सोपे 26 जानेवारी भाषण मराठी 2022 | 26 January Speech in Marathi 2022
नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण 26 जानेवारी साठी सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहोत . आपल्या भारतीयांसाठी 26 जानेवारी हा दिवस खूप खूप महत्त्वाचा आहे. आपण सर्व भारतीय हा दिवस आनंदाने उत्साहाने साजरा करतो कारण याच दिवशी आपला देश प्रजासत्ताक झाला.
26 जानेवारी या दिवशी सर्व भारतभर शाळा , खाजगी संस्था , महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात व या कार्यक्रमांमध्ये अनेक व्यक्ती विद्यार्थी आपल्या देशाबद्दल 26 जानेवारीबद्दल विविध प्रकारची माहिती भाषण करत असतात
तर मित्रांनो तुम्हाला देखील या 26 जानेवारी दिवशी भाषण करायचे असेल त्यासाठी आम्ही अतिशय सोप्या पद्धतीने खास आपल्यासाठी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण Republic Day speech www.sandeepwaghmore.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे .
26 जानेवारी भाषण मराठी | 26 January Speech in Marathi
प्रमुख अतिथी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आपले मुख्याध्यापक आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो माझे नाव………….. …………मी इयत्ता ………………मध्ये शिकत आहे .आज मी आपल्यासमोर 26 जानेवारी म्हणजेच भारतीय प्रजासत्ताक दिना विषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती.
उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला
अशा या भारत देशाला मानाचा मुजरा.
आज स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्तमित्र आपण सर्व येथे उपस्थित झालो आहोत 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले .परंतु 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान अंमलात आले म्हणजे या दिवशी आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला . म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो.
प्रजासत्ताक म्हणजे काय प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे लोकांनी लोकां करिता चालवत असलेले राज्य देशावर कोणत्याही एका व्यक्ती किंवा घराण्याचे शासन नसून देशातील नागरिक तो देश चालवतअसतात
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात यांचा भारताला प्रजासत्ताक करून देण्यामध्ये आणि भारताला समृद्ध करून देण्यामागे खूप महत्वाचा वाटा आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्या अध्यक्षतेखाली खाली 2 वर्ष 11 महीने आणि 7 दिवसाच्या काळामध्ये संविधानाची निर्मिती करण्यात आली.
या संविधाना मुळेच नागरिकांना विविध हक्क प्रदान झाले . संविधानामुळे भारतदेश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनला .आज आपल्या देशामध्ये न्याय, समानता, स्वातंत्र, बंधुत्व ही तत्वे हक्क हे सर्व संविधानाने आपल्याला प्राप्त झालेले आहेत .
ब्रिटिशांच्या जुलमी जोखडातून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिले. आज त्यांचेही स्मरण आपण करावयास हवे. आजही आपले भारतीय जवान आपल्या भारत देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देत आहेत. म्हणून मला म्हणावेसे वाटते
स्वातंत्र्य वीरांना
करूया शत शत प्रणाम,
ज्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान…..
आज संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा आपल्या देशभक्तांचा आणि आपल्या देशातील प्रत्येक जवानांचा नेहमी आदर केला पाहिजे .
ज्या भूमीवर वाहते गोदावरी,
कृष्णा, यमुना गंगा,
हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो
अभिमानाने तिरंगा.
आज या पावन दिवशी आपण मला आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो परत एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवतो जय हिंद जय भारत
तर मित्रांनो ! ” 26 जानेवारी भाषण मराठी 2022 । 26 January Speech in Marathi “ हे भाषण आपणास निश्चितच आवडले असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.
आपणास हे देखील आवडेल
इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती
असे का होते ? । मजेशीर विज्ञान कथा