♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

अळू रानभाजी माहिती व रेसिपी | Alu ranbhaji recipe in marathi

अळू रानभाजी माहिती व रेसिपी | Alu ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव –Colocasia esculenta 

कुळ –Araceae

स्थानिक नाव – आरवी, घोपा

पाककला

अळूची पानांची वडी Alu ranbhaji recipe in marathi alu vadi

साहित्य- अळुची पाने. वेसन, तेल, तिखट, मीठ, हळद, कृती –

> सर्वात प्रथम बेसन गव्हाच्या पिठाप्रमाणे मळुन घ्यावे.

> त्यामध्ये चवीनुसार तिखट, मिठ, हळद मिसळून घ्यावे.

> मळलेले बेसन पीठ अळूच्या प्रत्येक पानावर पसरवुन त्वरित अळूची पाने एकावर एक ठेऊन

गुंडाळून घ्यावे. 

> नंतर आळुच्या पानाच्या गुंडाळ्या वाफेवर शिजवून घ्यावे.

> नंतर त्याचे बारीक तुकडे किवा वडया करून तव्यावर तेलात टाकुन तळून घ्यावे.

> अशा प्रकारे अळुच्या पानांची स्वादवडी तयार होईल.

अळुची पानांची भाजी

साहित्य-अळुची पाने, बेसन, तेल, जिरा, तिखट, मीठ, हळद, मिरची, बारीक चिरलेला कांदा, कोथींबीर कृती –

> सर्वात प्रथम वेसन गव्हाच्या पिठाप्रमाणे मळून घ्यावे.

> त्यामध्ये एक चमचा हळद व एक चमचा मिठ मिसळुन घ्यावे.

> मळलेले बेसन पीठ अळूच्या पानावर पसरवुन त्वरित अळूची पाने गुंडाळून घ्यावे.

> नंतर आळुच्या पानाच्या गुंडाळ्या वाफेवर शिजवून नंतर तेलामध्ये तळून घ्यावे.

> नंतर त्याचे वारीक तुकडे करुन घ्यावे.

→ नंतर भाजी करण्यासाठी एक पातेले घेऊन त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढे तेल, जिरा, तिखट, गरम मसाला, कांदा टाकून तळून घ्यावे नंतर त्यामध्ये आळूची तुकडे किंवा वड्या टाकुन शिजवुन घ्यावे. अशा प्रकारे अळूच्या पानांची भाजी तयार