♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस बारावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस बारावा| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या:

1) दोन मुलांना पाठीला पाठ लावून बसायला सांगा. दोघांच्या हातात रंगीत कागदाचे किंवा

घोटीव कागदाचे तुकडे द्या.

2) एका मुलाला तुकडे जमिनीवर प्रथम मांडायला सांगा. मांडत असताना तो ते तुकडे कसे मांडत

आहे ते सांगायला सांगा. जसे लाल कागदाचा तुकडा खाली ठेवला. त्याच्या डाव्या बाजूला हिरवा तुकडा ठेवला. हिरव्या तुकड्याच्या खाली पांढया रंगाचा तुकडा ठेवला. 3) पहिल्या मुलाने जसे सांगितले तशीच कृती दुसरा मुलगा कृती करेल. ( या उपक्रमातून पहिल्या मुलाने आपल्या कृतीचे नेमक्या शब्दात वर्णन करणे आणि दुसऱ्या मुलाने बारकाईने ऐकून त्यानुसार कृती करणे अशा दोन्ही गोष्टी तपासल्या जातात. यात एक आव्हान असते. त्यामुळे अधिक लक्षपूर्वक काम केले जाते आणि मजाही येते.)

• सक्षम बनू या –

चित्र पहा त्याविषयी दोन तीन वाक्य सांगा. हाच खेळ वेगवेगळ्या पध्दतीने घेता येईल. 1) दोन मुलांना पाठीला पाठ लावून बसायला सांगा. दोघांच्या हातात कागद आणि पेन्सिल द्या. 2) एक मुलगा चित्र काढेल आणि तो कसे काढतो आहे ते बारकाईने दुसऱ्याला सांगत जाईल जसे, ‘ मी कागदाच्या वरच्या बाजूला एक आडवी रेघ काढली, मग त्या रेषेवर मध्यभागी एक साधारण बांगडी एवढा गोल आकार काढला…

३) ‘पहिल्या मुलाने जसे सांगितले तसे दुसरा मुलगा चित्र काढत जाईल. (दोन्ही मुलांना चित्र काढणे हे अधिक आव्हानात्मक असते. आव्हाने कठीण करत जाणे हे शिक्षणात हवे असते व मुलांना आनंददायी असते.)

चला सराव करूया

1) वरील कृतींचा गरजेनुरूप विविध वस्तू वापरून अधिकाधिक सराव घ्या.

• कल्पक बनूया

मुलांना विचारा हा खेळ आपण अजून कशाप्रकारे घेवू शकतो. जसे पाठीवर अक्षरे लिहिणे व ओळखायला सांगा.

पाठीवर मुलामुलींची, वस्तूंची, प्राण्यांची, फुलांची इ. अटी घालून नावे गिरवणे व ओळखणे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Learning Activity: Teacher will read the story and ask the students to listen carefully and arrange the pictures sequentially.

(Priya had a dog. Once the dog got dirty in a puddle. Priya kept the dog in the bathing tub. She showered him to make him cleaner. Then she wiped him with a towel.)

Listen and arrange the events in a story as per their order by giving numbers in a sequence.