इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती  | indira gandhi information in marathi

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती | indira gandhi information in marathi ,indira gandhi information in marathi language ,इंदिरा गांधी मराठी निबंध | Indira Gandhi Marathi Nibandh

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ( Indira Gandhi information in marathi) होय. इंदिरा गांधी अशा एक महिला होत्या की त्यांचा केवळ भारतीय राजकारणावरच नव्हे तर जागतिक राजकारणाच्या क्षितिजावर प्रभाव राहिला आहे .श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म नेहरू घराण्यात झाला.

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती  | indira gandhi information in marathi

नाव (Name)

इंदिरा गांधी
  इंदिरा गांधीचा जन्म (Indira Gandhi Birthday)19 नोव्हेंबर 1917
  इंदिरा गांधी जन्मस्थान (Indira Gandhi Birthplace)उत्तर प्रदेशाच्या इलाहाबाद  प्रयागराज
इंदिरा गांधी यांच्या  वडीलांचे नाव  (Indira Gandhi’s Father Name)जवाहरलाल नेहरू
  इंदिरा गांधी यांच्या आई चे नाव  (Indira Gandhi’s Mother Name)कमला नेहरू
  इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव  (Indira Gandhi’s Husband Name)फिरोज गांधी
इंदिरा गांधी यांची  मुले (Indira Gandhi’s Children Name)राजीव गांधी आणि संजय गांधी
इंदिरा गांधी यांना लोकांनी दिलेली पदवीआयर्न लेडी
इंदिरा गांधी यांचा मृत्यू (Indira Gandhi Death)31 ऑक्टोबर 1984

  

इंदिरा गांधीचा जन्म व लहानपण  (Indira Gandhi’s Birthday)

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या कन्या होत्या इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी उत्तर प्रदेशाच्या इलाहाबाद मध्ये संपन्न परिवारात झाला त्यांचे नाव इंदिरा प्रियदर्शनी असे होते तर घरी प्रेमाने त्यांना इंदू असे म्हणत. त्यांच्या वडिलांचे नाव जवाहरलाल नेहरू आणि आईचे नाव कमला नेहरू होते .

  इंदिरा गांधीचे शिक्षण  

इंदिराजींचा जन्म आर्थिक व भौतिक दृष्ट्या संपन्न कुटुंबात झाला होता .  इंदिराजींच्या शालेय शिक्षणानंतर त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन मधील विश्वभारती विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला त्यानंतर 1937 मध्ये ते ऑक्सफर्ड मध्ये शिकण्यासाठी गेल्या. इंदिरा गांधी यांचे शिक्षण सोमरविले महाविद्यालय, ऑक्सफोर्ड विद्यापीठ यथे झाले.

इंदिरा गांधीचे वाचन प्रेम

लहानपणापासून इंदिरा गांधी यांना पत्र पत्रिका आणि पुस्तके वाचण्याचा खूप छान होता त्यामुळे त्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर जगातील इतर माहिती प्राप्त झाली यातून इंदिराजी अभिव्यक्तीच्या कला मध्ये  निपून झाल्या त्यांची इंग्रजी भाषेवर खूप छान पकड होती.

इंदिरा गांधीचा विवाह व मुले 

1942 मध्ये इंदिरा गांधी यांचा विवाह फिरोज गांधी यांच्याशी झाला लग्नानंतर त्यांनी राजीव आणि संजय गांधी यांचा जन्म दिला .

इंदिरा गांधी राजनैतिक करिअर

इंदिरा गांधी यांना राजकीय विचारधारा वातावरण कुटुंबातून वारसा म्हणून मिळाले होते एकोणीशे 1941 मध्ये भारतात आल्यानंतर त्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाल्या .1959 मध्ये त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बनल्या पंडित नेहरूंच्या निधनानंतर इंदिराजी निवडणूक जिंकून सूचना व प्रसारण मंत्री झाल्या

भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री यांच्या आकस्मित निधनानंतर 24 जानेवारी 1966 रोजी इंदिरा गांधी भारताच्या तिसऱ्या व पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या .त्यानंतर 1967 ते 1977 सलग तीन वेळा आणि पुन्हा चौथ्या वेळी 1980 ते 84 त्यांनी पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारली .

सोळा वर्षे पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधी यांच्या शासन काळात अनेक चढ-उतार आले . 1975 मधील आणीबाणी आणि 1984 मधील शीख दंगे यामुळे इंदिराजींना खूप विरोध व आलोचना सहन करावी लागली इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये जागतिक संघटनेचे पुढे न झुकता पाकिस्तानचा पराभव करत बांगलादेशची निर्मिती केली .

इंदिरा गांधी यांचा मृत्यू (Indira Gandhi Death)

31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली भारताचे एकतेसाठी यांनी अखंड ते साठी इंदिराजी शहीद झालेल्या इंदिरा गांधी यांच्यातील प्रतिभा आणि राजकीय दृढतेसाठी जागतिक राजकारणाचा इतिहासामध्ये नेहमी नेहमी लक्षात ठेवल्या जातील .

तर मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी यांचे जीवन चरित्र ,जीवन परिचय  इंद्रागांधी मराठी निबंध  indira gandhi information in marathi या पोस्टमध्ये सविस्तर माहिती पाहिली .आपल्याला इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा

तुम्हाला हे देखील आवडेल 

बालदिन सोपा मराठी निबंध