वसुबारस का साजरी करतात माहिती मराठी | vasubaras in marathi
दिवाळी हा सण मनाला आनंद देणारा उल्हसित करणारा अंधाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञान कडून ज्ञानाकडे येणारा सण म्हणजे दीपावली.
दिवाळीच्या सुरुवात होते वसुबारस vasubaras म्हणजे गोवत्स द्वादशी या दिवसापासून .देशातील बहुतेक ठिकाणी वसुबारस ए पासून अंगणात रांगोळी काढायला सुरुवात होते. वसुबारस या सणाचा स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनुला उद्देशून हा सण साजरा केला जातो.
अशी मान्यता आहे.
वसुबारस का साजरी करतात ?
महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. तसेच गाईगुरे जनावरे यांना घरांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. तसेच इतर जनावरांना बद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजे वसुबारस होय.
वसुबारस कशी साजरी करतात ?
वसुबारसेच्या vasubaras दिवशी घरात लक्ष्मी देवीचा आगमन व्हावं या हेतूने सुरू असलेल्या गायीची पूजा केली जाते या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात .संध्याकाळी गाईची तिच्या वासरासह पूजा करतात .पूजा करतांना गाय वासराच्या पायावर पाणी घालतात त्यांना हळद-कुंकू अक्षता आणि फुले पाहून त्यांचे आरती करतात .
पुरणपोळीचा नैवेद्य गाईला खाऊ घालतात . या मंगल दिनी सर्वजण विविध देवता कुलदेवता ग्रामदेवता या सर्वांचे उपासना करतात .या दिवशी तेलात तुपात तळलेले पदार्थ गाईचं दूध वर्ज्य केलं जातं . गोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घातले जातात .
वसुबारस या दिवशी ज्यांच्या घरी गाडी बसले आहेत त्या घरी लवकर उठून रांगोळी काढली जाते सर्व दैवतांचे आणि तुळशीचं पूजन केलं जातं वसुबारस हा दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात असल्याने पुरणपोळीचं जेवणही बनवलं जातं.
वसुबारस मंत्र vasubaras mantra
घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी पुढील मंत्राने गाईची तिच्या वासरासह प्रार्थना केली जाते
ततः सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |
मातर्ममाभिलाषितं सफलं कुरू नन्दिनि ||
हे सर्वात्मक सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते तु माझे सर्व मनोरथ सफल कर असा याचा अर्थ आहे .
स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन हा उपास सोडतात.आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते .
भारतीय संस्कृतीप्रमाणे गाईला फार महत्त्व आहे .तिला माताही म्हणतात.ती सात्विक असल्याने तिचे. सात्त्विक गुण आपल्यात यावेत म्हणून म्हणूनही हे पूजन केलं जातं .सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणार्या आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपल्या शेंणाद्वारे खते व पौष्टिक देणाऱ्या ,शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या व मातेचे या दिवशी पूजन केलं जातं .
ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण, संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचं पूजन होतं ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती तो समाज ते राष्ट्र भरभराटीला आल्या शिवाय राहात नाही. असं म्हटलं जात.अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात केली जाते . वसुबारस ह्या दिवसानंतर धनत्रयोदशी नरक चतुर्दशी बलिप्रतिपदा लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला सणांमध्ये साजरे केले जातात
आपणास हे देखील आवडेल
वसुबारस vasubaras हा सण तुम्ही कसा साजरा करता या सणाला तुमच्या काही वेगळ्या पद्धती आहेत काही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो ही माहिती आवडली तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या माहितीची लिंक शेअर करा