सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करणेबाबत.

विषय: सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करणेबाबत.

संदर्भ: १. शासन निर्णय क्र. पीआरई २०१३/प्र.क्र. २०३/प्राशि-१, दि. ७ जून, २०१३ 

२. शासन निर्णय क्र उपक्रम २३१५/प्र.क्र.१२२ / एस. डी. ४, दि.०९.०६, २०१५

३. या कार्यालयाचे समक्रमांकाचे पत्र क्र. ३३९९ .९.०६.२०२२

उपरोक्त विषयान्वये कोव्हिड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद होत्या. कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासन स्तरावरुन शासन निर्णय दि. २०/०९/२०२२ •नुसार शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

मागील दोन वर्षातील कोव्हिड-१९ च्या परिस्थितीमुळे राज्यातील विद्याव्याचे नियमित शाळेत देणे बंद होते. या दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक अध्ययन कमाल पातळीपर्यंत झाले असल्याचापत स्पष्टता दिसून येत नाही. तसेच, शाळांमधील शैक्षणिक सोयी-सुविधांमध्ये सुद्धाअस्त-व्यस्त झालेली असणाची शक्यता नाकारता येत नाही,

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दि.१५.०६.२०२२ व विदर्भातील विद्याव्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दि.२७.०६.२०२२ रोजी प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची आद व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी विद्याथ्यांचं स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सूकतने होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभुमीवर 

सत्र २०२२-२३ मध्ये इयत्ता १ली ते १२वी मधील सर्व विद्यार्थ्याचे प्रवेशोस्तवाच्या प्रसंगी स्वागत करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पुढील प्रमाणे आपल्या स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी,

१. शाळेच्या परिसरातील (वयोगट ६ ते १४ वर्ष वयोगटातील सर्व विद्यायचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात यावी.

२. शाळाबाहा झालेली किंवा असलेल्या बालकांचा शोध शाळापूर्व तयारीच्या कालावधीमध्ये करण्यात यावा. निर्दशनास आल्यास अशा बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावेत, 

३. नजिकच्या परिसरातील दगडखानी, वीटभट्टी बांधकामाचे स्थळ, उद्याने, बाजार पेठा, पदपथ, सिग्नल, कुटीर उद्योग, कामगार वस्त्या या सारख्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे. 

४. शाळा प्रवेशाचा पहिल्या दिवशी आपण व आपल्या अधिनस्त प्रत्येक अधिकान्यांनी व्यक्तीश: किमान एका शाळेत जाऊन विद्याथ्यांचे शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन प्रबोधन करावे.

५. विद्यार्थ्याचे स्वागत फूल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य, स्थानिक स्त्रोत मध्ये उपलब्ध उपयोगी सामुग्री देऊन करण्यात यावे. मध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण करण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक इ. व्यवस्थापन करण्यास मार्गदर्शन करावे.

६. मागील दोन वर्षात विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नसल्याने सर्वा किमान पातळीपर्यंत आणण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक व शिक्षक यांशी विचार विमर्श करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतु अभ्यासक्रम, इतर विविध शैक्षणिक सघनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उद्बोधन व सहकार्य करावे.

७. शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाची स्थानिक पातळीवरील प्रसार माध्यमाद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी.

८. शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्याथ्यांचे, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्त इ. यांचे सहकार्य घेण्यात यावे.

९. तसेच संदर्भ क्र. २ मधील शासन निर्णयातील मार्गदर्शक निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

संबधित परिपत्रकाची PDF