♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

मराठी गोष्टी | chan chan goshti marathi | story marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण लहानपणापासूनच विविध प्रकारच्या गोष्टी ऐकत असतो . गोष्टी ऐकणे कोणाला आवडत नाही.आपण इंटरनेटवर मराठी गोष्टी ,chan chan goshti marathi,chan chan goshti marathi book,chan chan goshti marathi book pdf download ,story marathi अनेक प्रकारच्या गोष्टी शोधत असतो. अशा गोष्टी शोधत असताना आपल्याला चांगल्या बोधपर गोष्टी मिळणे फार कठीण असते. 

याकरिता आपल्याला या आपल्या www.sandeepwaghmore.in संकेतस्थळावर उत्तमोत्तम शैक्षणिक  माहिती उपलब्ध करून दिली जाते. या पोस्टमध्ये आपल्याला बोधपर आशा खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.  निश्चित ज्या गोष्टी आपल्याला आवडतील. पण या गोष्टींची लींक आपल्या इतर सहकार्‍यांना देखील आवश्यक शेअर करा. 

अ.क्रगोष्टीचे नावगोष्ट वाचण्यासाठी
1कष्टाची भाकरयेथे क्लिक करा
2जंगली फुलंयेथे क्लिक करा
3मूर्खाचा मालकयेथे क्लिक करा
4सहनशीलतायेथे क्लिक करा

5एकीचे बळयेथे क्लिक करा
6खरे जीवनमूल्ययेथे क्लिक करा
7संताची थोरवीयेथे क्लिक करा
8मोठ्या पदासाठी योग्यतायेथे क्लिक करा
9मनाची श्रीमंतीयेथे क्लिक करा
10गोड शिक्षायेथे क्लिक करा
11लक्ष केंद्रित करायेथे क्लिक करा
12प्रामाणिकपणायेथे क्लिक करा

प्रामाणिकपणा | pramanik pana marathi goshti

प्रामाणिकपणा | pramanik pana marathi goshti

देवपूर गावात रामराव नावाचा गावचा पाटील होता. वृद्धापकाळामुळे त्याचे निधन झाले. त्याला कोणीही वारस नसल्याने दुसरी त्याच्याच सारखी विश्वासू व्यक्ती पाटील निवडावी लागणार होती.त्या भागाच्या जमीनदाराने दिवाणजींच्यामार्फत गावच्या पाटील पदावर भरती करण्याकरिता गावात दवंडी पिटविली व अशी घोषणा केली की, ज्यांना या पदावर नियुक्त व्हायची इच्छा आहे, अशा उमेदवारांनी जमीनदार साहेबांच्या खजिनदारांना प्रथम भेटावे.

त्यानुसार, अनेक उमेदवार येऊन खजिनदाराला भेटले. खजिनदाराने त्यांच्याशी वेगळ्या तऱ्हेने बोलणे केले व त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी जमीनदार साहेबांच्या इथे येण्यास सांगितले.

खजिनदाराने जो उमेदवार निवडला त्याचे नाव देवराम होते. पण यामुळे बाकीच्या नऊ जणांनी नापसंती दर्शवत म्हटले, “मालक, हा तर खरोखरच अन्याय आहे. आम्हाला ही नोकरी देण्याचे वचन देऊन या खजिनदाराने प्रत्येकाकडून एक हजार रुपये लाच घेतली. “

यावर जमीनदार मध्येच म्हणाले,

“मीच तशी परीक्षा घेतली. तुमच्यामध्ये विश्वासूपणा नाही. या पदावर तुमच्यासारख्या लाच देणाऱ्या लोकांना नियुक्त केले तर काय खात्री की, पद मिळाल्यानंतर तुम्ही लाच घेणार नाहीत. लाच देण्यास देवरामने नकार दिला. त्यामुळे या पदावर देवराम हाच एक योग्य माणूस आहे. “

आपणास ही गोष्ट देखील आवडेल 

संताची थोरवी 

येथे क्लिक करा

तात्पर्य : प्रामाणिकपणा हा अधिकारपदावरील व्यक्तीचा एक आवश्यक गुण आहे.

लक्ष केंद्रित करा | bodhpar goshti in marathi

लक्ष केंद्रित करा, bodhpar goshti in marathi

स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते तेव्हाची गोष्ट. एकदा ते भ्रमण करीत एका पुलावर पोहोचले. पुलावर काही मुलेही उभी होती. ती नदीमध्ये तरंगत असलेल्या चेंडूंवर बंदुकीने नेम धरून नेमबाजीचा सराव करीत होती. पण, कोणताही मुलगा एकही लक्ष्य भेदू शकला नाही. हे पाहून स्वामी विवेकानंदांनी एका मुलाकडून बंदूक घेतली आणि स्वतः नेम धरून गोळ्या मारणे सुरु केले.

त्यांनी पहिला निशाणा लावला आणि तो अगदीच अचूक बसला, मग एकामागोमाग एक अशा १२ गोळ्या झाडल्या. त्या सर्वच अचूकपणे चेंडूंना लागल्या. हे बघून मुले आश्चर्यचकित झाली. त्यांनी विचारले, “स्वामीजी, तुम्ही इतके अचूकपणे नेम कसे काय मारले?”

आपणास ही गोष्ट देखील आवडेल 

खरे जीवनमूल्य 

येथे क्लिक करा

स्वामी विवेकानंद म्हणाले, “यात अशक्य असे काहीच नाही. मन विचलित होऊ देऊ नका. तुमचे पूर्ण लक्ष फक्त तुमच्या लक्ष्यावर असणे आवश्यक आहे. “

तात्पर्य : आपले लक्ष फक्त लक्ष्यावर केंद्रित करा. मग यश तुमचेच आहे.

गोड शिक्षा | god shiksha । marathi goshti | goshti

गोड शिक्षा , god shiksha , marathi goshti , goshti

सारसपूर राज्याचा राजा हा एक उदारमतवादी आणि विद्वान राजा होता. त्याला लोक देवाचा अवतार मानत. पण त्याच्या राजधानीत एक असा माणूस होता, जो प्रत्येक वेळी राजावर टीका करत असे. हे माहीत असूनही राजा शांतच राहिला होता. पण या माणसाचा उपद्रव वाढतच गेला.

एक दिवस राजाने त्याबद्दल गहन विचार केला. मग त्याने आपला एक नोकर त्या माणसाकडे पाठविला. त्याच्यासोबत एका बैलगाडीवर गव्हाची गोणी, साबण, गुळ असे सामानही पाठविले.

या गोष्टी पाहून त्या मनुष्याला खूपच गर्व वाटला. राजा त्याला घाबरला असल्याने त्याने या गोष्टी पाठविल्या आहेत, असे त्याला वाटले. घरात ते सामान ठेवून तो गर्वाने राजगुरूंकडे गेला. संपूर्ण हकीकत त्यांना सांगून तो म्हणाला, “गुरुदेव ! हे पहा, राजा मला घाबरला असल्याने त्याने या गोष्टी पाठविल्या आहेत. “

आपणास ही गोष्ट देखील आवडेल 

मोठ्या पदासाठी योग्यता

येथे क्लिक करा

राजगुरु म्हणाले, “हा तुझा गैरसमज आहे! अरे, राजाने या भेटवस्तूंद्वारे तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, तू नेहमी निंदा करीत असतोस, पण, कधीकधी चांगल्या गोष्टी देखील करत जा. राजाने पाठविलेला गहू तुझ्या रिकाम्या पोटासाठी आहे. साबण हा तुझ्या शरीराची घाण स्वच्छ करण्यासाठी आहे, आणि हा गुळ तुझ्या कडू वाणीस गोड करविण्यासाठी दिला आहे. “


तात्पर्य : इतरांची सतत निंदा ना करता त्यांच्यातील चांगल्या गोष्टीही पहाव्यात

मनाची श्रीमंती | manachi shrimanti | marathi goshti

मनाची श्रीमंती,manachi shrimanti,marathi goshti

एका विद्वान माणसाला स्वत:च्या ज्ञानाची खूप घमेंड होती. तो एकदा आगगाडीतून प्रवास करीत असताना, त्याला आपल्या शेजारी एक अडाणी शेतकरी बसला असल्याचं आढळून आलं. तो विद्वान माणूस त्या अडाणी शेतकऱ्याची थट्टा करून आजूबाजूच्या बसलेल्या प्रवाशांची करमणूक करू लागला.

थोडा वेळ ती थट्टा सहन केल्यावर तो शेतकरी त्याला म्हणाला, “साहेब, काही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी. तरीसुद्धा आपला गाडीतला वेळ चांगला जावा, म्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया. मी अडाणी व    गरीब असल्याने कोडं सोडवण्यात जर मी हरलो, तर मी तुम्हाला फक्त शंभर रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलात, तर तुम्ही मात्र मला पाचशे रुपये द्यायचे. आहे कबूल ?”

हे ऐकून तो विद्वान माणूस आनंदला आणि सहप्रवाशांवर छाप मारायची सुसंधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे, असा विचार करून त्या शेतकऱ्याला म्हणाला, “तुझी कल्पना मला मान्य आहे. 

आता पहिलं कोडं तू मला घाल. “

शेतकऱ्यानं विचारलं, “ज्याला उडताना तीन पाय, चालताना दोन पाय आणि बसला असता फक्त एक पाय असतो, असा पक्षी कोणता?”

या कोड्याचं उत्तर देता न आल्यानं तो विद्वान काहीसा ओशाळून म्हणाला, “बाबा रे, मी हरलो. हे घे पाचशे रुपये, आणि या कोड्याचं उत्तर तू मला सांग.”

आपणास ही गोष्ट देखील आवडेल 

मोठ्या पदासाठी योग्यता

येथे क्लिक करा

त्या विद्वानाने दिलेल्या पाचशे रुपयांपैकी चारशे रुपये स्वतःच्या खिशात टाकून, उरलेले शंभर रुपये त्याच्या हाती देत तो शेतकरी म्हणाला, “मलासुद्धा या कोड्याचं उत्तर देता येत नाही, म्हणून मी हरल्याचे शंभर रुपये तुम्हाला देत आहे.”

एक अडाणी शेतकऱ्याने असे चकविल्यामुळे फजिती झालेला तो विद्वान माणूस तेथून उठला व दुसऱ्या डब्यात

जाऊन बसला.

तात्पर्य : निरक्षर माणसाकडेही शहाणपण असू शकते, हे लक्षात ठेवावे.

मोठ्या पदासाठी योग्यता । मराठी गोष्टी । chan chan goshti

मोठ्या पदासाठी योग्यता । मराठी गोष्टी । chan chan goshti

एकदा, खलिफा हजरत उमर यांनी त्यांच्या ताब्यातील एका राज्याच्या राज्यपाल पदी एका व्यक्तीची नेमणूक केली. आपल्या पदाचे नियुक्ती पत्र घेण्यासाठी तो हजरत उमर यांच्याकडे आला. त्याने त्यांच्याकडून नियुक्ती पत्र घेतले.

त्यावेळी त्या परिसरातील एक लहान मुलगा खेळत-खेळत तेथे आला. हजरत उमर यांनी त्याला आपल्या हाताने उचलून घेतले आणि स्वतःच्या मुलासारखे त्याचे लाड करायला सुरुवात केली.

जेव्हा त्या व्यक्तीने ते पाहिले तेव्हा तो म्हणाला, “हजरत! मला आठ मुले आहेत, पण मी त्यांना कधी जवळही घेतलेले नाही, आणि आपण मात्र परक्या मुलालाही जवळ घेता.” त्याचे हे शब्द ऐकल्यावर हजरत उमर यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. ते त्या माणसाला म्हणाले, “मी तुला जे नियुक्ती पत्र दिले आहे, ते जरा दाखव.”

आपणास ही गोष्ट देखील आवडेल 

प्रामाणिकपणा

येथे क्लिक करा

त्याने ते नियुक्तीपत्र हजरत उमर यांना दिले. ते नियुक्तीपत्र हातात पडताच त्यांनी लगेचच ते फाडून टाकले आणि त्याला म्हणाले, “तू एक पिता असूनही तुझ्या अंतःकरणात तुझ्या मुलांसाठीही प्रेम नाही, तर मग तुझ्यासारखा माणूस आपल्या प्रजेवर प्रेम कसे करणार ? तू राज्यपाल बनण्यासाठी योग्य नाहीस.”

तात्पर्य : एखाद्या माणसाची योग्यता अगदी लहान-सहान गोष्टींतूनही तपासता येते.

संतांची थोरवी | santanchi thoravi | marathi goshti

संतांची थोरवी | santanchi thoravi | marathi goshti

तुर्कस्तान आणि इराण यांच्यात अनेक वर्षांपासून लढाई चालू होती. या लढाईत तुर्कस्तानला सतत पराभवाचा सामना करावा लागला होता. पण एक दिवस इराणचे प्रसिद्ध संत अत्तारी साहेब हे तुर्कांच्या हाती सापडले. तुर्कांनी त्यांना मृत्युदंड देण्याचे ठरविले.

इराणमधील लोकांना याबद्दल माहिती मिळताच त्यांनी अत्तारी साहेबांना सोडविण्याच्या बदल्यात त्यांच्या वजनाइतके हिरे तुर्कांना देण्याची तयारी दर्शवली, पण तुर्कांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही.

आपणास ही गोष्ट देखील आवडेल

एकीचे बळ 

येथे क्लिक करा

इराणच्या सुलतानास ही बातमी समजली तेव्हा तो स्वतः तुर्कांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “अनेक पिढ्या आपली लढाई चालू आहे, तरीही तुम्ही आम्हाला जिंकू शकला नाही आणि कदाचित पुढेही जिंकू शकणार नाही. पण आज मी तुमच्यासमोर उभा आहे. मी हे सांगायला आलो आहे की, तुम्ही आमचे सगळे राज्य घ्या, पण अत्तारी साहेबांना आम्हाला परत द्या. पैसा व संपत्ती हे एक ना एक दिवस संपून जातात. राज्यही लयाला जाते; परंतु संतांचे नाव व विचार नेहमी अमर असतात. अत्तारी साहेबांना गमावण्याचा इराणला कलंक नको आहे.’ “

तात्पर्य : संत-महात्मे व त्यांचे विचार हीच देशाची खरी संपत्ती असते, म्हणून त्यांची जपणूक केली पाहिजे.

खरे जीवनमूल्य | khare jivan mulya marathi goshti

खरे जीवनमूल्य khare jivan mulya marathi goshti

जपानमधील एक वृद्ध झेन गुरू आपल्या आश्रमामध्ये शिष्यांना युद्धकलेचे शिक्षण देत असत.

एकदा युद्धकलेमधे तरबेज असलेला एक नवयुवक तेथे आला. युद्धकलेच्या स्पर्धेमध्ये त्याने कधीही पराभव पत्करला नाही. या शहरात तो यासाठीच आला होता की, या आश्रमातील झेन गुरूला खिजवून त्यांना लढायला प्रवृत्त करून पराभूत करायचे व अजिंक्य म्हणून ख्याती मिळवायची यासाठीच तो आला होता.

आल्या-आल्या तो गुरूंना ललकारू लागला, खिजवू लागला. ते पाहून आश्रमातील सर्व शिष्य जमा झाले. त्याचे खिजवणे ऐकून प्रत्येकाच्या मुठी रागाने आवळू लागल्या होत्या.

गुरू व तो युवा योद्धा समोरासमोर उभे ठाकले. त्यांना पाहून युवा योद्धा त्वेषाने अपशब्द उच्चारत त्या गुरूंना अपमानित करू लागला. सर्वजण गुरूंकडे पाहू लागले. त्यांना वाटले गुरू आपल्याला त्याचा समाचार घेण्याची आज्ञा देतील; पण गुरू अगदी शांतपणे उभे होते. त्यांचा शांतपणा, धीरगंभीरपणा पाहून युवायोद्धा मनातून घाबरला. असा शांतपणा त्याला अपेक्षित नव्हता. तो शांतपणा सहन न होऊन तो युवा योद्धा न लढता निघून गेला.

यानंतर सारे शिष्य गुरूजवळ आले आणि नाराजीने विचारू लागले, “तुम्ही त्या दुष्टाला शासन का केले नाही? निदान आम्हाला आज्ञा तरी द्यायची होती. “

आपणास ही गोष्ट देखील आवडेल 

मूर्खाचा मालक

येथे क्लिक करा

गुरू म्हणाले, “हे पहा, जर एखादा तुमच्याकडे काही सामान घेऊन आला आणि ते तुमच्या गळ्यात मारू लागला, आग्रह करू लागला; परंतु त्याच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही जर प्रतिसाद दिला नाही तर काय होईल? तो त्याचे सामान घेऊन परत जाईल. 

मग हेच तर मी या युवकाच्या बाबतीत केले. त्याने आणलेल्या ईर्षा, अपमान, आव्हान या गोष्टी मी घेतल्याच नाहीत. त्यामुळे त्याला त्या परत न्याव्या लागल्या, म्हणजे त्या त्याच्याकडेच राहिल्या. म्हणजेच एका अर्थाने तो पराभूत झाला. “

तात्पर्य : युद्ध असो वा स्पर्धा, त्यांना जिंकण्यासाठी क्रिया-प्रतिक्रिया, हल्ले- प्रतिहल्ले केलेच पाहिजेत असे नाही. युद्ध टाळण्याचा मुत्सद्दीपणा दाखवणे हेच खरे जीवनमूल्य आहे.

एकीचे बळ | ekiche bal marathi gosht

एकीचे बळ ,ekiche bal marathi gosht

एका गावातील एक लाकूडतोड्या रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्लाचा जीव वाचवला. तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला.

ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्री त्याच्याजवळ येत असत. परंतु त्या सर्वांना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. लाकूडतोड्याने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकूलागली.

आपणास ही गोष्ट देखील आवडेल 

मनाची श्रीमंती

येथे क्लिक करा

वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणाऱ्या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व हल्ला करून त्याला ठार केले.
तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.

सहनशीलता | chan chan goshti | marathi goshti |

सहनशीलता सहनशीलता | chan chan goshti | marathi goshti |

एकदा काय झाले, एका मंदिरामध्ये स्थापन केलेल्या दगडाच्या मूर्तीला वाहिलेल्या फुलाने रागावून तेथील पुजाऱ्याला म्हटले, ” तू दररोज या 

तो श्रीमंत माणूस म्हणाला, “आता मी काय करू मला सांगा ?”

माळी म्हणाला, “तुम्हाला त्यांच्यावरही प्रेम करायला शिकायला हवं. जर तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू शकत नसाल, तर मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कारण या गोष्टींची तुम्ही काडीमात्र अपेक्षा केली नव्हती, मात्र आता त्या तुमच्या बगीच्याचाच एक भाग दगडाच्या मूर्तीवर माझा हार घालून तिची पूजा करतोस. हे मला अजिबात आवडलेले नाही. खरंतर माझी पूजा झाली पाहिजे, कारण मी कोमल, सुंदर व सुगंधित आहे. ही तर केवळ दगडाची एक मूर्ती आहे.”

मंदिराच्या पुजाऱ्याने हसून सांगितले, “हे फुला, तू कोमल, सुंदर व सुगंधित नक्कीच आहेस. पण तुला असे देवानेच बनविले आहे. हे गुण तुला काहीही न करता प्राप्त झाले आहेत. यासाठी तुला श्रम करावे लागलेले नाहीत. पण दगडातून देवत्व प्राप्त करणे हे मोठे कठिण काम आहे. एखाद्या कठीण दगडाला देवाची मूर्ती बनण्यासाठी छन्नी-हतोड्याचे हजारो घाव सोसावे लागतात. 

आपणास ही गोष्ट देखील आवडेल 

 जंगली फुलं

येथे क्लिक करा

असे घाव सोगूनही जर हा दगड फुटून विखरून गेला तर कदाचित त्यातून कधीही देवाची मूर्ती घडविता येणार नाही. पण, एकदा का कठीण दगडातून देवाची मूर्ती घडविली गेली की, लोक तिला मोठ्या आदराने मंदिरात स्थापित करून दररोज तिची पूजाअर्चा करतात. दगडाच्या सहनशीलतेच्या गुणधर्मानेच त्याला देवाच्या मूर्तीच्या रूपाने पूजनीय व वंदनीय बनविले आहे.”

हे ऐकून फुलाने समाधानाने स्मितहास्य केले.
तात्पर्य : मोठेपण प्राप्त करण्यासाठी कठीण परीक्षा द्यावी लागते.