पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

सक्षम बनू या

विशेषण

फाटका

कृती-१ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काय ? कसे? कोण? कुठे ? असे प्रश्न विचारून विद्यार्थ्याना बोलते करावे, विचारप्रवृत्त करावे. सुधा आंबा खाते. राजेश आंबा खातो. अशी विविध उदाहरणे देऊन उताऱ्यातील विविध नाम बदलून त्यानुसार विशेषण, क्रियापद कसे बदलते यावर चर्चा करून आपली वाक्य पुन्हा लिहिण्याचा सराव द्यावा.

कृती-२ समजून घेऊ विशेषणाचे प्रकार.

(शिक्षकांनी विशेषणाचे गुणवाचक,संख्यावाचक व सार्वनामिक या तीन प्रकारांची व्याख्या व काही उदाहरणांसह चर्चा तसेच पान नं. ४१ वरील तक्त्याचे वाचन घ्यावे.)

पुढील परिच्छेदाचे वाचन करून त्यातील नाम व त्यांची विशेषणे खाली दिलेल्या तक्त्यात मांडूया.

एका लहानशा खोलीमध्ये राजू दुपारी अभ्यास करत बसला होता. शेजारीच पाळण्यात लहान बाळ झोपले होते. ते छोटेसे बाळ अचानक रडू लागले. राजूने खूप वेळा झोका दिला. जितका झोका देई तितके बाळ दुप्पट रडू लागले. तितक्यात आई आत आली. आईला पहाताच बाळ हसले. राजूने लाल खुळखुळा दाखवून वाजवला. बाळाच्या दोन्ही गालावर खळ्या पडल्या. आई आणि राजू दोघांना आनंद झाला.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान

कृतिपत्रिका : 11

: कार्य व ऊर्जा संकल्पना, कार्य आणि ऊर्जा संबंध.

समजून घेऊ या

संदर्भ : इयत्ता सहावी, प्रकरण ॥ कार्य आणि ऊर्जा.

अध्ययन निष्पत्ती : दैनंदिन जीवनात शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा वापर करतात. प्रक्रिया व घटना स्पष्ट करतात. उदा. ऊर्जेची रुपे, रचना, उपलब्ध स्त्रोतांचा वापर, नियोजन ई. बाबींमध्ये सर्जनशीलता प्रदर्शित करतात.

1. प्रत्येक क्रिया करताना बल लावणे आवश्यक आहे का ?

2. बलामार्फत कार्यात रूपांतर होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?

3. काय सांगाल ?

a) विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल ?

b) कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागतो ?

4. पृथ्वीवरील वातावरणाला सूर्याची कशा प्रकारे मदत होते ते लिहा.

5. सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो?

6. ऊर्जा स्त्रोत कशाला म्हणता येईल?

7. दिवाळीमधे तुम्ही जे फटाके फोड़ता त्यात कोणत्या प्रकारची ऊर्जा साठवलेली असते ?

8. उदाहरण दया.

प्रकाश ऊर्जा ……………..

ध्वनी ऊर्जा………………

रासायनिक ऊर्जा -……………..

9. आपल्या घरात, परिसरात कोणकोणत्या ऊर्जेची उदाहरणे तुम्हाला बघायला मिळतात? आपल्या मित्रांशी चर्चा करून लिहा.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

पहिले काही बाबी आठवूयात:

१) मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली?

उत्तर :

२) चंद्रगुप्त मौर्य विषयी माहिती सांगा.

उत्तर :

३) सम्राट अशोकाने कधी हि युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला?

उत्तर :

४) सम्राट अशोक यांनी केलेली लोकपयोगी कामे सांगा.

उत्तर :

५) बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणाला पाठवले?

उत्तर :

कृती :

१) शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते ते पाठात शोधा.

उत्तर:

२) शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्कारणारे कोण होते ?ते शोधा.

उत्तर :

३) रोहिड खोऱ्याच्या देश्मुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली ते शोधा.

उत्तर :

४) शिवाजी महाराजांनी कोणते संस्कार व विचार भावी पिढ्यांना आदर्श ठरतील ते शोधा..

उत्तर :

काय समजले?

३) वरील कृती केल्यावर तुला पाठ क्र८. वा. आदर्श राज्यकर्ता संदर्भात काय समजले. ते थोडक्यात लिहा ?

उत्तर :

 विषय –  भूगोल 

यांची उत्तरे शोधू –

ऋत्र 1 : पृथ्वीवरील संसाधनांच्या साठ्याचा तारतम्याने वापर करणे आवश्यक का आहे?

प्रश्न 2 : विनाकारण विद्युत उपकरणे सुरु असल्यास काय करावे? का?

प्रश्न 3 : विविध समारंभात मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होताना दिसते. यावर कोणता उपाय करता येईल?