♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

कुडा रानभाजी माहिती व रेसिपी | Kuda ranbhaji recipe in marathi

कुडा रानभाजी माहिती व रेसिपी | Kuda ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव  – Holarrhena pubescens

इंग्रजी नाव –  Konesi Bark Tree

स्थानिक नाव –  पांढरा कुडा

कुळ- Apocynaceae

पाककला

कुडा फुले भाजी Kuda ranbhaji recipe in marathi

साहित्य – कुडा फुले, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर

कृती –

> एक पातेले घेउन त्यात एक ग्लास पाणी व कुडाची फुले उकळुन घ्यावे.

> नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे.

> नंतर एक पातेले घेउन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद तळून घ्यावे.

> नंतर त्यामध्ये अकळलेले कुडाची फुले टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची कुडाची फुलेची भाजी तयार होईल.