दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकालाची तारीख जाहीर या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल निकाल

SSC board result 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. 

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी पालकांना होती. अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाची तारीख जाहीर केली. आपण केलेल्या अभ्यासाला फळ मिळणार आहे, यश मिळणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांना वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

कुठे पाहाता येतील निकाल
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी 1 नंतर उपलब्ध होतील. 

http://mahresult.nic.in 
http://sscresult.mkcl.org 
https://ssc.mahresults.org.in 

या अधिकृत साईटवर विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत.

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करणेबाबत.

shala praveshotsav

विषय: सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करणेबाबत.

संदर्भ: १. शासन निर्णय क्र. पीआरई २०१३/प्र.क्र. २०३/प्राशि-१, दि. ७ जून, २०१३ 

२. शासन निर्णय क्र उपक्रम २३१५/प्र.क्र.१२२ / एस. डी. ४, दि.०९.०६, २०१५

३. या कार्यालयाचे समक्रमांकाचे पत्र क्र. ३३९९ .९.०६.२०२२

उपरोक्त विषयान्वये कोव्हिड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद होत्या. कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासन स्तरावरुन शासन निर्णय दि. २०/०९/२०२२ •नुसार शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

मागील दोन वर्षातील कोव्हिड-१९ च्या परिस्थितीमुळे राज्यातील विद्याव्याचे नियमित शाळेत देणे बंद होते. या दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक अध्ययन कमाल पातळीपर्यंत झाले असल्याचापत स्पष्टता दिसून येत नाही. तसेच, शाळांमधील शैक्षणिक सोयी-सुविधांमध्ये सुद्धाअस्त-व्यस्त झालेली असणाची शक्यता नाकारता येत नाही,

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दि.१५.०६.२०२२ व विदर्भातील विद्याव्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दि.२७.०६.२०२२ रोजी प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची आद व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी विद्याथ्यांचं स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सूकतने होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभुमीवर 

सत्र २०२२-२३ मध्ये इयत्ता १ली ते १२वी मधील सर्व विद्यार्थ्याचे प्रवेशोस्तवाच्या प्रसंगी स्वागत करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पुढील प्रमाणे आपल्या स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी,

१. शाळेच्या परिसरातील (वयोगट ६ ते १४ वर्ष वयोगटातील सर्व विद्यायचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात यावी.

२. शाळाबाहा झालेली किंवा असलेल्या बालकांचा शोध शाळापूर्व तयारीच्या कालावधीमध्ये करण्यात यावा. निर्दशनास आल्यास अशा बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावेत, 

३. नजिकच्या परिसरातील दगडखानी, वीटभट्टी बांधकामाचे स्थळ, उद्याने, बाजार पेठा, पदपथ, सिग्नल, कुटीर उद्योग, कामगार वस्त्या या सारख्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे. 

४. शाळा प्रवेशाचा पहिल्या दिवशी आपण व आपल्या अधिनस्त प्रत्येक अधिकान्यांनी व्यक्तीश: किमान एका शाळेत जाऊन विद्याथ्यांचे शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन प्रबोधन करावे.

५. विद्यार्थ्याचे स्वागत फूल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य, स्थानिक स्त्रोत मध्ये उपलब्ध उपयोगी सामुग्री देऊन करण्यात यावे. मध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण करण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक इ. व्यवस्थापन करण्यास मार्गदर्शन करावे.

६. मागील दोन वर्षात विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नसल्याने सर्वा किमान पातळीपर्यंत आणण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक व शिक्षक यांशी विचार विमर्श करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतु अभ्यासक्रम, इतर विविध शैक्षणिक सघनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उद्बोधन व सहकार्य करावे.

७. शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाची स्थानिक पातळीवरील प्रसार माध्यमाद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी.

८. शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्याथ्यांचे, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्त इ. यांचे सहकार्य घेण्यात यावे.

९. तसेच संदर्भ क्र. २ मधील शासन निर्णयातील मार्गदर्शक निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

संबधित परिपत्रकाची PDF

वरिष्ठ  व निवड श्रेणी प्रशिक्षण दिनांक १ जून २०२२ पासून सुरू होत आहे 

वरिष्ठ  व निवड श्रेणी प्रशिक्षण दिनांक १ जून २०२२ पासून सुरू होत आहे 

सविस्तर माहिती खालील प्रमाणे

राज्यातील शिक्षक /मुख्याध्यापक/अध्यापकाचार्य/प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये दिनांक १ जून २०२२ पासून सुरू होत आहे. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकूण ९४,५४१ नोंदणी केलेल्या •प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक,

उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण

प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित

प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी

प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.

सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन

प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.. सदर प्रशिक्षणबाबतची सर्व माहिती दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता 

या यु टयूब लाईव्ह सत्राद्वारे देण्यात येणार आहे. 

प्रशिक्षणार्थीनीं सदर उद्बोधन सत्रास उपस्थित रहावे.

तसेच सर्व पात्र प्रशिक्षणार्थ्यांसाठी दिनांक १ जून २०२२ पासून ३० जून २०२२ पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन सत्राचे आयोजन देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत केले जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती दि. १ जून २०२२ रोजी आयोजित यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे दिली जाईल.

वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी

वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी.

ज्या शिक्षकांनी वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली आहे. अशा नोंदणी केलेल्या शिक्षकांचे नाव व त्यांची माहिती शाळेनिहाय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सदर यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला

1 खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला जिल्हा निवडण्याचा ऑप्शन येईल.

2. जिल्हा निवडल्यानंतर आपण आपला तालुका निवडा

3 तालुका निवडल्यानंतर आपल्याला तालुक्यातील शाळांची यु-डायस सह लिस्ट समोर येईल.

4. यातून आपण आपल्या शाळेचा यु-डायस समोरील शो बटनावर क्लिक करा.

5 आपल्याला आपल्या शाळेतील वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षकांची यादी व सर्व माहिती दिसेल.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://training.scertmaha.ac.in/Lists/SchoolList.aspx

इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.

निष्ठा प्रशिक्षण पूर्ण शेवटची संधी 1 ते 12 कोर्स पुन्हा एकदा सुरु

निष्ठा प्रशिक्षण पूर्ण शेवटची संधी 1 ते 12 कोर्स पुन्हा एकदा सुरु

दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली होती .देशामधील प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA ३.० FLN (National Initiative For School Head’s and Teachers Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात  आले आहे . सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश  आहे.  

nishtha
nishtha

     अनेक शिक्षकांना काही कारणास्तव यातील काही  कोर्स पूर्ण करता आले नाही त्यांच्या सोयीकरिता कोर्स क्रमांक १ ते १२ पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेले आहे. ज्या शिक्षकांचे हे कोर्स राहिले असतील त्यांनी दिनांक 30 जून २०२२ पर्यंत  आपले राहिलेले कोर्स पूर्ण करावेत  या  १ ते १२ कोर्सची  लिंक   ते खालील प्रमाणे  आहे 

🟣1 ते 12 कोर्स पुन्हा एकदा सुरु🟣

🟦निष्ठा प्रशिक्षण पूर्ण शेवटची संधी🟦

💊विषय :- निष्ठा प्रशिक्षण ३.० (FLN)प्रशिक्षण

🔰कालावधी -30 जून पर्यंत पूर्ण करायचे आहे

 🌐कोर्स क्रमांक 1 व 12 मोड्यूलची लिंक👇🏻🔰

🚩निष्ठा कोर्स क्र -१

येथे क्लिक करा. 

 🚩निष्ठा कोर्स क्र -2

येथे क्लिक करा. 

🚩निष्ठा कोर्स क्र -3

येथे क्लिक करा. 

🚩निष्ठा कोर्स क्र -4

येथे क्लिक करा. 

🚩निष्ठा कोर्स क्र -5

येथे क्लिक करा. 

🚩निष्ठा कोर्स क्र -6

येथे क्लिक करा. 

🚩निष्ठा कोर्स क्र -7

येथे क्लिक करा. 

🚩निष्ठा कोर्स क्र -8

येथे क्लिक करा. 

🚩निष्ठा कोर्स क्र-9

येथे क्लिक करा. 

🚩निष्ठा कोर्स क्र-10

येथे क्लिक करा. 

🚩निष्ठा कोर्स क्र-11

येथे क्लिक करा. 

🚩निष्ठा कोर्स क्र-12

येथे क्लिक करा. 

विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत.

विषय: विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत.

उपरोक्त विषयाबाबत मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांनी मा.मंत्री (ग्रामविकास) महोदयांना लिहिलेलं पत्र सोबत जोडले आहे. सदर पत्रावर मा.मंत्री (ग्रामविकास) महोदयांनी “तपासून सादर करावे असे निर्देश दिलेलं आहेत.

      शालेय शिक्षण विभागाच्या गुणोत्तर वाढीसाठी क्षेत्रिय स्तरावरील विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख हो पदे महत्वाची असून राज्यामध्ये सदरची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने सदर पदांची भरती  करण्यासाठी लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार विचारणा होत असल्याचे प्रस्तुत पत्रात नमूद केले आहे.

प्रस्तुत प्रकरणाच्या अनुषंगाने असे नमूद करण्यात येते की, या विभागाच्या दिनांक १०.६.२०१४ च्या अधिसूचनेनुसार विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदाकरिता सरळसेवा निवडीद्वारे व पदोन्नतीद्वारे अनुक्रमे ५०:२५:२५ असं नेमणूकीचं प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. सरळसेवा भरतीसंदर्भाांत शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या मर्यादेत सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याबाबत तसेच पदोन्नती व विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे रिक्त पदे भरण्याबाबत आपल्या अधिपत्याखालील जिल्हा परिषदांकडील रिक्त पदांचा आढावा घेऊन सदर पदं भरण्याबाबत दिनांक २० मे, २०२२ पर्यंत कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात यावा.

विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत

 विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख पदे भरण्याकरिता 

   🎯   शैक्षणिक पात्रता कोणती असेल ? 

  🎯 निवड पद्धती कशी असेल 

  🎯 अभ्यासक्रम  कोणता असेल ?

  🎯वयोमर्यादा  किती आहे ? 

  🎯परीक्षेचे स्वरूप  कसे असेल ? 

 🎯कोणते पुस्तक वापरावे ?

 🎯 एकूण किती पदांची जाहिरात ?

याबाबतचा सविस्तर व्हिडिओ  

 माहिती करिता  पीडीएफ

 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरांत सुधारणा करणेबाबत. शासन निर्णय दिनांक 20 एप्रिल 2022 

Transport Allowance

 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरांत सुधारणा करणेबाबत. शासन निर्णय दिनांक 20 एप्रिल 2022 

   केंद्र शासनाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अनुषंगाने वरील (८) व (९) येथील अनुक्रमे दि. ०७ जुलै, २०१७ व दि. ०२ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या आदेशान्वये त्यांच्या कर्मचाऱ्याच्या निवासस्थानापासून कर्तव्य स्थानापर्यंतच्या प्रवासावरील खर्चाची भरपाई म्हणून सुधारीत दराने वाहतूक भत्ता (Transport Allowance) मंजूर केलेला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम, २०१९ अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि. ०१ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर केलेल्या वाहतूक भत्त्याच्या दरांत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

शासन असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या वाहतूक भत्त्याचे दर खालील तक्त्यात दर्शविल्या प्रमाणे सुधारण्यात यावेत.

शासन निर्णय क्रमांकः वाहम-२०२०/प्र.क्र.०३/२०२०/सेवा-५

हे आदेश दि.०१.०४.२०२२ पासून अंमलात येतील.

उपरोक्त एस-१ ते एस-६ या वेतन स्तर मधील रु.२४२००/- व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूह मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.२७०० व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.१३५० इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील.

तसेच अंध, अस्थिव्यंगाने अधु आणि कण्याच्या विकाराने पीडीत असणाऱ्या तसेच मुकबधीर / श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सध्या अनुज्ञेय असणाऱ्या वाहतूक भत्त्यामध्ये पुढील प्रमाणे वाढ करण्यात येत आहे.

अंध, अस्थिव्यंगाने अधु आणि कण्याच्या विकाराने पीडीत असणाऱ्या तसेच मुकबधीर / श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या उपरोक्त एस-१ ते एस-६ या वेतन स्तर मधील रु.२४२००/- व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूह मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.५४०० व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.२७०० इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील.

२. या आदेशातील वाहतूक भत्त्याचे प्रदान खाली नमूद केलेल्या अटींच्या अधीन आणि त्यानुसार विनियमित करण्यात येईल.

एक) कर्तव्य स्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

दोन) ज्या कर्मचाऱ्यांना शासकीय वाहतूक सुविधा पुरविण्यात आली आहे. त्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

तसेच वाहतूक भत्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात इतर विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

३. रजा, प्रशिक्षण, दौरा इत्यादी कारणांमुळे संपूर्ण कॅलेंडर महिन्यात अनुपस्थित असल्यास त्या महिन्यात हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

४. शासन असेही आदेश देत आहे की, सर्व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांतील पूर्णकालीक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कृषि व कृषितर विद्यापीठांमधील व तत्संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सदरहू आदेश लागू असतील.

५. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा अधिनियम क्रमांक ५) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार व त्यासंबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करुन शासन असेही आदेश देत आहे की, जिल्हा परिषदांच्या पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना हे आदेश योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात यावेत.

६. शासन असेही आदेश देत आहे की, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनमानानुसार वेतन घेणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांनाही हे आदेश लागू करण्यात यावेत.

७. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यावरील खर्च त्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था, नगरपालिका व जिल्हा परिषदा यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०४२०१२५५१०७२०५ असा आहे.

सदर आदेश पीडीएफ स्वरूपात 

नियमित अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करण्यासाठी

येथे क्लिक करा

100 +प्रगती पुस्तकातील  विशेष प्रगती नोंदी

येथे क्लिक करा

मूल्यमापन वर्गनिहाय नोंदी 

 येथे क्लिक करा 

50 + आवश्यक सुधारणा वर्णनात्मक नोंदी

आकारिक मूल्यमापन करताना आपणास विद्यार्थ्यांच्या मध्ये आढळणारे आवश्यक सुधारणा या देखील प्रगती पुस्तकांमध्ये नोंदवावे लागतात .  अशा 50 + आवश्यक सुधारणा वर्णनात्मक नोंदी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत .या बरोबरच या संकेतस्थळावर आकारिक मूल्यमापन नोंदी ,विद्यार्थ्यांचे आवड छंद नोंदी , विशेष प्रगती नोंदी तसेच आकारिक व संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका इयत्ता निहाय उपलब्ध आहेत .

आवश्यक सुधारणा नोंदी भाग १

आवश्यक सुधारणा नोंदी भाग २

६० + आवड / छंद नोंदी

येथे क्लिक करा

100 +प्रगती पुस्तकातील  विशेष प्रगती नोंदी

येथे क्लिक करा

६०+ आवड व छंद – वर्णनात्मक नोंदी

आपणास आकारिक मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांचे आवड व छंद प्रगती पुस्तकांमध्ये नोंदवावे लागतात  आवड छंद नोंदवण्यात करिता  या ठिकाणी 60  ही पेक्षा अधिक आवड छंद वर्णनात्मक नोंदी नमुना म्हणून देण्यात आलेले आहे .असे त्या संकेतस्थळावर आपल्या आकारिक मूल्यमापनाची नोंदी प्रश्नपत्रिका ,  अडथळ्याच्या नोंदी वर्णनात्मक नोंदी , विशेष प्रगती नोंदी या उपलब्ध आहेत .

आवड व छंद वर्णनात्मक नोंदी भाग १

आवड व छंद वर्णनात्मक नोंदी भाग 2

आवड व छंद वर्णनात्मक नोंदी भाग 3

 50+ आवश्यक  सुधारणा नोंदी

येथे क्लिक करा

100 +प्रगती पुस्तकातील  विशेष प्रगती नोंदी

येथे क्लिक करा

100 + विशेष प्रगती नोंदी | vishesh pragati nondi

विशेष प्रगती नोंदी , vishesh pragati nondi ,व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी प्रगतीपुस्तकातील नोंदी आकारीक मूल्यमापन नोंदी

या ठिकाणी आपणास प्रगती पुस्तकात नोंदवण्यासाठी विशेष प्रगती नोंदी vishesh pragati nondi देण्यात आलेल्या आहेत. या विशेष प्रगती नोंदी नाच आपण व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी असे देखील म्हणतो .  या ठिकाणी आपणास 100 पेक्षा जास्त विशेष प्रगती नोंदी  उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत .या नोंदींचा वापर आपण नमुना नोंदी म्हणून करू शकता. तसेच या बरोबर या संकेत स्थळावर आपणास आकारिक मूल्यमापन करता आवश्यक असणाऱ्या वर्णनात्मक नोंदी अडथळ्याच्या नोंदी आवड छंद नोंदी,कोविड काळातील वर्णनात्मक नोंदी अशा सर्व प्रकारच्या नोंदी उपलब्ध आहेत. तसेच आपल्या इयत्तानिहाय  नोंदी उपलब्ध आहेत .

विशेष प्रगती नोंदी भाग १ vishesh pragati nondi

विशेष प्रगती नोंदी भाग २

विशेष प्रगती नोंदी भाग ३

विशेष प्रगती नोंदी भाग ४

विशेष प्रगती नोंदी भाग ५

विशेष प्रगती नोंदी भाग ६

60+ आवड छंद नोंदी साठी

येथे क्लिक करा.

 50+ आवश्यक  सुधारणा नोंदी

येथे क्लिक करा

व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी

सुधारणा आवश्यक नोंदी,

कोविड काळातील वर्णनात्मक नोंदी

वर्णनात्मक नोंदी 2021,वर्णनात्मक नोंदी 2022,

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी

1ली नोंदी

आकारिक मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

5 वी ते 7 वी वर्णनात्मक नोंदी