पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस बारावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
“गुणेश सकाळी लवकर उठला.” हे वाक्य ‘उठला’ या शब्दानंतर संपले म्हणून आपण त्या नंतर (.)असे चिन्ह लिहितो.त्याला पूर्णविराम असे म्हणतात हे शिक्षक मुलांच्या लक्षात आणून देतील. आणखी दोन- तीन वाक्ये देऊन पूर्णविरामाची ओळख करून द्यावी. त्यानंतर अशाच पद्धतीने प्रश्नचिन्हाची ओळख करून द्यावी. आपण प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नचिन्ह (?) देतो. फळयावर असे एखादे वाक्य लिहून या वाक्यात प्रश्न विचारला असेल तर प्रश्नचिन्ह नसेल तर पूर्णविराम दे अशी सूचना देवून दोन्ही विरामचिन्हांची एकत्रित ओळख करून द्यावी. प्रश्नचिन्ह किंवा पूर्णविराम यापैकी योग्य विरामचिन्हे दे.
१) तुझे नाव काय
२) माझे बाबा हॉलीबॉल खेळतात
> सराव करू या :
• फळ्यावर वेगळे शब्द देऊन अशाच पद्धतीने सामुहिक सराव घ्यावा.
दोन्ही विरामचिन्हांच्या सरावासाठी काही वाक्ये द्यावी.
> कल्पक होऊ या-:
मुलांना शब्द देऊन त्यावर जास्तील जास्त वाक्ये तयार सांगावे. सुरूवातीला गटात व नंतर वैयक्तिकरित्या लिहण्यास सांगावे. दोन दोन मुलांच्या जोड्या करून एकाने प्रश्न विचारायचा व दुसऱ्याने उत्तर सांगायचे असा खेळ आलटून पालटून घेता येईल. ही वाक्ये वहीत लिहायला सांगून योग्य विरामचिन्हांचा वापर करण्यास सांगावे.
विषय – गणित
थोडे आठवूया
घटकाचे नाव – बेरीज
दिवस – बारावा
• मैदानावर ३ मुले खेळत होती. अजून २ मुले आली तर मैदानावर एकूण किती मुले झाली ?
आईने कविताला डब्यात ठेवण्यासाठी २६ लाडू दिले. ताईने पुन्हा १२ लाडू दिले, तर कविताने एकूण किती लाडू डब्यात ठेवले?
• गोष्टीच्या पुस्तकातील ३० पाने गौतमने काल वाचली. आज त्याने उरलेली पाने वाचली, तर ते पुस्तक किती पानांचे होते?
सोडवून पाहू….
१. माईकडे १८ टिकल्या होत्या. सीमाकडे २१ टिकल्या होत्या, तर दोघींकडे मिळून एकूण किती टिकल्या होत्या ?
२. टोपलीत ३३ जांभळे होती. शाहिदने त्यात ५४ करवंदे ठेवली, आता टोपलीत एकूण किती फळे झाली?
३. खेळण्याच्या दुकानातील बाहुल्यांपैकी ४२ बाहुल्या गीताने घेतल्या. दुकानात अजून ३७ बाहुल्या शिल्लक होत्या, तर दुकानात एकूण किती बाहुल्या होत्या?
विषय – इंग्रजी
विषय – परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : १२ आपले कपडे
समजून घेऊ या : ऋतू आणि कपडे कपड्यांचे प्रकार व उपयोग.
संदर्भ : कापडाच्या विविध प्रकारांची ओळख (इयत्ता दुसरीच्या ‘खेळू, करू, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ.क्र.५० ते ५३) अध्ययन निष्पत्ती : अन्न, वस्त्र व निवारा यांच्याशी संबंधित उपक्रमात सहभागी होतो. लक्षात घेऊ या :
सराव करू या :
प्रश्न १) उत्तरे लिहा.
१) एका वर्षात कोणकोणते ऋतू आपण अनुभवतो?
२) उन्हाळ्यात लोकरी कपडे घातले, तर काय होईल?
३) प्राणी कपडे घालत नाही मग थंडीपासून त्यांचे रक्षण कसे होते?
४) रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसात करतात?
प्रश्न २) यादी करा.
१) तुमच्या परिसरात वापरल्या जाणाऱ्या कपड्यांची यादी करा.
२) अभय आणि अजय यांना सहलीकरिता थंड हवेच्या ठिकाणी जायचे आहे. त्यांनी सोबत कोणकोणते कपडे घ्यावे असे तुम्हाला वाटते?
प्रश्न ३) हे करा.
१) वेगवेगळ्या प्रकाराच्या कपड्यांचे नमुने गोळा करा. २) कपड्याच्या दुकानातील तुम्हाला आवडलेल्या एखाद्या कपड्याचे चित्र काढा व रंग भरा.