♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

करटोली kartoli ranbhaji information recipe in marathi

करटोली kartoli ranbhaji information recipe in marathi

शास्त्रीय नाव – Momordica dioica

कुळ – Cucurbitaceace

स्थानिक नाव – काटोली, रानकारली, करटोली, काटवल

उपयुक्त भाग – फळ

आढळ : – चंद्रपूर, सावली, मुल, वरोरा, भद्रावती, चिमूर, नागभिड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, राजुरा, जिवती, गोंडपिपरी, पोंभुर्णा

पाककला kartoli ranbhaji recipe in marathi

करटोली/काटवल ची भाजी kartoli ranbhaji information recipe

साहित्य – हिरवी कोवळी करटुली, आले खोबरे अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, हिंग, मोहरी, मीठ, जिरे, हळद, दोन चिरलेल्या मिरच्या, लाल तिखट, साखर तेल इत्यादी.

कृती –

> करटुल्यांचे अर्धभाग करुन त्यातील बिया व गर काढून टाकावा.

> नंतर बटाट्याचे काप केल्याप्रमाणे करटुली चिरुन घ्यावीत.

> पॅनमध्ये तेल गरम करुन हिंग, मोहरी व थोडेसे जिरे टाकून फोडणी घालावी.

> त्यात चिरुन घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकाव्यात.

> नंतर त्यात कांदा, मीठ, थोडेसे लाल तिखट व हळद घालून चांगले परतावे.

> चिरलेली करटुली त्यात घालुन पुन्हा परतावीत. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी.

> नंतर झाकण काढून मंद गॅसवर पाणी न घालता ३ ते ४ मिनिटे भाजी परतावी व नंतर वरुन ओले

खोबरे व थोडी साखर घालावी.