Simple Division Quiz

Simple Division Quiz

Calculate the result of:

/ =

Subtraction 

नमस्कार मी संंदिप वाघमोरे गणित विषयातील वजाबाकी Subtraction सोपे व्हावे तसेच याचा जास्ती जास्त सराव होण्यासाठी मी खालील सॉफ्टवेअर तयार केले आहे. याचा वापर करून आपण भरपूर सराव करु शकता.

Random Number Subtraction

Random Number Subtraction

Do Addition

Automatic Sum Calculator

Do Addition

+

Word Puzzle

नमस्कार मी संदीप वाघमोरे आपली इंग्रजीची शब्द संपत्ती मनोरंजनातून वाढवण्यासाठी मी खालील सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. यामध्ये आपल्याला अनेक शब्द उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. निश्चितच आपल्याला हे शब्द शोधण्यात मजा येणार आहे.

खाली Unscramble Word दिलेले आहेत त्यापासून तयार होणारे योग्य शब्द तयार करुन बॉक्स मध्ये टाईप करा. उत्तर टाईप केल्यानंतर आपल्या उत्तर बरोबर असल्यास खाली आपल्याला Correct असे दिसेल. उत्तर चुकल्यास योग्य उत्तर आपल्याला समोर असेल असे अनेक शब्द आपल्याला या ठिकाणी सोडवता येतील.

Word Puzzle

Word Puzzle

Age Calculator

Age Calculator

Age Calculator

सातत्यपूर्ण सर्वकंष मूल्यमापन निकाल सॉफ्टवेअर – संदिप वाघमोरे

sw result software

नमस्कार ,सातत्यपूर्ण सर्वकंष मूल्यमापन निकाल सॉफ्टवेअर आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करुन देताना आनंद होत आहे सदर सॉफ्टवेअर तयार करण्यामागे खालील उद्देश आहेत

  • निकाल तयार करण्यासारखे क्लिष्ट काम अतिशय सोपे व सुटसुटीत करणे.
    • शिक्षकांचे काम  कमी श्रमात व लवकरात व्हावे.
    • निकालात अचूकता यावी.

    दैनंदिन माहिती जलद गतीने देता येऊन शिक्षकांच्या वेळेची बचत करण्यासाठी

    SW Result Software ची वैशिष्ट्ये

    • वापरण्यास अत्यंत सोपे
    • एकदा विद्यार्थ्यांची माहिती भरली किती सर्व ठिकाणी डिस्प्ले होते.
    • सर्व इयत्ता साठी उपलब्ध
    • संपूर्ण निकाल श्रेणी सह तयार होतो.
    • संपूर्ण निकाल प्रिंट आउट सह तयार.
    • विद्यार्थी निहाय निकाल उपलब्ध
    • नोंदी करण्याची सोय
    • नोंदवही ची देखील प्रिंटआऊट काढता येते.
    • विषय निहाय व संवर्गनिहाय सारख्या वेळखाऊ बाबी क्षणात तयार होतात.
    • प्रगती पत्रक तयार होऊन  प्रिंट काढण्याची सोय उपलब्ध.
    • विद्यार्थ्यांचे बोनाफाईड प्रिंट सह उपलब्ध
    • नेहमी लागणारी विद्यार्थी यादीचा समावेश
    • कोरी नोंदवही प्रिंट सह उपलब्ध
    • विद्यार्थ्याचे वयोगट तक्ता उपलब्ध.
    • एका क्‍लिकवर पीडीएफ तयार होते

    सॉफ्टवेअर कसे वापरायचे याची माहीती देणारी PDF व

    सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी

    सेतू अभ्यास उत्तर चाचणी : मराठी माध्यम

    इयत्ता २ री

    मराठी/Marathi Download

    गणित /Maths Download

    इंग्रजी/English Download

    इयत्ता ३ री

    मराठी/Marathi Download

    गणित /Maths Download

    इंग्रजी/English Download

    इयत्ता ४ थी

    मराठी/Marathi Download

    गणित /Maths Download

    इंग्रजी/English Download

    इयत्ता ५ वी

    मराठी/Marathi Download

    गणित /Maths Download

    इंग्रजी/English Download

    इयत्ता ६ वी

    मराठी/Marathi Download

    गणित /Maths Download

    इंग्रजी/English Download

    विज्ञान/Science Download

    सामाजिक शास्त्र /Social Science Download

    इयत्ता ७ वी

    मराठी/Marathi Download

    गणित /Maths Download

    इंग्रजी/English Download

    विज्ञान/Science Download

    सामाजिक शास्त्र /Social Science Download

    इयत्ता ८ वी

    मराठी/Marathi Download

    गणित /Maths Download

    इंग्रजी/English Download

    विज्ञान/Science Download

    सामाजिक शास्त्र /Social Science Download

    इयत्ता ९ वी

    मराठी/Marathi Download

    गणित /Maths Download

    इंग्रजी/English Download

    विज्ञान/Science Download

    सामाजिक शास्त्र /Social Science Download

    इयत्ता १० वी

    मराठी/Marathi Download

    गणित /Maths Part 1 Part 2

    इंग्रजी/English Download

    विज्ञान/Science Part 1 Part 2

    सामाजिक शास्त्र /Social Science Download

    राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ( NMMS) परीक्षेची अधिसूचना 2023

    NMMS

    राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ( NMMS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या

     https://www.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर दिनांक २५ जुलै, पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत..

    परीक्षा केव्हा असणार आहे ?

    राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२३-२४ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १० डिसेंबर २०२३

    १. योजनेचे उद्दिष्ट :-

    a) इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे.

    b) विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे.

    c) विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा

    २. परीक्षेचे स्वरुप :-

    घडावी.

    केंद्रशासनामार्फत (शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली) २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर दिनांक १० डिसेंबर, २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु. १०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.

    ३. पात्रता :-

    (a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

    b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.

    c) विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. ( अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

    (d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहेत.

    • विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.

    • केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

    परीक्षेसाठी खालील प्रमाणे शुल्क असेल

    • जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

    परीक्षेसाठी विषय :- 

    सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

    a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT):- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव,

    विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. (b) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यतः इयत्ता ७ वी व ८ वी च्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण ३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण – ३५) ३. गणित (एकूण गुण २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात. उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

    a. सामान्य विज्ञान ३५ गुण:- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण. b. समाजशास्त्र ३५ गुण : इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण

    c. गणित २० गुण.

    ८. माध्यम :- परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.) विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/ अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली

    उत्तरे/ व्हाईटनर / खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. ९. प्रवेशपत्रे ऑनलाईन फॉर्म व शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळेच्या लॉगीनवर परीक्षेपूर्वी १० दिवस अगोदर उपलब्ध होतील. सदर प्रवेशपत्राची छापील प्रत विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची तसेच सदर प्रवेशपत्रातील विद्यार्थ्याची सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करण्याची सर्व जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

    १०. परीक्षेचे मूल्यमापन :- विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत OMR पध्दतीने करण्यात येते. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण (Negative Marking) पध्दतीचा अव 3 केला जात नाही. खबरदारीचे सर्व उपाय योजना यांचा विचार करुन बिनचूक गुणयादी तयार करण्या… येते. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीयांसह दिव्यांग विद्यार्थी आरक्षणातील केंद्रशासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हयानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

    ११. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या :- अखिल भारतीय पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी

    निवड केली जाते. दिव्यांगासाठी (अपंगासाठी) प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्हयासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

    १२. निकाल घोषित करणे :- सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२४ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.

    १३. शिष्यवृत्ती दर :- शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ. ९ वी ते इ. १२ वी पर्यंत दरमहा रु.१,०००/-(वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाईल.

    शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी 9वी व इ. ११ वी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणेआहे.

    इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. ( SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)

    सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचे मार्फत केले जाते.

    १४. अनधिकृततेबाबत इशारा

    शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही.

     यावर्षीच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाला सुरुवात; ड्युअल डिग्रीची संधी उपलब्ध

    _यावर्षीच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाला सुरुवात

     Dual Degree Facility YCMOU: गेल्यावर्षीपासूनच यूजीसीने दुहेरी पदवी उपलब्ध करून देण्याबाबत विद्यापीठांना सूचना दिलेल्या होत्या. यामुळे देशातील विविध विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठ यांना ड्युअल डिग्री चा पर्याय उपलब्ध झालेला आहे. या पर्यायामुळे विद्यार्थी एकाच वेळी विविध अभ्यासक्रमातील पदवी घेऊ शकतात. बहिस्थ पद्धतीने पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे एक महत्त्वाचे विद्यापीठ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत आहे. यावर्षी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात देखील विद्यार्थी ड्युअल डिग्री घेऊ शकतात.

     विद्यार्थी घेत असलेल्या शिक्षणाबरोबरच  आता विद्यार्थी यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी(Degree), पदविका (Diploma) किंवा प्रमाणपत्र स्तरावरील (Certificate Courses) करता येणार आहेत. यालाच  दुहेरी पदवी  Dual Degree Facility  असे म्हटले जाते.

     अशा प्रकारे पदवी मिळवण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ऑनलाईन प्रवेश सुरु झाले असून. यात पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका, प्रमाणपत्र शिक्षण (सर्टिफिकेट कोर्स) इत्यादी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

     यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

     प्रवेश घेण्याची अंतिम तारीख

    ३० जुलै २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने भारत येणार आहेत.

     प्रवेश असा घेता येईल

    • सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपली नोंदणी करावी.
    • त्यांनतर मिळालेल्या आयडी आणि पासवर्ड चा वापर करून आपल्या खात्यात प्रवेश करावा.
    • आपली संपूर्ण प्रोफाइल व्यवस्थित भरावी.
    • सर्व डॉक्युमेंटस अपलोड करावेत. तद्नंतर हव्या असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करावा.
    • व ऑनलाईन प्रकारे परीक्षा शुल्क भरावे.
    • सबमिट बटनावर क्लिक करून अर्जाची एक प्रिंट काढावी व ती निवडलेल्या अभ्यासकेंद्रात जमा करावी.

     प्रवेश कोणाला मोफत असेल

    • राज्यातील बंदिजनांसाठी विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी शिक्षणक्रम पूर्णतः मोफत
    • अंध विद्यार्थ्यांना प्रवेशशुल्क माफ
    • राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना (शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत) रू.१९०/- मध्ये पदवी शिक्षणक्रमास प्रवेश

     माहितीसाठी संपर्क

    पत्ता :

    यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विश्वविद्यालय (य.च.म.मु.वि.) चे विभागीय कार्यालय मुंबई

    द्वारा जगन्नाथ शंकरशेठ मनपा शाळा, दुसरा मजला,

    नाना चौक, ग्रँट रोड (प.), मुंबई ४०० ००७

    ई-मेल :

    rd_mumbai@ycmou.digitaluniversity.ac

    निवृत्त  शिक्षकांना शाळेमध्ये शिकवण्याची संधी  देण्याचा निर्णय का घेतला गेला?  या निर्णयावर टीका  का होत आहे ?

     राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थेतील खाजगी व अनुदानित  शाळेतील  निवृत्त शिक्षकांची  कंत्राटी स्वरूपात तात्पुरती  नियुक्ती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागातून घेण्यात आला. या निर्णयावर महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली नेमका हा निर्णय का घेण्यात आला? त्याच्या मागे कोणती कारणे आहेत ? या निर्णयावर टीका का करण्यात आली ? याविषयी सविस्तर माहिती.

      सद्यस्थितीमध्ये राज्यातील  विविध जिल्हा परिषद शाळेमध्ये  शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर कधी रिक्त आहेत.  महाराष्ट्र मध्ये  2012 पासून शिक्षक भरती बंद होती. यानंतर 2019 मध्ये 12000 शिक्षकांची भरती  करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेऊन सुद्धा बारा हजार शिक्षकांची भरती पूर्ण झालेली नाही. यामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पद रिक्त आहेत हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकांचे 60 हजार रुपये अधिक पदे रिक्त असल्याची माहिती देण्यात आलेले आहे.

     शिक्षक भरती विषयी सध्याचे अपडेट

     अलीकडेच  राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यांमध्ये तीस हजार शिक्षक भरती केली जाणार आहे अशी घोषणा केली. ही भरती पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे. या भरतीसाठी आवश्यक असणारी अभियोग्यता चाचणी ही येण्यात आली. या परीक्षेचा निकाल देखील जाहीर झालेला आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. याच दरम्यान राज्यातील शाळांची संच मान्यता करण्याचे काम सुरू आहे संच मान्यता पूर्ण झाली नसल्याने राज्यातील शिक्षकांची नेमकी किती पदे रिक्त आहे याबाबत स्पष्टता नाही.

     निवृत्त शिक्षकांना कंत्राटी स्वरूपात नेमणूक करण्याचा निर्णय का घेण्यात आला

    •  जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
    •  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
    •  पवित्र पोर्टल भरती मार्फत अद्याप शिक्षक भरतीसाठी विलंब होत आहे.
    • या नियुक्तीची प्रक्रिया पंधरा दिवसांमध्ये पूर्ण  करण्याचे निर्देश निर्णय शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी  परिपत्रकाद्वारेदिलेली आहे.

     कंत्राटी स्वरूपात निवृत्त शिक्षकांची नियुक्तीसाठी यातील अटी

    •  या कंत्राटी स्वरूपातील भरतीसाठी खालील प्रमाणात अटी ठेवण्यात आलेले आहेत.
    •  नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष असणार आहे
    •  त्यांना दरमहा वीस हजार रुपये मानधन दिले जाईल.
    •  नियुक्ती करिता जिल्हा परिषदेच्या  शिक्षणअधिकाऱ्यांसोबत करारनामा केला जाईल.
    •  नियुक्त कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे हक्काची मागणी करता येणार नाही.
    •  रिक्त पदानुसार नियुक्ती करण्यात येईल.
    •  ही संपूर्ण प्रक्रिया शिक्षणायुक्तांच्या  नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात येईल.

     या भरतीला का विरोध होत आहे ?

    •   या  निवृत्त शिक्षकांच्या भरतीमुळे तरुण उमेदवारांना  संधी मिळणार नाही, यामुळे बेकारी आणखीन वाढेल.
    •  निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याऐवजी अभियोग्यता चाचणीतील पात्र उमेदवारांना नियुक्त केले जावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
    •  यापूर्वी पेन्शन घेत असलेल्या  निवृत्त शिक्षकांना भरती करण्यापेक्षा नवीन उमेदवारांना संधी  देण्यात यावी. अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे यामुळे  नोकरी मिळेल अशा अपेक्षेने अनेक वर्ष वाट पाहणाऱ्या उमेदवारांचा फायदा होईल.