शेवगा रानभाजी माहिती व रेसिपी |Shevaga ranbhaji recipe in marathi

शेवगा रानभाजी माहिती व रेसिपी |Shevaga ranbhaji recipe in marathi

शेवगा –

शास्त्रीय नाव -Moringa oleifera

उपयुक्त भाग – पाने, शेंगा, फुले, मुळ

कुळ –  मारिगेएसी

कालावधी – वार्षिक (वृक्ष) बहार – जानेवारी ते एप्रिल

पाककला

शेवगा पराठा Shevaga ranbhaji recipe in marathi

साहित्य – शेवग्याची कोवळी पाने साधारण दहा, तांदळाचे पीठ चार कप, तिखट, मीठ, हळद,

कृती

> शेवग्याची पाने कोवळी घ्यावे

> नंतर त्यात ४ कप तांदळाचे पीठ घ्यावे.

> नंतर एका वाट्यात पीठ व पाणी घेऊन त्यात अर्धा ग्लास पाणी मिसळून ते पीठ मळून घ्यावे व त्यात तिखट, मीठ, व हळद मिसळून घ्यावे.

> नंतर त्याचे पराठ्याची आकारानुसार जाड पोळी तयार करून तव्यावर पूर्ण शिजेपर्यंत काळपट होईपर्यंत शिजवून घ्यावे. अशा प्रकारे सुंदर चविष्ट पराठे तयार करावेत.

शेवगा भाजी

साहित्य-अर्धा किलो शेवगा शेंगा, चिरलेला बारीक कांदा, लसुन पाकळ्या, मटन मसाला, हळद, मीठ, गोडा मसाला, तेल, टमाटर

कृती

•● प्रथम शेंगाचे टरफल शिलुन घ्यावे व आतील कोवळा भाग काढून घ्यावा व त्याचे दोन तुकडे करावे. आकाराचे

→ नंतर गॅसवर एका पातेल्यात तेलात कांदा व लसुन टाकावे.

> नंतर वाटलेला मटन मसाला, हळद, मीठ, गोडा मसाला, टमाटर, टाकून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावे.

> नंतर त्यात कापलेला शेंगा टाकुन शिजेपर्यंत ढवळत राहावे साधारण 20 ते 25 मिनिटे नंतर भाजी बघावी शेंगा हाताने दाबल्यास मऊ लागतात. अशाप्रकारे स्वादिष्ट व रुचकर शेवगा शेंगा भाजी बनवावी,