी बनवावी.