यावर्षीच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाला सुरुवात; ड्युअल डिग्रीची संधी उपलब्ध

 Dual Degree Facility YCMOU: गेल्यावर्षीपासूनच यूजीसीने दुहेरी पदवी उपलब्ध करून देण्याबाबत विद्यापीठांना सूचना दिलेल्या होत्या. यामुळे देशातील विविध विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठ यांना ड्युअल डिग्री चा पर्याय उपलब्ध झालेला आहे. या पर्यायामुळे विद्यार्थी एकाच वेळी विविध अभ्यासक्रमातील पदवी घेऊ शकतात. बहिस्थ पद्धतीने पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे एक महत्त्वाचे विद्यापीठ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत आहे. यावर्षी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात देखील विद्यार्थी ड्युअल डिग्री घेऊ शकतात.

 विद्यार्थी घेत असलेल्या शिक्षणाबरोबरच  आता विद्यार्थी यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी(Degree), पदविका (Diploma) किंवा प्रमाणपत्र स्तरावरील (Certificate Courses) करता येणार आहेत. यालाच  दुहेरी पदवी  Dual Degree Facility  असे म्हटले जाते.

 अशा प्रकारे पदवी मिळवण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ऑनलाईन प्रवेश सुरु झाले असून. यात पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका, प्रमाणपत्र शिक्षण (सर्टिफिकेट कोर्स) इत्यादी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

 प्रवेश घेण्याची अंतिम तारीख

३० जुलै २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने भारत येणार आहेत.

 प्रवेश असा घेता येईल

  • सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपली नोंदणी करावी.
  • त्यांनतर मिळालेल्या आयडी आणि पासवर्ड चा वापर करून आपल्या खात्यात प्रवेश करावा.
  • आपली संपूर्ण प्रोफाइल व्यवस्थित भरावी.
  • सर्व डॉक्युमेंटस अपलोड करावेत. तद्नंतर हव्या असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करावा.
  • व ऑनलाईन प्रकारे परीक्षा शुल्क भरावे.
  • सबमिट बटनावर क्लिक करून अर्जाची एक प्रिंट काढावी व ती निवडलेल्या अभ्यासकेंद्रात जमा करावी.

 प्रवेश कोणाला मोफत असेल

  • राज्यातील बंदिजनांसाठी विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी शिक्षणक्रम पूर्णतः मोफत
  • अंध विद्यार्थ्यांना प्रवेशशुल्क माफ
  • राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना (शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत) रू.१९०/- मध्ये पदवी शिक्षणक्रमास प्रवेश

 माहितीसाठी संपर्क

पत्ता :

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विश्वविद्यालय (य.च.म.मु.वि.) चे विभागीय कार्यालय मुंबई

द्वारा जगन्नाथ शंकरशेठ मनपा शाळा, दुसरा मजला,

नाना चौक, ग्रँट रोड (प.), मुंबई ४०० ००७

ई-मेल :

rd_mumbai@ycmou.digitaluniversity.ac