टाकळा रानभाजी माहिती व रेसिपी | Takala ranbhaji recipe in marathi

टाकळा रानभाजी माहिती व रेसिपी | Takala ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव – Cassia Tora

कुळ – Caesalpinaceae

इंग्रजी नाव – Foetid Cassia

स्थानिक नाव – तरोटा, तरवटा

उपयुक्त भाग – पाने

आढळ – चंद्रपूर, मुल, सावली, भद्रावती, चिमूर, नागभिड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा

पाककला

तरोटा भाजी Takala ranbhaji recipe in marathi

साहित्य – तरोटा/टाकळयाची भाजी, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद,

टमाटर, कोथींबीर

कृती –

● एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व खुडलेली भाजी उकळुन घ्यावे.

→ नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे.

> नंतर एक पातेले घेउन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर तळून घ्यावे.

> नंतर त्यामध्ये भाजी टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजी तयार होईल.

> मेथीच्या भाजीसारखीच टाकळ्याची भाजी करतात किंवा आपल्या आवडीनुसार भाजी बनवू शकता.

> हि औषधी तणभाजी असल्याने त्यात साधे मसाले (हिरवी मिरची, तेल, मिठ) घालून भाजी बनवावी.

दिंडा Dinda ranbhaji recipe in marathi

दिंडा Dinda ranbhaji recipe in marathi

स्थानिक नाव – ढोलसमुद्रिका

शास्त्रीय नाव – Leea macrophylla

कुळ – Leeaceae

उपयुक्त भाग – पाने

पाककला

दिंड्याची भाजी Dinda ranbhaji recipe in marathi

साहित्य एक जुडी दिंडे, अर्धा वाटी मोड आलेले वाल, एक कांदा, सहा सलून पाकळ्या, थोडासा गुळ, आमसुल/कोकम, दोन चमचे खिसलेले आले खोबरे, कोथिंबीर, फोडणीला मोहरी, जिरे, हिंग, हळद, मीठ, तेल.

कृती –

> दिंड्याचे देठ शेवग्याच्या शेंगाप्रमाणे दिसेपर्यंत सोला.

> नंतर चिरुन धुऊन घ्या, तेल एका कढईत गरम करुन मोहरी, जिरे व हिंग टाका.

> नंतर त्यात कांदा, लसुन टाका. गुलाबी झाल्यावर त्यात गरम मसाला व चिरलेली भाजी टाका.

> झाकण टाकून मंद आचेवर ठेवा. भाजी शिजल्यावर त्यात गुळ, कोकम, कोथिंबीर व ओले खोबरे, मीठ टाका.

करटोली kartoli ranbhaji information recipe in marathi

करटोली kartoli ranbhaji information recipe in marathi

शास्त्रीय नाव – Momordica dioica

कुळ – Cucurbitaceace

स्थानिक नाव – काटोली, रानकारली, करटोली, काटवल

उपयुक्त भाग – फळ

आढळ : – चंद्रपूर, सावली, मुल, वरोरा, भद्रावती, चिमूर, नागभिड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, राजुरा, जिवती, गोंडपिपरी, पोंभुर्णा

पाककला kartoli ranbhaji recipe in marathi

करटोली/काटवल ची भाजी kartoli ranbhaji information recipe

साहित्य – हिरवी कोवळी करटुली, आले खोबरे अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, हिंग, मोहरी, मीठ, जिरे, हळद, दोन चिरलेल्या मिरच्या, लाल तिखट, साखर तेल इत्यादी.

कृती –

> करटुल्यांचे अर्धभाग करुन त्यातील बिया व गर काढून टाकावा.

> नंतर बटाट्याचे काप केल्याप्रमाणे करटुली चिरुन घ्यावीत.

> पॅनमध्ये तेल गरम करुन हिंग, मोहरी व थोडेसे जिरे टाकून फोडणी घालावी.

> त्यात चिरुन घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकाव्यात.

> नंतर त्यात कांदा, मीठ, थोडेसे लाल तिखट व हळद घालून चांगले परतावे.

> चिरलेली करटुली त्यात घालुन पुन्हा परतावीत. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी.

> नंतर झाकण काढून मंद गॅसवर पाणी न घालता ३ ते ४ मिनिटे भाजी परतावी व नंतर वरुन ओले

खोबरे व थोडी साखर घालावी.

रानभाज्यांची ओळख व पाककृती

मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. आपल्या आहारात भाजी म्हणून खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुले यांचा वापर केला जातो. भारतात भाजीच्या सुमारे ५५ प्रजाती आहेत. अलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी आज अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर शेतकरी करीत आहेत. यामुळे भाजी उत्पादनात भाज्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण त्यांची नैसर्गिक चव, प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे.

भारतातील जंगली आणि पहाडी भागात सुमारे ४२७ आदिवासी जमाती आहेत. पैकी महाराष्ट्रात ४७ जमाती आहेत. जगभरात वनस्पतींच्या ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून भारतीय आदिवासी १५३० पेक्षा अधिक वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात. यात १४५ कंद, ५२१ हिरव्या भाज्या, १०१ फुलभाज्या, ६४७ फळभाज्या, ११८ बियाण्यांच्या व सुकामेव्यांच्या प्रजाती आहेत.

पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात. त्यातील अनेक वनस्पती खाण्याजोग्या असतात. या वनस्पती आदिवासींनी व शेतकऱ्यांनी शोधुन काढल्या आणि अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही. या रानभाज्यांची ओळख आणि त्यांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

रानभाज्यांबाबत शहरातील नागरीकांमध्ये मोठी उत्सुकता असते. या भाज्यांची ओळख आणि त्यांचे गुणधर्म जाणुन घेण्यासाठी या संकेत स्थळावर  सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे . 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२२ | NMMS Exam 2022 information

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२२

सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उदिष्ट आहे.

इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.

1. अर्ज करण्याची पध्दत : दिनांक ०६/०४/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.

२. पात्रता :

(a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटो पूर्ण करणान्या नियमित विद्यार्थी विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

(b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा तलाठयांचा सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षांचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा.

c) विद्यार्थी/ विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा (SC/ST चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

d) खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.

• विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.

केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,

शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.

सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी,

३. विद्यार्थ्यांची निवड :- विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

४. परीक्षेचे वेळापत्रक :- महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक १९ जून २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.विषयाचे नावएकूण गुणएकूण प्रश्नकालावधीवेळपात्रता गुण (एकत्रित)
बौध्दिक क्षमता चाचणी Mental Abilily Test (MAT)९०९०दीड तास (फक्त दृष्टी १०.३० अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ)१०.३० ते १२.००४०%*
विश्रांती १२.३० ते १३.३०
शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test (SAT)९०९०दीड तास (फक्त दृष्टी १०.३० अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ)१३.३० ते १५.००

* सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

५. परीक्षेसाठी विषय :- सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

b) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यतः इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण -३५) ३. गणित (एकूण गुण २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.

> उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल. ३. सामान्य विज्ञान ३५ गुण:- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.

b. समाजशास्त्र ३५ गुण:- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण 

c. गणित २० गुण.

६. माध्यम :- प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून

असतील. (सर्व विद्यार्थ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/ व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

७. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या :- अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. कोटयानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी (अपंगासाठी) प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षणअसेल. जिल्हयासाठीचा कोटा व विद्यार्थ्याच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या प्रदान करण्यात

८. शुल्क:- परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येते.

अ.क्र.तपशीलदिनांकशुल्क रुशाळा संलग्नता फी
1ऑनलाईन नियमित आवेदनपत्रे भरणे०६/०४/२०२२ ते २६/०४/२०२२100संलग्लता फी रु.२००/- प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी
2ऑनलाईन विलंब आवेदनपत्रे भरणे२७/०४/२०२२ ते ०1/०५/२०२२200
3ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे०२/०५/२०२२ ते300
(शाळा/संस्था जबाबदार असेल तर)०6/०५/२०२२४००

९. निकाल घोषित करणे :- सदर परीक्षेचा निकाल साधारण ऑगस्ट २०२२ च्या पहिल्या किया दुसन्या आठवडयात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढावयाचा आहे.

१०. शिष्यवृत्ती दर :- शिष्यवत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ.९ वी ते १२ वी पर्यंत दरमहा रु. १,०००/

( वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते..

> शिष्यवृत्ती प्राप्त विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ. ९ वी व इ. ११ वी मध्ये किमान ५५% गुण मिळणे आवश्यक आहे (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५०% गुणांची आवश्यकता आहे.)

> इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्याथ्र्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)

> सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) यांचे मार्फत केले जाते.

NMMS परीक्षा मागील प्रश्नपत्रिकांसाठी

येथे क्लिक करा

१९. अनधिकृततेबाबत इशारा –

मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवायः अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही, अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही.

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

NMMS परीक्षा २०२२ तारीख जाहिर

nms exam date 2022

महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे.

2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक १९ जून २०२२ रोजी करण्यात येणार आहे. 

NMMS परीक्षा विषय सविस्तर माहितीसाठी 

 येथे  क्लिक  करा

NMMS परीक्षा मागील प्रश्नपत्रिकांसाठी

येथे क्लिक करा

याबाबतचे सविस्तर परिपत्रक 

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

NISHTHA प्रशिक्षण कोर्स क्रं 11 व 12  कोर्स लिंक । NISHTHA Online Training 11 & 12 Course link 

nishtha

NISHTHA प्रशिक्षण कोर्स क्रं 11 व 12  कोर्स लिंक । NISHTHA Online Training 9 to 12 Course link 

दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून NISHTHA निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.

 यापूर्वी आपण निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणाचे  DIKSHA प्लॅटफॉर्म वरील  कोर्स क्रमांक 1 ते 10 पूर्ण  केले असतील .   व त्याचे प्रमाणपत्र देखील मिळवले असेल 

 दिनांक 5 मार्च 2022 पासून  निष्ठा प्रशिक्षण NISHTHA  प्रशिक्षणाचा पुढील भाग  म्हणजेच टप्पा क्रमांक 4  सुरुवात   झाली आहे . आपण वेळेमध्ये या कोर्स मध्ये सहभागी व्हा  व  कोर्सला सुरुवात करावी. जेणेकरून आपणास वेळेमध्ये कोर्स पूर्ण करता येतील. 

 या ठिकाणी आपणास NISHTHA Online Training  कोर्स क्रमांक 11 व 12  यामध्ये जाण्याची डायरेक्ट लिंक देण्यात आलेली आहे .  आपण त्यावर क्लिक करून Open with  दीक्षा ॲप 

 

कोर्स क्रमांक 11 . MH_FLN_MAR_अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन यामध्ये ICTचा समावेश पहा .

मराठी माध्यम – Click Here

कोर्स क्रमांक 12 . पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी शालेय नेतृत्व पायभूत स्तरावर खेळणी आधारित अध्यापनशास्त्र

मराठी माध्यम – Click Here

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

सन 2022 ची उन्हाळी सुट्टी बाबत महत्त्वाचे परिपत्रक

unhali sutti 2022

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इ. १ ली ते ९ वी व  इ. ११ वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबत संदर्भीय शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२२ चीउन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून पुढील प्रमाणे शासन निर्णय / परिपत्रक निर्गमित करण्याबाबत विनंती आहे.

 (१) सोमवार दि. ०२ मे, २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. १२ जून, २०२२ पर्यंत ग्राहय धरण्यात येवून पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये दुसरा सोमवार दि. १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. 

     तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून, २०२२ रोजी सुरू होतील.

२) शाळांतून उन्हाळयाची व दिवाळीची दीर्घ सुटटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी तो समायोजनाने संबंधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्या परवानगीने घ्यावी.

३) माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुटटया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

(४) आगामी शैक्षणिक वर्षापासून यामुळे दरवषी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुस-या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा  दिवस ) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या  सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील. 

आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची सोपी पद्धत

येथे क्लिक करा  

आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे की नाही कसे चेक करावे ?

येथे क्लिक करा  

शासन निर्णय PDF स्वरुपात

पॅन कार्ड ला आधार कार्ड कशाप्रकारे लिंक  करायचे ? How to link aadhar to pan card in marathi

How to link pan card with aadhar card

पॅन कार्ड ला आधार कार्ड कशाप्रकारे लिंक  करायचे ? How to link pan card with aadhar card in marathi

नमस्कार मित्रांनो  आपल्याला आपले पॅन कार्ड आधार कार्ड लिंक how to link pan card with aadhar card  करण्याबाबत  भारत सरकारच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटद्वारे वारंवार सूचना  दिल्या जातात.  आपले पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करण्याची  सोय ऑनलाइन पद्धतीने  आहे.  असे  पॅन कार्ड  आपल्या आधार कार्ड ला कसे लिंक करायचे ? how to link aadhar to pan in marathi या ठिकाणी आपणास अतिशय सोप्या पद्धतीने आपण आपले पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक कसे  करायचे याची माहिती देण्यात आलेली आहे .

 पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याच्या सोप्या पद्धती link pan card with aadhar card Steps

 स्टेप नंबर – 1

 सर्वप्रथम आपल्याला  भारत सरकारच्या इन्कम टॅक्स  वेबसाईटवर जायचे आहे .

https://www.incometax.gov.in/iec/foportal

 स्टेप नंबर – 2

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल

अशा प्रकारे आपल्याला स्क्रीन दिसल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपले पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड लिंक link pan card with aadhar card करण्यासाठी Link Aadhar  या मेनू वर क्लिक करायचे आहे .

 स्टेप नंबर – 3

Link Aadhar या मेनू वर क्लिक केल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल .

  • पहिल्या बॉक्समध्ये आपण  पॅनकार्ड नंबर टाईप करावा 
  •  दुसऱ्या बॉक्समध्ये  आधार कार्ड नंबर टाईप करावा 
  •  तिसऱ्या बॉक्समध्ये  आधार कार्ड वरील नाव टाइप करावे 
  •  चौथ्या बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर टाईप करावा  (यावर आपल्याला ओटीपी येणार आहे .)  तेव्हा मोबाईल नंबर व्यवस्थित टाईप करावा . 
  • आपल्या आधार कार्ड वर फक्त जन्म वर्ष असल्यास चेक बॉक्स वर क्लिक करा अन्यथा चेक बॉक्स वर क्लिक करू नये 
  • I agree चेक बॉक्स वर क्लिक करा.

 स्टेप नंबर – 4

सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आपण माहितीच्या  शेवटी  Link Aadhar या बटणावर क्लिक करा . 

 स्टेप नंबर – 5

 Link Aadhar या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल .व आपल्या मोबाईल वर एक ओटीपी आलेला असेल . 

आपल्या मोबाईल वर आलेला ओटीपी या ठिकाणी एंटर करा 

मोबाईल वरील ओटीपी अचूक नोंदवल्यानंतर आपण Validate बटनावर क्लिक करा

यानंतर काही दिवसातच आपल्या आधार कार्ड व आपले पॅन कार्ड लिंक झाले आहे की नाही  हे  आपण स्टेटस मध्ये चेक करू शकता .

 ऑनलाइन आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे किंवा नाही  कशाप्रकारे चेक  करायचे  यांच्या माहितीसाठी

 येथे क्लिक करा

 मित्रानो निश्चित अशी माहिती आपल्याला आवडले असेल तर आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर या माहितीची लिंक अवश्य शेअर करा.  असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट देत राहा .

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा

शैक्षणिक माहिती अपडेट नियमित मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा 

 येथे क्लिक करा 

 

आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे की नाही कसे चेक करावे ? How to check Pan card link with Aadhar status 

How to check Pan card link with Aadhar status 

आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे की नाही कसे चेक करावे ? How to check Pan card link with Aadhar status 

नमस्कार मित्रांनो  भारत सरकारने  आपल्या पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक pan card aadhar link  करण्याची मुदत 31 मार्च 2022 पर्यंत देण्यात आलेली होती .   या मुदतीमध्ये आपल्याला आपले पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करायचे होते.  आपल्यापैकी अनेक जणांनी यापूर्वीच पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केलेले असेल. परंतु आपणास आपले पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही pan card aadhaar link status check online याची खात्री  हे अतिशय सोप्या पद्धतीने करता येते .  पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही हे  तपासण्याची  माहिती  याठिकाणी देण्यात आलेली आहे.

जर आपण  आपल्या पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केले नसेल तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या पॅन कार्ड ला आधार कार्ड कशा पद्धतीने लिंक करायचे याची माहिती साठी

 येथे क्लिक करा 

      आपण काही  मिनिटांमध्येच  आपले पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही हे तपासू शकता .

pan card aadhaar link status check online 

 स्टेप नंबर – 1

 सर्वप्रथम आपल्याला  भारत सरकारच्या इन्कम टॅक्स  वेबसाईटवर जायचे आहे .

https://www.incometax.gov.in/iec/foportal

 स्टेप नंबर – 2

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल

pan card aadhaar link status check

अशा प्रकारे आपल्याला स्क्रीन दिसल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपले पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड लिंक आहे  की  नाही हे तपासण्यासाठी  Link Aadhar Status  या मेनू वर क्लिक करायचे आहे .

pan card aadhaar link status check

 स्टेप नंबर – 3

Link Aadhar Status या में वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल.

pan card aadhaar link status check

यामध्ये आपल्याला आपला  पॅन कार्ड Pan card आधार नंबर Adhar number  टाईप करायचा आहे.

स्टेप नंबर – 4

आपला पॅन कार्ड आधार नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला या स्क्रिन च्या खाली असणारे  View Link Aadhar Status   या बटणावर क्लिक करायचे आहे .

जर आपल्या आधार कार्ड पॅन कार्ड लिंक असेल तर आपल्याला खालील प्रमाणे स्क्रीन वर मेसेज दिसेल.

pan card aadhaar link status check

अशा पद्धतीने या चार स्टेप मध्ये आपण आपले आधार कार्ड आपल्या पॅन कार्ड ला लिंक आहे  की नाही  याची माहिती घेऊ शकता .

 निश्चित अशी माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण आपल्या ग्रुप वर या माहितीची लिंक अवश्य शेअर करा जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल.

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा

शैक्षणिक माहिती अपडेट नियमित मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा 

 येथे क्लिक करा