राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरांत सुधारणा करणेबाबत. शासन निर्णय दिनांक 20 एप्रिल 2022 

Transport Allowance

 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरांत सुधारणा करणेबाबत. शासन निर्णय दिनांक 20 एप्रिल 2022 

   केंद्र शासनाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अनुषंगाने वरील (८) व (९) येथील अनुक्रमे दि. ०७ जुलै, २०१७ व दि. ०२ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या आदेशान्वये त्यांच्या कर्मचाऱ्याच्या निवासस्थानापासून कर्तव्य स्थानापर्यंतच्या प्रवासावरील खर्चाची भरपाई म्हणून सुधारीत दराने वाहतूक भत्ता (Transport Allowance) मंजूर केलेला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम, २०१९ अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि. ०१ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर केलेल्या वाहतूक भत्त्याच्या दरांत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

शासन असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या वाहतूक भत्त्याचे दर खालील तक्त्यात दर्शविल्या प्रमाणे सुधारण्यात यावेत.

शासन निर्णय क्रमांकः वाहम-२०२०/प्र.क्र.०३/२०२०/सेवा-५

हे आदेश दि.०१.०४.२०२२ पासून अंमलात येतील.

उपरोक्त एस-१ ते एस-६ या वेतन स्तर मधील रु.२४२००/- व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूह मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.२७०० व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.१३५० इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील.

तसेच अंध, अस्थिव्यंगाने अधु आणि कण्याच्या विकाराने पीडीत असणाऱ्या तसेच मुकबधीर / श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सध्या अनुज्ञेय असणाऱ्या वाहतूक भत्त्यामध्ये पुढील प्रमाणे वाढ करण्यात येत आहे.

अंध, अस्थिव्यंगाने अधु आणि कण्याच्या विकाराने पीडीत असणाऱ्या तसेच मुकबधीर / श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या उपरोक्त एस-१ ते एस-६ या वेतन स्तर मधील रु.२४२००/- व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूह मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.५४०० व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.२७०० इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील.

२. या आदेशातील वाहतूक भत्त्याचे प्रदान खाली नमूद केलेल्या अटींच्या अधीन आणि त्यानुसार विनियमित करण्यात येईल.

एक) कर्तव्य स्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

दोन) ज्या कर्मचाऱ्यांना शासकीय वाहतूक सुविधा पुरविण्यात आली आहे. त्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

तसेच वाहतूक भत्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात इतर विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

३. रजा, प्रशिक्षण, दौरा इत्यादी कारणांमुळे संपूर्ण कॅलेंडर महिन्यात अनुपस्थित असल्यास त्या महिन्यात हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

४. शासन असेही आदेश देत आहे की, सर्व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांतील पूर्णकालीक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कृषि व कृषितर विद्यापीठांमधील व तत्संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सदरहू आदेश लागू असतील.

५. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा अधिनियम क्रमांक ५) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार व त्यासंबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करुन शासन असेही आदेश देत आहे की, जिल्हा परिषदांच्या पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना हे आदेश योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात यावेत.

६. शासन असेही आदेश देत आहे की, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनमानानुसार वेतन घेणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांनाही हे आदेश लागू करण्यात यावेत.

७. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यावरील खर्च त्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था, नगरपालिका व जिल्हा परिषदा यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०४२०१२५५१०७२०५ असा आहे.

सदर आदेश पीडीएफ स्वरूपात 

नियमित अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करण्यासाठी

येथे क्लिक करा

100 +प्रगती पुस्तकातील  विशेष प्रगती नोंदी

येथे क्लिक करा

मूल्यमापन वर्गनिहाय नोंदी 

 येथे क्लिक करा 

आधार क्रमांक आधारित संचमान्यतेबाबत शासनिर्णय | Adhar Sanchmanyata 2022

.Adhar Sanchmanyata gr 2022

आधार क्रमांक आधारित संचमान्यतेबाबत…Adhar Sanchmanyata 

 परिपत्रकाची मुद्देसूद माहिती सहज सोप्या पद्धतीने 

        शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार, राज्यातील सर्व शाळांची तात्पुरती (Interim) संचमान्यता दि. ३०/१२/२०२१ रोजीच्या आधार क्रमांक नोंद असलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीस राज्यात आधार क्रमांक असलेली विद्यार्थी संख्या ८७% असून सर्व १००% विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक घेण्यास होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करणे योग्य होईल.

१ . दि. ३०/१२/२०२१ रोजीच्या शाळेच्या पटावर नोंद असलेले परंतु सरल प्रणालीमध्ये आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांचे दि. ३१/०३/२०२२ पर्यंत आधार क्रमांक अपडेट झाल्यानंतर आधार क्रमांक नोंद केलेले विद्यार्थी संच मान्यतेकरीता ग्राहय धरण्यात यावेत.

२. डुप्लीकेट (Duplicate) आधार क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा (data) शाळास्तरावर दुरुस्त करण्याची कार्यवाही करावी व डुप्लीकेट (Duplicate) आधार क्रमांक राहणार नाहीत याची खात्री करावी.

३. नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्याची प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करुन व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संचमान्यतेकरीता ग्राह्य धरण्यात यावेत.

४. ज्या विद्यार्थ्याने आधार क्रमांकासाठी नोंदणी केली आहे परंतु अद्यापपर्यंत आधार क्रमांक मिळालेला नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावेत.

५. ज्या विद्यार्थ्याकडे आधार क्रमांक उपलब्ध नाही व त्याने आधार क्रमांकासाठी नोंदणी देखील केलेली नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावेत..

वरील क्र. १ ते ५ मध्ये दर्शविण्यात आल्यानुसार सर्व शाळांची पडताळणी समितीमार्फत करण्यात यावी. 

६.१ सदर पडताळणीकरीता संपूर्ण राज्यामध्ये पुढीलप्रमाणे पडताळणी समिती असेल.

I. शिक्षण विस्तार अधिकारी संबंधित बीट स्तर [समिती प्रमुख ]

II. केंद्र प्रमुख संबंधित केंद्र/ मनपा, नपा क्षेत्रातील प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य सचिव]

III. अंगणवाडी पर्यवेक्षिका संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य]

IV. आरोग्य कर्मचारी संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य]

६.२ वरील समितीने केंद्रातील प्रत्येक शाळेस समक्ष भेट देवून सर्व विद्यार्थ्यांची खात्री दि. ३१/०३/२०२२ पर्यंत करावी व या पत्रासोबतच्या नमुन्यात प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी / प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी I यांचेकडे सादर करावे. त्याची एक प्रत केंद्र शाळेवर जतन करून ठेवावी.

६.३ सदरील प्रमाणपत्र व विहीत माहिती सरल पोर्टलवरील केंद्र प्रमुख यांच्या लॉगीनवरुन अपलोड/नोंद करण्याची सुविधा देण्यात येईल त्यावेळी अपलोड करावे.

६.४ गटशिक्षणाधिकारी / प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी सरल पोर्टलवर पटाची खात्री दि. ०५/०४/२०२२ पर्यंत अंतिम करावी.

६.५ वरील प्रमाणे सुविधा ही केवळ शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी लागू राहील.

७. संच मान्यता अंतिम झाल्यानंतर प्रचलित शासन निर्णय / परिपत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीने समुपदेशन घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन दि. ३१/०५/२०२२ पूर्वी करावे.

आधार क्रमांक आधारित संचमान्यतेबाबत…Adhar Sanchmanyata  सदर परिपत्रक पीडीएफ स्वरूपात

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

बाल संगोपन रजा | balsangopan raja

राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत.balsangopan raja 

प्रस्तावना:

             राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलाच्या संगोपनासाठी बाल संगोपन रजा मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय वरीलप्रमाणे दिनांक २३.०७.२०१८ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र.१ (XVI) मध्ये नमूद केल्यानुसार, ज्या पुरुष वर्गीय शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणास खिळलेली आहे, अशा पुरुष कर्मचाऱ्यास त्याच्या मुलाच्या बालसंगोपनाच्या प्रयोजनासाठी बाल संगोपन रजा balsangopan raja अनुज्ञेय करण्यासाठी, पत्नीस कोणकोणते आजार असले पाहिजेत, तसेच अशा स्वरुपाचे आजार असल्याबाबत कोणकोणते निकष असावेत, याबाबतचा प्रस्ताव काही काळ, शासनाच्या विचाराधीन होता. सदर प्रकरणी सर्वसाकल्याने विचार करुन, पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

बाल संगोपन शासन निर्णय :

ज्या राज्य शासकीय पुरुष कर्मचारी, जिल्हा परिषदेचे शिक्षक व शिक्षकेतर पुरुष कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कृषि व बिगर कृषि विद्यापीठे व त्यांना संलग्न महाविद्यालयातील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर पुरुष कर्मचारी यांची पत्नी विविध आजारपणाच्या कारणास्तव जेवढ्या कालावधीसाठी अंथरुणास खिळून राहिली आहे (Bed Ridden), अथवा त्यांची पत्नी मनोरुग्ण असल्यामुळे, जेवढ्या कालावधीसाठी बाल संगोपन करण्यास असमर्थ होत आहे (Incapacitated), तेवढ्या कालावधीचे वैद्यकीय अधीक्षक (जे.जे. रुग्णालय)/जिल्हा शल्य चिकित्सक (शहरी भागासाठी)/ जिल्हा आरोग्य अधिकारी (ग्रामीण भागासाठी) यांचेकडून संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर संबंधित शासकीय पुरुष कर्मचाऱ्यास, तेवढ्या कालावधीची बाल संगोपन रजा अनुज्ञेय करण्यास, या शासन निर्णयान्वये मान्यता घेण्यात येते.

२. शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी किती कालावधीसाठी आंतररुग्ण आहे (In-patient) आणि अंथरुणास खिळलेली आहे अथवा बालसंगोपन करण्यास असमर्थ आहे, हे पाहून प्रकरणपरत्त्वे तेवढ्या कालावधीची (१८० दिवसाच्या कमाल मर्यादेत), बाल संगोपन रजा संबंधित पुरुष शासकीय कर्मचाऱ्यास अनुज्ञेय राहणार आहे. तसेच बाल संगोपनासाठी पतीला रजा मंजूर झाल्यानंतर, रजा कालावधीत पत्नीचा मृत्यु झाल्यास, पतीला उर्वरित कालावधीची बाल संगोपन रजा १८० दिवसांच्या कमाल मर्यादेत अनुज्ञेय राहील.

३. बाल संगोपन रजेबाबत शासन निर्णय,balsangopan raja  वित्त विभाग, दिनांक २३.०७.२०१८ मधील अटी व शर्ती या शासन निर्णयान्वये बाल संगोपन रजा घेणाऱ्या लाभार्थ्यांना लागू राहतील.

४.हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

५. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मध्ये आवश्यक त्या सुधारणा यथावकाश करण्यात येतील.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्र. २०१८१२१५१५०१४१७२०५ असा आहे. हा • शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

बाल संगोपन रजा शासन निर्णय balsangopan raja shasan nirnay