पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस बारावा | Bridge Course 2022-23
पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस बारावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 12
Highlight
Erase
समजून घेऊया : घरगुती उपचार, आरोग्य सेवा
संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 12, छोटे आजार आणि घरगुती उपचार
अध्ययन निष्पत्तीः निरीक्षणे / अनुभव / माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात, आरोग्य रक्षण करण्यासाठी उपाय समजून घेतात. आरोग्य सेवांची माहिती सांगतात.
सराव करूया :
प्र.1 ) पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल?
उत्तर – ……………………………………….
अ) रविवार सुट्टीचा दिवस होता. सर्व दवाखाने बंद होते. बबनच्या शरीराचा ताप कमी होत नव्हता.
उत्तर – ……………………………………….
ब) मैदानात खेळताना सोनम खाली पडली. तिच्या हाताला दुखापत झाली आहे.
उत्तर – ……………………………………….
प्र. 2) तुम्ही अनुभवलेल्या कोणत्याही आजाराचे व त्यावर केलेल्या उपायांचे थोडक्यात वर्णन करा.
उत्तर – ……………………………………….
प्र. 3) तुमच्या शाळेत असलेल्या प्रथमोपचार पेटीतील कोणत्याही चार साहित्यांची नावे लिहा.
उत्तर – ……………………………………….
प्र. 4) पावसाळ्यात पाणी उकळून पिण्याचा सल्ला का दिला जातो ?
उत्तर – ……………………………………….
विषय – परिसर अभ्यास
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१) शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला?
उत्तर :………………………………
२) सिद्धी जौहर का चवताळला?
उत्तर :……………………………..
३) बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली?
उत्तर :……………………………..
उपक्रम- शिवरायांच्या सेवेमधील स्वामीनिष्ठ सेवकांची यादी करा.
पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस बारावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या..
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचयातील काही शब्द फळ्यावर लिहावेत व असे दोन भिन्न शब्दांपासून बनलेले, विद्यार्थाना माहित असणारे शब्द सुचविण्यास सांगावे.
उदा. अवतीभवती, बारीकसारिख, पालापाचोळा
शिक्षकांनी इ. ३ री च्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील “मुग्धा लिहू लागली” पाठाचे प्रकटवाचन करावे व विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक श्रवण करून यातील जोडशब्द वहीत लिहिण्यास सांगावे.
+ सक्षम बनू या..
विद्यार्थ्यांना त्यांच्या भावविश्वातील अपूर्ण जोडशब्द देऊन ते पूर्ण करून लिहिण्यास सांगावे.
जोडशब्द का वापरले जातात? याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करून इतर
जोडशब्दांचे अर्थ सांगण्यास प्रोत्साहित करावे.
उदा. लहानसहान – कमी आकाराचे
आबालवृद्ध लहानांपासून मोठ्यांपर्यंत
4 सराव करू या..
शिक्षकांनी पठीत किंवा अपठीत उतान्यातील जोडशब्द शोधण्यास प्रेरित करावे. जोडशब्द असणारा परिच्छेद निवडून त्यातील जोडशब्द शोधण्यास विद्याथ्र्यांना प्रेरित करावे.
विषय – गणित
संबोध कोपरा
܀ दशकांचा गुणाकार.
२x१० म्हणजे २ ची १० पट म्हणजेच २ दाहे वीस.
६x१० म्हणजे ६ ची १० पट म्हणजेच ६ दाहे ६०.
१२x१० म्हणजे १२ ची १० पट म्हणजेच १२ दाहे १२०.
३० x १० म्हणजे ३० ची १० पट म्हणजेच ३० दाहे ३००.
‘एखाद्या संख्येला १० ने गुणले म्हणजे त्या संख्येच्या पुढे एक शून्य लिहितात.’ जर गुणाकारात दोन्ही संख्यांच्या एकक स्थानी शून्य असेल तर?
जसे १) १०x ३० म्हणजे ३००.
म्हणजेच १ द x ३द = ३ शतक
२) ६० x ४० = ६ द x ४ द = २४ शतक = २४००
३) ७० x ५० = ७५ x ५द = ३५ शतक = ३५००
‘जर गुणाकारात दोन्ही संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असेल तर त्यांचा गुणाकार करताना दशक स्थानाच्या अंकांचा गुणाकार करून त्याच्यापुढे दोन वेळा शून्य लिहितात.’
पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस बारावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
“गुणेश सकाळी लवकर उठला.” हे वाक्य ‘उठला’ या शब्दानंतर संपले म्हणून आपण त्या नंतर (.)असे चिन्ह लिहितो.त्याला पूर्णविराम असे म्हणतात हे शिक्षक मुलांच्या लक्षात आणून देतील. आणखी दोन- तीन वाक्ये देऊन पूर्णविरामाची ओळख करून द्यावी. त्यानंतर अशाच पद्धतीने प्रश्नचिन्हाची ओळख करून द्यावी. आपण प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नचिन्ह (?) देतो. फळयावर असे एखादे वाक्य लिहून या वाक्यात प्रश्न विचारला असेल तर प्रश्नचिन्ह नसेल तर पूर्णविराम दे अशी सूचना देवून दोन्ही विरामचिन्हांची एकत्रित ओळख करून द्यावी. प्रश्नचिन्ह किंवा पूर्णविराम यापैकी योग्य विरामचिन्हे दे.
१) तुझे नाव काय
२) माझे बाबा हॉलीबॉल खेळतात
> सराव करू या :
• फळ्यावर वेगळे शब्द देऊन अशाच पद्धतीने सामुहिक सराव घ्यावा.
दोन्ही विरामचिन्हांच्या सरावासाठी काही वाक्ये द्यावी.
> कल्पक होऊ या-:
मुलांना शब्द देऊन त्यावर जास्तील जास्त वाक्ये तयार सांगावे. सुरूवातीला गटात व नंतर वैयक्तिकरित्या लिहण्यास सांगावे. दोन दोन मुलांच्या जोड्या करून एकाने प्रश्न विचारायचा व दुसऱ्याने उत्तर सांगायचे असा खेळ आलटून पालटून घेता येईल. ही वाक्ये वहीत लिहायला सांगून योग्य विरामचिन्हांचा वापर करण्यास सांगावे.
विषय – गणित
थोडे आठवूया
घटकाचे नाव – बेरीज
दिवस – बारावा
• मैदानावर ३ मुले खेळत होती. अजून २ मुले आली तर मैदानावर एकूण किती मुले झाली ?
आईने कविताला डब्यात ठेवण्यासाठी २६ लाडू दिले. ताईने पुन्हा १२ लाडू दिले, तर कविताने एकूण किती लाडू डब्यात ठेवले?
• गोष्टीच्या पुस्तकातील ३० पाने गौतमने काल वाचली. आज त्याने उरलेली पाने वाचली, तर ते पुस्तक किती पानांचे होते?
सोडवून पाहू….
१. माईकडे १८ टिकल्या होत्या. सीमाकडे २१ टिकल्या होत्या, तर दोघींकडे मिळून एकूण किती टिकल्या होत्या ?
२. टोपलीत ३३ जांभळे होती. शाहिदने त्यात ५४ करवंदे ठेवली, आता टोपलीत एकूण किती फळे झाली?
३. खेळण्याच्या दुकानातील बाहुल्यांपैकी ४२ बाहुल्या गीताने घेतल्या. दुकानात अजून ३७ बाहुल्या शिल्लक होत्या, तर दुकानात एकूण किती बाहुल्या होत्या?
विषय – इंग्रजी
विषय – परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : १२ आपले कपडे
समजून घेऊ या : ऋतू आणि कपडे कपड्यांचे प्रकार व उपयोग.
संदर्भ : कापडाच्या विविध प्रकारांची ओळख (इयत्ता दुसरीच्या ‘खेळू, करू, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ.क्र.५० ते ५३) अध्ययन निष्पत्ती : अन्न, वस्त्र व निवारा यांच्याशी संबंधित उपक्रमात सहभागी होतो. लक्षात घेऊ या :
सराव करू या :
प्रश्न १) उत्तरे लिहा.
१) एका वर्षात कोणकोणते ऋतू आपण अनुभवतो?
२) उन्हाळ्यात लोकरी कपडे घातले, तर काय होईल?
३) प्राणी कपडे घालत नाही मग थंडीपासून त्यांचे रक्षण कसे होते?
४) रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसात करतात?
प्रश्न २) यादी करा.
१) तुमच्या परिसरात वापरल्या जाणाऱ्या कपड्यांची यादी करा.
२) अभय आणि अजय यांना सहलीकरिता थंड हवेच्या ठिकाणी जायचे आहे. त्यांनी सोबत कोणकोणते कपडे घ्यावे असे तुम्हाला वाटते?
प्रश्न ३) हे करा.
१) वेगवेगळ्या प्रकाराच्या कपड्यांचे नमुने गोळा करा. २) कपड्याच्या दुकानातील तुम्हाला आवडलेल्या एखाद्या कपड्याचे चित्र काढा व रंग भरा.
पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस बारावा| Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या:
1) दोन मुलांना पाठीला पाठ लावून बसायला सांगा. दोघांच्या हातात रंगीत कागदाचे किंवा
घोटीव कागदाचे तुकडे द्या.
2) एका मुलाला तुकडे जमिनीवर प्रथम मांडायला सांगा. मांडत असताना तो ते तुकडे कसे मांडत
आहे ते सांगायला सांगा. जसे लाल कागदाचा तुकडा खाली ठेवला. त्याच्या डाव्या बाजूला हिरवा तुकडा ठेवला. हिरव्या तुकड्याच्या खाली पांढया रंगाचा तुकडा ठेवला. 3) पहिल्या मुलाने जसे सांगितले तशीच कृती दुसरा मुलगा कृती करेल. ( या उपक्रमातून पहिल्या मुलाने आपल्या कृतीचे नेमक्या शब्दात वर्णन करणे आणि दुसऱ्या मुलाने बारकाईने ऐकून त्यानुसार कृती करणे अशा दोन्ही गोष्टी तपासल्या जातात. यात एक आव्हान असते. त्यामुळे अधिक लक्षपूर्वक काम केले जाते आणि मजाही येते.)
• सक्षम बनू या –
चित्र पहा त्याविषयी दोन तीन वाक्य सांगा. हाच खेळ वेगवेगळ्या पध्दतीने घेता येईल. 1) दोन मुलांना पाठीला पाठ लावून बसायला सांगा. दोघांच्या हातात कागद आणि पेन्सिल द्या. 2) एक मुलगा चित्र काढेल आणि तो कसे काढतो आहे ते बारकाईने दुसऱ्याला सांगत जाईल जसे, ‘ मी कागदाच्या वरच्या बाजूला एक आडवी रेघ काढली, मग त्या रेषेवर मध्यभागी एक साधारण बांगडी एवढा गोल आकार काढला…
३) ‘पहिल्या मुलाने जसे सांगितले तसे दुसरा मुलगा चित्र काढत जाईल. (दोन्ही मुलांना चित्र काढणे हे अधिक आव्हानात्मक असते. आव्हाने कठीण करत जाणे हे शिक्षणात हवे असते व मुलांना आनंददायी असते.)
चला सराव करूया
1) वरील कृतींचा गरजेनुरूप विविध वस्तू वापरून अधिकाधिक सराव घ्या.
• कल्पक बनूया
मुलांना विचारा हा खेळ आपण अजून कशाप्रकारे घेवू शकतो. जसे पाठीवर अक्षरे लिहिणे व ओळखायला सांगा.
पाठीवर मुलामुलींची, वस्तूंची, प्राण्यांची, फुलांची इ. अटी घालून नावे गिरवणे व ओळखणे.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
Learning Activity: Teacher will read the story and ask the students to listen carefully and arrange the pictures sequentially.
(Priya had a dog. Once the dog got dirty in a puddle. Priya kept the dog in the bathing tub. She showered him to make him cleaner. Then she wiped him with a towel.)
Listen and arrange the events in a story as per their order by giving numbers in a sequence.
पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
सराव करू या!
कृती- १ वरीलप्रमाणे विविध उदाहरणे, उपक्रम यांद्वारे शिक्षकांनी अधिकाधिक उदाहरणांचा सर्व करून घ्यावा. कृती- २ खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखा आणि ती कोणत्या शब्दांशी जोडली गेली आहेत
ते लिहा
१. त्याचे घर शाळेसमोर आहे.
२. मी जेवणानंतर खेळायला जातो.
३. ललितने झाडावर चढून आंबे तोडले.
४. आपण देशासाठी वेळ देणार आहोत की नाही?
५. घराबाहेर जाताना सर्व दिवे आणि नळ आठवणीने बंद करावेत.
• कल्पक होऊ या!
खाली दिलेल्या शब्दांचा ‘क्रियाविशेषण’ आणि ‘शब्दयोगी’ अव्यय असा दोन्ही प्रकारे उपयोग करून प्रत्येकी दोन वाक्ये लिहा. समोर, पूर्वी, मागे, खाली, जवळ, बाहेर, पुढे, नंतर.
पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
सक्षम बनू या
विशेषण
फाटका
कृती-१ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काय ? कसे? कोण? कुठे ? असे प्रश्न विचारून विद्यार्थ्याना बोलते करावे, विचारप्रवृत्त करावे. सुधा आंबा खाते. राजेश आंबा खातो. अशी विविध उदाहरणे देऊन उताऱ्यातील विविध नाम बदलून त्यानुसार विशेषण, क्रियापद कसे बदलते यावर चर्चा करून आपली वाक्य पुन्हा लिहिण्याचा सराव द्यावा.
कृती-२ समजून घेऊ विशेषणाचे प्रकार.
(शिक्षकांनी विशेषणाचे गुणवाचक,संख्यावाचक व सार्वनामिक या तीन प्रकारांची व्याख्या व काही उदाहरणांसह चर्चा तसेच पान नं. ४१ वरील तक्त्याचे वाचन घ्यावे.)
पुढील परिच्छेदाचे वाचन करून त्यातील नाम व त्यांची विशेषणे खाली दिलेल्या तक्त्यात मांडूया.
एका लहानशा खोलीमध्ये राजू दुपारी अभ्यास करत बसला होता. शेजारीच पाळण्यात लहान बाळ झोपले होते. ते छोटेसे बाळ अचानक रडू लागले. राजूने खूप वेळा झोका दिला. जितका झोका देई तितके बाळ दुप्पट रडू लागले. तितक्यात आई आत आली. आईला पहाताच बाळ हसले. राजूने लाल खुळखुळा दाखवून वाजवला. बाळाच्या दोन्ही गालावर खळ्या पडल्या. आई आणि राजू दोघांना आनंद झाला.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान
कृतिपत्रिका : 11
: कार्य व ऊर्जा संकल्पना, कार्य आणि ऊर्जा संबंध.
समजून घेऊ या
संदर्भ : इयत्ता सहावी, प्रकरण ॥ कार्य आणि ऊर्जा.
अध्ययन निष्पत्ती : दैनंदिन जीवनात शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा वापर करतात. प्रक्रिया व घटना स्पष्ट करतात. उदा. ऊर्जेची रुपे, रचना, उपलब्ध स्त्रोतांचा वापर, नियोजन ई. बाबींमध्ये सर्जनशीलता प्रदर्शित करतात.
1. प्रत्येक क्रिया करताना बल लावणे आवश्यक आहे का ?
2. बलामार्फत कार्यात रूपांतर होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?
3. काय सांगाल ?
a) विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल ?
b) कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागतो ?
4. पृथ्वीवरील वातावरणाला सूर्याची कशा प्रकारे मदत होते ते लिहा.
5. सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो?
6. ऊर्जा स्त्रोत कशाला म्हणता येईल?
7. दिवाळीमधे तुम्ही जे फटाके फोड़ता त्यात कोणत्या प्रकारची ऊर्जा साठवलेली असते ?
8. उदाहरण दया.
प्रकाश ऊर्जा ……………..
ध्वनी ऊर्जा………………
रासायनिक ऊर्जा -……………..
9. आपल्या घरात, परिसरात कोणकोणत्या ऊर्जेची उदाहरणे तुम्हाला बघायला मिळतात? आपल्या मित्रांशी चर्चा करून लिहा.
विषय – इतिहास ना.शास्त्र
पहिले काही बाबी आठवूयात:
१) मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली?
उत्तर :
२) चंद्रगुप्त मौर्य विषयी माहिती सांगा.
उत्तर :
३) सम्राट अशोकाने कधी हि युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला?
उत्तर :
४) सम्राट अशोक यांनी केलेली लोकपयोगी कामे सांगा.
उत्तर :
५) बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणाला पाठवले?
उत्तर :
कृती :
१) शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते ते पाठात शोधा.
उत्तर:
२) शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्कारणारे कोण होते ?ते शोधा.
उत्तर :
३) रोहिड खोऱ्याच्या देश्मुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली ते शोधा.
उत्तर :
४) शिवाजी महाराजांनी कोणते संस्कार व विचार भावी पिढ्यांना आदर्श ठरतील ते शोधा..
उत्तर :
काय समजले?
३) वरील कृती केल्यावर तुला पाठ क्र८. वा. आदर्श राज्यकर्ता संदर्भात काय समजले. ते थोडक्यात लिहा ?
उत्तर :
विषय – भूगोल
यांची उत्तरे शोधू –
ऋत्र 1 : पृथ्वीवरील संसाधनांच्या साठ्याचा तारतम्याने वापर करणे आवश्यक का आहे?
प्रश्न 2 : विनाकारण विद्युत उपकरणे सुरु असल्यास काय करावे? का?
प्रश्न 3 : विविध समारंभात मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होताना दिसते. यावर कोणता उपाय करता येईल?
पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
आव्हान कोपरा –
खालील उदाहरणे सोडव.
1) संदेशला 27, 459 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 24,575 रुपये आहेत, तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल ?
2) पहिल्या वर्षी एका साखर कारखान्यात 26,37,356 पोती साखर तयार झाली, दुसऱ्या वर्षी 34,92,978 पोती साखर तयार झाली. तर कारखान्यात दुसऱ्या वर्षी किती पोती जास्त साखर तयार झाली ?
विषय – इंग्रजी
विषय – परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 11
समजून घेऊ या: पाण्याचे प्रदूषण, सांडपाणी व विल्हेवाट, पाण्याचे शुद्धीकरण.
संदर्भ : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक १६ पाणी
विषय – परिसर अभ्यास
करून पाहूयात –
१. तुझ्या घराजवळील दुकानदार किंवा व्यापारी त्याच्या व्यापाराच्या नोंदी कशा करतो याची माहिती मिळव.
२. शक्य असेल तर भाजी मंडईमध्ये लिलाव कसा होतो त्याचे निरीक्षण कर.
आवश्यक साहित्य – विविध देशांच्या लिपी, आंतरजाल, मोबाईल
अध्ययन अनुभव / कृती – इयत्ता : पाचवी, विषय: परिसर अभ्यास २, घटक – ९. स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती
उपघटक ९.४ पासून पुढे
काय समजले? – वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१. नगरांचा उदय कसा झाला?
उत्तर – …………………………………
२. सांकेतिक खुणा व चिन्हांचे संस्करण का करण्यात आले?
पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
•उद्गारवाचकचिन्ह वाक्यात केव्हा केव्हा वापरतात हे शिक्षकांनी स्पष्ट करावे, उदाहरणे द्यावी व याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करावी. उद्गारवाचकचिन्ह वाक्यात लिहून दाखवावे व
विद्यार्थांकडून सराव करून घ्यावा.
+ सराव करू या
कृती- १ शिक्षकांनी स्वल्पविराम नसलेली वाक्ये विद्यार्थ्यांना द्यावीत त्याचा वैयक्तिक व गटात
सराव करून घ्यावा.
(अ) पुढील वाक्ये वाचा व त्यात योग्य विरामचिन्ह लिहून वाक्य पुन्हा लिहा.
1. आमच्या वागेत आंबा चिकू पेरू ही फळझाडे आहेत.
2. विद्यार्थी मित्रांनो उद्या शाळेला सुट्टी आहे.
३. अनिलला मराठी गणित विज्ञान हे विषय आवडतात.
(आ). पुढीलपैकी कोणत्या वाक्यात स्वल्पविराम आला आहे ते ओळखा व ते वाक्य पुन्हा लिहा..
1. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
२. पण नदी कशी बोलणार?
३. माधवने कोबी, मटार, भेंडी, पालक, मुळा ह्या भाज्या आणल्या.
कृती- २ शिक्षकांनी विरामचिन्ह नसलेली वाक्ये विद्यार्थ्यांना द्यावी व त्याचा
वैयक्तिक व गटात सराव करून घ्यावा.
(अ) पुढील वाक्ये वाचा व त्यात योग्य विरामचिन्ह लिहून वाक्य पुन्हा लिहा.
1. इंद्रधनुष्यात किती रंग असतात
2. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते
३. तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता
(आ) त्याने असे का केले असेल ? या वाक्यात कोणते विरामचिन्ह आले आहे.
(इ). पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रश्नचिन्ह आले आहे ते ओळखा व ते वाक्य पुन्हा लिहा.
1. तू नेहमी शाळेत जा.
२. “अबब! केवढा मोठा प्राणी हा !”
३. विद्यार्थ्याला पुस्तक कोणी दिले?
कृती -३ शिक्षकांनी विरामचिन्ह नसलेली वाक्ये विद्यार्थ्यांना द्यावी व त्याचा वैयक्तिक
व गटात सराव करून घ्यावा.
(अ) पुढील वाक्ये वाचा व त्यात योग्य विरामचिन्ह लिहून वाक्य पुन्हा लिहा.
1. शाबास उत्तम गुण मिळवलेस
2. अरे वा चिमुकल्यांनो
३. आता काय बोलाव कपाळ
(आ) काय तो चमत्कार ! या वाक्यात कोणते विरामचिन्ह आले आहे.
(इ). पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उद्गारचिन्ह आले आहे ते ओळखा व ते वाक्य पुन्हा लिहा.
1. भारत माझा देश आहे.
२. किती ताजेतवाने झाल्यासारखे वाटते !
३. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ?
कल्पक होऊ या
कृती- १ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील कृती करायला सांगावे.
१.. बागेतील किंवा इतर ठिकाणावरील सूचनांमध्ये स्वल्पविराम असलेली वाक्ये लिहा. २. दररोजच्या बोलण्यामध्ये ज्या वाक्यामध्ये स्वल्पविराम असतो अशी पाच वाक्य लिहा.
कृती-२ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील कृती करायला सांगावे.
१. खूप पाऊस पडला? २. खूप पाऊस पडला.
या दोन वाक्यात प्रश्नचिन्ह असताना आणि नसताना वाक्याच्या अर्थामध्ये काय बदल होतो याविषयी चर्चा करा.
२.? | या चिन्हातून तुम्हाला कोणती चित्रे सुचतात. या आकारावरुन तुम्हाला आवडेल असे
एक चित्र काढा व त्याला रंग द्या..
कृती- ३ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील कृती करायला सांगाव्यात.
अ) विरामचिन्ह बदलल्यास वाक्याचा अर्थ बदलू शकतो का ? त्याविषयी माहिती मिळवा.
१. केवढी भव्य इमारत होती ती ?
२. केवढी भव्य इमारत होती ती!
आ) दररोजच्या बोलण्यात उदगार कोणत्या वाक्यात येतात अशी चार-पाच वाक्ये लिहा.
विषय – गणित
सोडून पाहू..
१. २७८५ मधून कोणती संख्या वजा केल्यास उत्तर ४६९ होईल ?
२. ५००० रुपयातून २०७९ रुपये दोन वेळा वजा केले तर बाकी किती शिल्लक राहील?
३. २६९ बाकी उरेल अशी पाच वजाबाकीची उदाहरणे तयार कर.
४. १,२,३,४,० या अंकापासून लहानात लहान व मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करून त्यांची वजाबाकी कर.
विषय – इंग्रजी
Learning Activity:
> Facilitator/teacher starts this activity by showing the word cards.
> Gives instructions to observe the cards and make a group of words alphabetically.
> Asks the students to repeat the words and copy.
> Asks questions by showing pictures given in the textbook.
> Learners try to answer.
> Teacher reads the story in proper intonation and learners repeat it.
Solved Activity / Demo:
> Teacher shows picture card of page no. 17.
>Teacher tells learners to observe picture and asks names of animals
For ex: Which is this animal?
>Students try to answer.
>Teacher reads the story one by one paragraph and students repeat.
> Teacher continues the story as given above.
विषय – परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 11
संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 11, पाहूया तरी शरीराच्या आत
अध्ययन निष्पत्तीः 1) आरोग्य रक्षण व त्याचे महत्त्व जाणतात.
2) निरीक्षणे / अनुभव / माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात (आपले आंतरेंद्रिये व त्यांची कार्ये)
सराव करूया :
1) सांगा पाहू मी कोण ?
अ) माझे काम तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचवणे.
उत्तर – …………………………………..
ब) माझे काम संपूर्ण शरीरभर रक्त फिरते ठेवणे,
उत्तर – …………………………………
2) व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे का वाटते?
उत्तर – …………………………………
3) काही वेळेस आपल्याला जेवतांना उसका का लागतो ?
उत्तर – …………………………………
4) दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे का? कारण लिहा,
उत्तर – …………………………………
विषय – परिसर अभ्यास
पहिले काही आठवूया :- दिलेल्या अक्षरांवरून योग्य शब्द तयार करा.
अ) ता ग प्रड प
आ) व रायशि ………………………………
इ) खा अ ज न ल फ ………………………………
प्रतापगडावरील पराक्रम :- हा पाठयांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग -२) या पाठ्यपुस्तकात पान क्र.३२ ते ३६ वर आहे.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१) अफजलखानाने कोणता विडा उचलला ?
………………………………
२) प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला?
………………………………
३) अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले?
………………………………
उपक्रम : खालील चित्रातील अंगरक्षक वस्तूंची नावे त्याखालील चौकटीत लिहा.
पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय – परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 11
समजून घेऊ या : पाण्याचे गुणधर्म 2
संदर्भ : इ. 3री, पाठ 10 पाण्याविषयी थोडी माहिती
अध्ययन निष्पत्ती : विविध वयोगटातील लोकांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील, घरातील पाण्याच्या उपयोगाच्या वर्णन करू शकतो.
सराव करू या :
1. उतारावरच्या रस्त्यावरून बादलीभर पाणी नेत असताना नेहाकडून बादली पडली तर काय होईल?
उत्तर – ………………………………..
2. पाण्यात विरघळणाऱ्या कोणत्याही तीन पदार्थांची नावे लिही.
उत्तर – ………………………………..
3. पाण्यामध्ये गूळ टाकून चमच्याने ते ढवळले तर पाणी गोड का लागते ?
उत्तर – ………………………………..
4. पाण्याच्या अवस्था किती व कोणत्या आहेत?
उत्तर – ………………………………..
विषय – परिसर अभ्यास
कृतिपत्रिका : 12
समजून घेऊ या हवेची गरज
संदर्भ : इ.3री, पाठ ॥ आपली हवेची गरज
अध्ययन निष्पत्ती : विविध वयोगटातील लोकांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील, घरातील पाण्याच्या उपयोगाच्या वर्णन करू शकतो.
सराव करू या :
1. खूप खेळल्यावर किंवा काम केल्यावर आपण जोरजोरात श्वास घेतो, असे का होत असेल ?
उत्तर – ……………………………………….
2. बेडूक पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतो, मग तो हवा शरीरात कशी घेत असेल ?
उत्तर – ……………………………………….
3. प्राण्यांप्रमाणेच झाडांना ही हवेची गरज असते का ? झाडांना हवेची गरज कशासाठी लागत असेल ?
पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
अध्ययन निष्पत्ती:- शाळेबाहेर आणि शाळेत
वाचन
( वाचनालय/कोपरा
आपल्या आवडीच्या पुस्तकांची निवड करून वाचण्याचा प्रयत्न करतात. (इयत्ता
री)
जाणून घेऊ या.
● चित्र मजकूर असलेल्या मजकूरातील चित्रे कोणती आहेत? ते मुलांना विचारावे.चित्रनामे त्यांचे वचन याबाबत चर्चा घडवून आणावी.
> सक्षम बनू या.
मजकूर वाचत असताना चित्राच्या जागी कोणता शब्द घालता येईल यावर वर्गात चर्चा घडवून आणावी. चित्राऐवजी शब्द वापरून सर्व मुलांना एक- एक वाक्य वाचायला सांगावे. गरजेनुसार मदत करावी. मुलांकडून पूर्ण मजकूराचे वाचन करून घ्यावे. शेवटी शिक्षकांनी मजकूराचे प्रकट वाचन करावे. मजकूर समजला आहे की नाही हे तपासण्यासाठी काही सूचक प्रश्न विचारून त्यावर चर्चा करावी.
सराव करू या.- सरावासाठी असे मजकूर तयार करून मुलांकडून वाचनाचा सराव घ्यावा.
> कल्पक हो या – छोटासा मजकूर देऊन मजकुरात चित्रांचा वापर करून अशाप्रकारचा चित्र मजकूर गटात तयार करण्यास सांगावे.
विषय – गणित
थोडे आठवूया
१२+०=
• या उदाहरणात पाटीवर १२ ही संख्या दशक व एकक रुपात १ दशक दांडा व २ सुटे घेवून तयार करा. यामध्ये दुस-या पाटीवर • लिहा.
● म्हणजे किती ? (काहीच नाही )
• बरोबर मग पाटीवर • म्हणजे कोणत्या वस्तू ठेवायच्या ? (कोणत्याच नाही)
• छान मग सांगा. १२ मध्ये काहीच नाही मिळवले तर कोणती संख्या मिळेल?
• (१२ हीच संख्या मिळेल.)
• बरोबर… याचाच अर्थ एखाद्या संख्येत • मिळवले तर संख्येत काहीच बदल होत नाही.
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : ११ परिसरातील फळे
समजून घेऊ या फळांची चव आणि रंग.
संदर्भ : इयत्ता दुसरी १.३. फळप्रक्रिया (इयत्ता दुसरीच्या ‘खेळू, करू, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ. क्र. ४७, ४८) अध्ययन निष्पत्तीः अन्न, वस्त्र, निवारा यांच्याशी संबंधित उपक्रमात सहभागी होतो.
सराव करू या :
प्रश्न १) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१) तुम्हाला माहीत असलेल्या फळांची यादी करा.
उत्तर – ……………………..
२) तुमचे आवडते फळ कोणते आहे ?
उत्तर – ……………………..
३) कोणत्याही एका फळाचे चित्र काढा आणि त्यात रंग भरा.