♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

केना रानभाजी माहिती व रेसिपी | Kena ranbhaji recipe in marathi

केना रानभाजी माहिती व रेसिपी | Kena ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव – Commelina Benghalensis

कुळ –कॉमिलीनिएसी

स्थानिक नाव – केना

उपयुक्त भाग – पाने

कालावधी –पावसाळा

पाककला

केनाचे वडे Kena ranbhaji recipe in marathi

साहित्य – केना. तांदळाचे पिठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर

कृती

● एक पातेले घेउन त्यात कापलेली केना भाजी घेऊन त्यात तांदळाचे पिठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर टाकुन व आवश्यकतेनुसार पाणी टाकुन मळून घ्यावे.

> नंतर एक कढई घेउन त्यात तेल गरम करून त्यात वरील मिश्रणाचे वडे बनवून लालसर होईपर्यंत

तळून घ्यावे.

★ अशा प्रकारे आपल्या आवडीची वडे तयार होतील.

केनाचे थालीपिठ

साहित्य – केना, तांदळाचे पिठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथबीर, ओवा, तीळ, कृती

> एक पातेले घेऊन त्यात कापलेली केना भाजी घेऊन त्यात तांदळाचे पिठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर, ओवा, तीळ टाकुन व आवश्यकतेनुसार पाणी टाकुन पातळ मिश्रण करावे.

> नंतर गॅसवर तवा गरम करून त्यावर चमच तेल टाकुन त्यावर वरील मिश्रण टाकुन वर्तुळाकृती पसरवावे व त्याला झाकुन घ्यावे.

> काही वेळानंतर झाकणी काढून त्याला पलटवून पुन्हा एक चमच तेल टाकुन शिजवावे.

● अशा प्रकारे आपल्या आवडीची केनाचे थालीपीठ तयार होतील.