♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस बारावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस बारावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या..

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचयातील काही शब्द फळ्यावर लिहावेत व असे दोन भिन्न शब्दांपासून बनलेले, विद्यार्थाना माहित असणारे शब्द सुचविण्यास सांगावे.

उदा. अवतीभवती, बारीकसारिख, पालापाचोळा

शिक्षकांनी इ. ३ री च्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील “मुग्धा लिहू लागली” पाठाचे प्रकटवाचन करावे व विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक श्रवण करून यातील जोडशब्द वहीत लिहिण्यास सांगावे.

+ सक्षम बनू या..

विद्यार्थ्यांना त्यांच्या भावविश्वातील अपूर्ण जोडशब्द देऊन ते पूर्ण करून लिहिण्यास सांगावे.

जोडशब्द का वापरले जातात? याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करून इतर

जोडशब्दांचे अर्थ सांगण्यास प्रोत्साहित करावे.

उदा. लहानसहान – कमी आकाराचे

आबालवृद्ध लहानांपासून मोठ्यांपर्यंत

4 सराव करू या..

शिक्षकांनी पठीत किंवा अपठीत उतान्यातील जोडशब्द शोधण्यास प्रेरित करावे. जोडशब्द असणारा परिच्छेद निवडून त्यातील जोडशब्द शोधण्यास विद्याथ्र्यांना प्रेरित करावे.

 विषय –  गणित 

संबोध कोपरा

܀ दशकांचा गुणाकार.

२x१० म्हणजे २ ची १० पट म्हणजेच २ दाहे वीस. 

६x१० म्हणजे ६ ची १० पट म्हणजेच ६ दाहे ६०. 

१२x१० म्हणजे १२ ची १० पट म्हणजेच १२ दाहे १२०. 

३० x १० म्हणजे ३० ची १० पट म्हणजेच ३० दाहे ३००.

‘एखाद्या संख्येला १० ने गुणले म्हणजे त्या संख्येच्या पुढे एक शून्य लिहितात.’ जर गुणाकारात दोन्ही संख्यांच्या एकक स्थानी शून्य असेल तर?

जसे १) १०x ३० म्हणजे ३००.

म्हणजेच १ द x ३द = ३ शतक

२) ६० x ४० = ६ द x ४ द = २४ शतक = २४००

३) ७० x ५० = ७५ x ५द = ३५ शतक = ३५००

‘जर गुणाकारात दोन्ही संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असेल तर त्यांचा गुणाकार करताना दशक स्थानाच्या अंकांचा गुणाकार करून त्याच्यापुढे दोन वेळा शून्य लिहितात.’

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

 विषय –  परिसर अभ्यास  

जरा डोके चालवा!

१. नकाशा नसता तर काय झाले असते?

उत्तर – …………………………… 

२ . कोणत्या वस्तू नकाशात दाखवता येत नाहीत?

उत्तर – ……………………………

मला अधिक सराव करायला आवडेल!

१. राज्याच्या नकाशात जिल्ह्याचे नाव शोध व रंगव?

उत्तर – ……………………………

२. जिल्ह्याच्या नकाशात तुझा तालुका शोध?

उत्तर – ……………………………