धनत्रयोदशी का साजरी करतात ? Dhanteras 2021 in marathi  

 दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा आणि संपन्नतेची असणा-या दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी Dhanteras  धनाचा वर्षाव करणाऱ्या या धनत्रयोदशीला दीपावलीत अनन्यसाधारण महत्त्व आहे 

     धनत्रयोदशी का साजरी करतात ? Dhanteras 2021

आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धण यांच्या बद्दल आपल्या मनात असलेले प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो धनत्रयोदशीला  धन  म्हणजे पैसा सोने चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.  चला तर मग आज आपण या धनत्रयोदशीचे Dhanteras 2021 अध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया

what is dhanteras why do we celebrate dhanteras 

     धनतेरस या नावाने सुद्धा ओळखले जाणारी Dhanteras 2021 धनत्रयोदशी हीअश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी असते .म्हणूनच आश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. मुख्यतः व्यापारी आणि शेतकरी वर्गासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो .

      या दिवशी सर्वत्र मिठाई आणि गोड पदार्थ बनवले जातात .कुटुंबातील मंडळी एकत्र येतात. आनंदाने दिवाळी साजरी करतात .शेतकरी व कारागीर लोक आपल्या व्यवसायाशी संबंधित अवजारांची पूजा करतात .शेतकरी नांगर ती पण कुदळ-फावडे इत्यादी शेतीशी संबंधित सर्व अवजारांची पूजा करतो. 

      व्यापारी तिजोरी हिशोबाच्या वह्या सोने-नाणे इत्यादीची या दिवशी पूजा करतो .बळीराजा शेतात पिकलेल्या धान्याची पूजा करतो. त्यासाठी धने गूळ खोबरे आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. तसेच झेंडूची फुले देखील देवाला वाहिली जातात.

     अंगणभर पणत्या लावल्या जातात घरांना विद्युत रोषणाई केली जाते गाव आणि शहरातील सर्व ठिकाणी  पणत्या दिवे  लावून सजवले जातात .सर्व  आसमंत   विद्युत रोषणाईने उजळून निघतो. 

   या धनत्रयोदशी  संबंधित दोन दंतकथा आहेत त्या तुम्हाला नक्की आवडतील अशी माझी खात्री तर मग आपणही या कथांचा आस्वाद घेऊया . 

धनत्रयोदशी कथा dhanteras story  

  हेमा नावाचा एक राजा असतो त्याच्या पुत्राला अकाली मृत्यू चा  शाप मिळालेला असतो. या शापानुसार हेमा राजाचा पुत्र वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार  असतो .राजा व राणी आणि आपल्या मुलाला मिळालेल्या  शापाने दुःखीकष्टी असतात .

      मात्र आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून त्याचे लग्न लावून देतात . लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही त्याला सतत जागी ठेवण्यासाठी प्रयत्न करते .त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार सुद्धा असेच सोन्या चांदीने मढले जाते जेणेकरून मृत्यूची देवता यम महालामध्ये प्रवेश करू शकणार नाही .

       संपूर्ण महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत केला जातो त्याची पत्नी वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून त्याला जागे देण्याचा प्रयत्न करत असते .आणि शेवटी ती घडी येते .यम सापाचे रूप धारण करतो आणि राज महालाकडे येऊ लागतो मात्र जेव्हा तो राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा यमाचे डोळे सोन्या चांदीचा दरवाजा यांनी आणि अलंकारांनी दिपून जातात.

     त्याला समोरचे  स्पष्ट दिसेनासे होते आणि या कारणास्तव या मला आपल्या यमलोकी परतावे लागते आणि राजकुमाराचे प्राण वाचतात .

       तर मित्रांनो अशी आहे धनत्रयोदशी ची पहिली दंतकथा या कथेच्या संदर्भाने  या दिवसाला यम दीपदान असेही म्हटले जाते .यमदीपदान परंपरा आजही अनेक ठिकाणी पाळतात.  

     मित्रांनो धनत्रयोदशी बद्दल आपण दुसरी दंतकथा आहे ते पाहूया 

समुद्रमंथन 

       महर्षि दुर्वास यांनी दिलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी राक्षस आणि देव यांनी मिळून समुद्रमंथन केले. तेव्हा त्या समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रगट झाली. त्यानंतर या समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला .चार हात असलेला भगवान धन्वंतरी एका हातात अमृतकलश दुसऱ्या हातात जळू तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र घेऊन जन्माला आला.या चारही हातातील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरी करतो म्हणूनच धन्वंतरीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते. या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

      आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा ही मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात .प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे लोकांना देतात .

     कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे असे म्हणतात कडुनिंबाच्या फक्त पाच ते सहा पानांची दररोज सेवन केल्याने सर्व प्रकारच्या व्याधी माणसापासून दूर राहतात असे मानले जाते .म्हणूनच या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो 

      ज्या धनामुळे आपल्या जीवनाचे पोषण सूरळीत चालू आहे त्या धनाची या दिवशी पूजा करतात येथे धन याचा अर्थ शुद्ध लक्ष्मी असा होतो मात्र श्री सुक्तात  वसू म्हणजेच पृथ्वी जल वायू अग्नी आणि सूर्य यांनासुद्धा धन च म्हटलं आहे.

      या दिवशी लोक सोने खरेदी करणे पसंत करतात या दिवशी सोने खरेदी केल्याने आर्थिक उन्नती होते असा समज आहे .

      आपण सोन्याऐवजी इतर कोणतीही वस्तू खरेदी करू शकता शास्त्रानुसार केवळ सोने खरेदी करावे असे कुठलेही बंधन नाही .

      चला आता आपण धनत्रयोदशीचे अध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊ 

      धनत्रयोदशी या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मी देवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते .  या दिवशी श्रीविष्णूच्या अप्रकट शक्तीच्या आधारे श्रीलक्ष्मीची उजवी नाडी कार्यरत होऊन त्यातून उत्पन्न होणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरी वेगाने ब्रह्मांडात येतात त्यामुळे या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडातील वायुमंडल हेच सोन्यासारख्या चमचमणार्‍या सोनेरी किरणांनी उजळून निघालेलेले असते. म्हणून या दिवशी घराच्या रूपात श्री लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते श्री लक्ष्मीच्या भावपूर्ण पूजेमुळे प्रत्यक्ष कुबेराचे पृथ्वीच्या कक्षेमध्ये आगमन होते.

      वर्षभरात आपण कष्टाने जे जे म्हणून घर कमावलेले असते त्याच्या सहावा हिस्सा आपण सत्पात्री दान करावे .असे शास्त्र सांगते असे दान केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपण योग्य कार्यासाठी धन कमावतात आहोत अशी लक्ष्मीची खात्री झाल्याने ते आपल्याला कायम साथ देते सत्कार्यासाठी धनाचा विनियोग झाल्यामुळे आपले सुद्धा मनोबल वाढते थोडक्यात लक्ष्मीचा वास कायम आपल्या घरात आणि उद्योगधंद्यात राहतो.

निश्चितच आपल्याला धनत्रयोदशी Dhanteras याविषयी माहिती आवडली असेल 

आपणास हे देखील आवडेल

यमदीप दान कसे करावे

Leave a comment