यमदीपदान माहिती । यमदीप दान कसे करावे । yam deep daan

यमदीपदान yam deep daan

 यमदीपदान जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणिमात्राला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जावेच लागते मात्र कधीकधी अकाली मृत्यू होतो असा अकाली मृत्यू होऊ नये यासाठीचे यमदीपदान केले जाते .

यमदीपदान विधी  yam deep daan puja

याचा विधी थोडक्यात असा आहे 

यमदीप दान कसे करावे

धनत्रयोदशीच्या पावन दिवशी सूर्यास्तानंतर सायंकाळी सहा ते आठ च्या दरम्यान कणकेचा तेलाचा एक दिवा लावावा .आपण दिव्याची वात उत्तर दिशेला करत असतो मात्र यमदीपदान  yam deep daan साठी दिव्याची वात लक्षपूर्वक दक्षिण दिशेला करावी आणि दिव्याचे दर्शन घेऊन पुढील मंत्र म्हणावा 

यमदीप दान मंत्र

मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह । 

त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ||

या मंत्राचा अर्थ आज धनत्रयोदशीला यमाला केलेल्या या दिव्याच्या ताणाने यमाने प्रसन्न व्हावे आम्हाला मृत्यू पाश आणि दंडातून माफी द्यावी

  ज्यांना हा मंत्र म्हणजे जमणार नाही त्यांनी या मंत्राचा केवळ अर्थ जाणून दिव्याचे मनोभावे दर्शन घेतले तरीही त्यांना संपूर्ण फळ मिळते 

    यमदीपदान करताना वर सांगितल्याप्रमाणे केवळ एकच दिवा लावावा काही ठिकाणी तेरा दिवे लावण्यात आणि संदर्भ आढळतो यामागे कारण म्हणजे या देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी नरकात वास्तव्यास असतात आणि त्यांचा कालावधी तेरा पळे इतका असतो त्याचबरोबर असेही मानतात की 13 या संख्येमध्ये यमाला तृप्त करण्याचे सामर्थ्य आहे .

   शास्त्रामध्ये असे सांगितले की देहात 13 प्रकारचे सूक्ष्म वायू असतात आणि त्यामुळेच आपला देह सजीव वस्तू आपण जिवंत असतो या 13 प्रकारच्या वायूंचे पैकी कोणताही एखादा वायू तर कमी झाला तर आपल्या देहाला रोग होतात. आपण बेशुद्ध पडू शकतो किंवा आपल्या मृत्यू होऊ शकतो .

      तेरा देव यांच्या स्वरूपात यमदीपदान केल्यामुळे या तेरा वायूवर असलेले मृत्यूचे सावट नष्ट होते आणि आपला अकाली मृत्यु होण्यापासून आपल्या संरक्षण  होते. मृत्युकाळ हा तेरा दिवसांच्या कालचक्राच्या असतो या तेरा दिवसात मृत्यूचे आवरण देहा भोवती वाढत जाते आणि शेवटी तेराव्या दिवशी आपला मृत्यू होतो नंतर आपला आत्मा मृत्यू लोकातून अन्य लोकांचा जाण्यासाठी कालाची एक एक सूक्ष्म कक्षा भेदत पुढे पुढे जात राहतो. 

     हा प्रवास सुद्धा तेरा दिवसाचा आहे त्यामुळेच आपण 13 दिवसांपर्यंत मृत व्यक्तीचे श्राद्ध करत असतो . यमदीपदान करण्यामागे कारण म्हणजे तेरा दिवसात मृत्यूची आवरण ते आपल्या देहावर ती वाढत जाते त्याचा अटकाव करणे हे आहे जेणेकरून अकाली मृत्यु होणे पासून आपला बचाव होईल होते शास्त्रसंमत धनत्रयोदशी बद्दल ची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती आपल्याकडे असलेली संपत्ती धन यांच्या बद्दल आपल्या मनातले प्रेम कृतज्ञता या निमित्ताने आपण व्यक्त करूया आणि यंदाच्या धनत्रयोदशीला धनलक्ष्मी कुबेर धन्वंतरी देवता या सर्वांना प्रसन्न करून आपले जीवन सफल आणि सुंदर करूया 

निश्चितच आपल्याला धनत्रयोदशीया दिवशी केले जाणारे यमदीपदान  याविषयी माहिती आवडली असेल 

Leave a comment