♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

कपाळफोडी रानभाजी माहिती व रेसिपी | kapalphodi ranbhaji recipe in marathi

कपाळफोडी रानभाजी माहिती व रेसिपी | kapalphodi ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव –Physalis Pubescens

कुळ -सॅपिडिएसी

उपयुक्त भाग –  पाने

स्थानिक नाव –फोफांडा

कालावधी  – वार्षिक (वेलवर्गीय फुले: ऑक्टोंबर डिसेंबर)

पाककला

साहित्य – कपाळफोडीची पाने, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर

कृती

> कपाळफोडीची पाने स्वच्छ धुऊन चिरुन घ्यावीत.

> एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व चिरलेली भाजी उकळुन घ्यावी.

> नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे.

> नंतर एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर तळून घ्यावे.

> नंतर त्यामध्ये भाजी टाकुन मंद गॅसवर शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजी तयार होईल.

पानांचा ओवा रानभाजी माहिती व रेसिपी | Ova ranbhaji recipe in marathi

पानांचा ओवा रानभाजी माहिती व रेसिपी | Ova ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव -Plectranthus amboinicus.

इंग्रजी नाव – Aromatic Coleus

उपयुक्त भाग  -पाने

Ova ranbhaji recipe in marathi

साहित्य – पानाचा ओवा पाने, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर कृती

> एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व खुडलेली भाजी उकळुन घ्यावे.

> नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे.

> नंतर एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर तळून घ्यावे.

> नंतर त्यामध्ये भाजी टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजी तयार होईल. 

केना रानभाजी माहिती व रेसिपी | Kena ranbhaji recipe in marathi

केना रानभाजी माहिती व रेसिपी | Kena ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव – Commelina Benghalensis

कुळ –कॉमिलीनिएसी

स्थानिक नाव – केना

उपयुक्त भाग – पाने

कालावधी –पावसाळा

पाककला

केनाचे वडे Kena ranbhaji recipe in marathi

साहित्य – केना. तांदळाचे पिठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर

कृती

● एक पातेले घेउन त्यात कापलेली केना भाजी घेऊन त्यात तांदळाचे पिठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर टाकुन व आवश्यकतेनुसार पाणी टाकुन मळून घ्यावे.

> नंतर एक कढई घेउन त्यात तेल गरम करून त्यात वरील मिश्रणाचे वडे बनवून लालसर होईपर्यंत

तळून घ्यावे.

★ अशा प्रकारे आपल्या आवडीची वडे तयार होतील.

केनाचे थालीपिठ

साहित्य – केना, तांदळाचे पिठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथबीर, ओवा, तीळ, कृती

> एक पातेले घेऊन त्यात कापलेली केना भाजी घेऊन त्यात तांदळाचे पिठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर, ओवा, तीळ टाकुन व आवश्यकतेनुसार पाणी टाकुन पातळ मिश्रण करावे.

> नंतर गॅसवर तवा गरम करून त्यावर चमच तेल टाकुन त्यावर वरील मिश्रण टाकुन वर्तुळाकृती पसरवावे व त्याला झाकुन घ्यावे.

> काही वेळानंतर झाकणी काढून त्याला पलटवून पुन्हा एक चमच तेल टाकुन शिजवावे.

● अशा प्रकारे आपल्या आवडीची केनाचे थालीपीठ तयार होतील.

अळू रानभाजी माहिती व रेसिपी | Alu ranbhaji recipe in marathi

अळू रानभाजी माहिती व रेसिपी | Alu ranbhaji recipe in marathi

शास्त्रीय नाव –Colocasia esculenta 

कुळ –Araceae

स्थानिक नाव – आरवी, घोपा

पाककला

अळूची पानांची वडी Alu ranbhaji recipe in marathi alu vadi

साहित्य- अळुची पाने. वेसन, तेल, तिखट, मीठ, हळद, कृती –

> सर्वात प्रथम बेसन गव्हाच्या पिठाप्रमाणे मळुन घ्यावे.

> त्यामध्ये चवीनुसार तिखट, मिठ, हळद मिसळून घ्यावे.

> मळलेले बेसन पीठ अळूच्या प्रत्येक पानावर पसरवुन त्वरित अळूची पाने एकावर एक ठेऊन

गुंडाळून घ्यावे. 

> नंतर आळुच्या पानाच्या गुंडाळ्या वाफेवर शिजवून घ्यावे.

> नंतर त्याचे बारीक तुकडे किवा वडया करून तव्यावर तेलात टाकुन तळून घ्यावे.

> अशा प्रकारे अळुच्या पानांची स्वादवडी तयार होईल.

अळुची पानांची भाजी

साहित्य-अळुची पाने, बेसन, तेल, जिरा, तिखट, मीठ, हळद, मिरची, बारीक चिरलेला कांदा, कोथींबीर कृती –

> सर्वात प्रथम वेसन गव्हाच्या पिठाप्रमाणे मळून घ्यावे.

> त्यामध्ये एक चमचा हळद व एक चमचा मिठ मिसळुन घ्यावे.

> मळलेले बेसन पीठ अळूच्या पानावर पसरवुन त्वरित अळूची पाने गुंडाळून घ्यावे.

> नंतर आळुच्या पानाच्या गुंडाळ्या वाफेवर शिजवून नंतर तेलामध्ये तळून घ्यावे.

> नंतर त्याचे वारीक तुकडे करुन घ्यावे.

→ नंतर भाजी करण्यासाठी एक पातेले घेऊन त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढे तेल, जिरा, तिखट, गरम मसाला, कांदा टाकून तळून घ्यावे नंतर त्यामध्ये आळूची तुकडे किंवा वड्या टाकुन शिजवुन घ्यावे. अशा प्रकारे अळूच्या पानांची भाजी तयार