♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

•उद्गारवाचकचिन्ह वाक्यात केव्हा केव्हा वापरतात हे शिक्षकांनी स्पष्ट करावे, उदाहरणे द्यावी व याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करावी. उद्गारवाचकचिन्ह वाक्यात लिहून दाखवावे व

विद्यार्थांकडून सराव करून घ्यावा.

+ सराव करू या

कृती- १ शिक्षकांनी स्वल्पविराम नसलेली वाक्ये विद्यार्थ्यांना द्यावीत त्याचा वैयक्तिक व गटात

सराव करून घ्यावा.

(अ) पुढील वाक्ये वाचा व त्यात योग्य विरामचिन्ह लिहून वाक्य पुन्हा लिहा.

1. आमच्या वागेत आंबा चिकू पेरू ही फळझाडे आहेत.

2. विद्यार्थी मित्रांनो उद्या शाळेला सुट्टी आहे.

३. अनिलला मराठी गणित विज्ञान हे विषय आवडतात.

(आ). पुढीलपैकी कोणत्या वाक्यात स्वल्पविराम आला आहे ते ओळखा व ते वाक्य पुन्हा लिहा..

1. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

२. पण नदी कशी बोलणार?

३. माधवने कोबी, मटार, भेंडी, पालक, मुळा ह्या भाज्या आणल्या.

कृती- २ शिक्षकांनी विरामचिन्ह नसलेली वाक्ये विद्यार्थ्यांना द्यावी व त्याचा

वैयक्तिक व गटात सराव करून घ्यावा.

(अ) पुढील वाक्ये वाचा व त्यात योग्य विरामचिन्ह लिहून वाक्य पुन्हा लिहा.

1. इंद्रधनुष्यात किती रंग असतात

2. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते

३. तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता

(आ) त्याने असे का केले असेल ? या वाक्यात कोणते विरामचिन्ह आले आहे.

(इ). पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रश्नचिन्ह आले आहे ते ओळखा व ते वाक्य पुन्हा लिहा.

1. तू नेहमी शाळेत जा.

२. “अबब! केवढा मोठा प्राणी हा !”

३. विद्यार्थ्याला पुस्तक कोणी दिले?

कृती -३ शिक्षकांनी विरामचिन्ह नसलेली वाक्ये विद्यार्थ्यांना द्यावी व त्याचा वैयक्तिक

व गटात सराव करून घ्यावा.

(अ) पुढील वाक्ये वाचा व त्यात योग्य विरामचिन्ह लिहून वाक्य पुन्हा लिहा.

1. शाबास उत्तम गुण मिळवलेस

2. अरे वा चिमुकल्यांनो

३. आता काय बोलाव कपाळ

(आ) काय तो चमत्कार ! या वाक्यात कोणते विरामचिन्ह आले आहे.

(इ). पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उद्गारचिन्ह आले आहे ते ओळखा व ते वाक्य पुन्हा लिहा.

1. भारत माझा देश आहे.

२. किती ताजेतवाने झाल्यासारखे वाटते !

३. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ?

कल्पक होऊ या

कृती- १ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील कृती करायला सांगावे.

१.. बागेतील किंवा इतर ठिकाणावरील सूचनांमध्ये स्वल्पविराम असलेली वाक्ये लिहा. २. दररोजच्या बोलण्यामध्ये ज्या वाक्यामध्ये स्वल्पविराम असतो अशी पाच वाक्य लिहा.

कृती-२ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील कृती करायला सांगावे.

१. खूप पाऊस पडला? २. खूप पाऊस पडला.

या दोन वाक्यात प्रश्नचिन्ह असताना आणि नसताना वाक्याच्या अर्थामध्ये काय बदल होतो याविषयी चर्चा करा.

२.? | या चिन्हातून तुम्हाला कोणती चित्रे सुचतात. या आकारावरुन तुम्हाला आवडेल असे

एक चित्र काढा व त्याला रंग द्या..

कृती- ३ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील कृती करायला सांगाव्यात.

अ) विरामचिन्ह बदलल्यास वाक्याचा अर्थ बदलू शकतो का ? त्याविषयी माहिती मिळवा.

१. केवढी भव्य इमारत होती ती ?

२. केवढी भव्य इमारत होती ती!

आ) दररोजच्या बोलण्यात उदगार कोणत्या वाक्यात येतात अशी चार-पाच वाक्ये लिहा.

 विषय –  गणित 

सोडून पाहू..

१. २७८५ मधून कोणती संख्या वजा केल्यास उत्तर ४६९ होईल ?

२. ५००० रुपयातून २०७९ रुपये दोन वेळा वजा केले तर बाकी किती शिल्लक राहील?

३. २६९ बाकी उरेल अशी पाच वजाबाकीची उदाहरणे तयार कर.

४. १,२,३,४,० या अंकापासून लहानात लहान व मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करून त्यांची वजाबाकी कर.

 विषय –  इंग्रजी 

Learning Activity:

> Facilitator/teacher starts this activity by showing the word cards.

> Gives instructions to observe the cards and make a group of words alphabetically.

> Asks the students to repeat the words and copy.

> Asks questions by showing pictures given in the textbook.

> Learners try to answer.

> Teacher reads the story in proper intonation and learners repeat it.

Solved Activity / Demo:

> Teacher shows picture card of page no. 17.

>Teacher tells learners to observe picture and asks names of animals

For ex: Which is this animal?

>Students try to answer.

>Teacher reads the story one by one paragraph and students repeat.

> Teacher continues the story as given above.

विषय – परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 11

संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 11, पाहूया तरी शरीराच्या आत

अध्ययन निष्पत्तीः 1) आरोग्य रक्षण व त्याचे महत्त्व जाणतात.

2) निरीक्षणे / अनुभव / माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात (आपले आंतरेंद्रिये व त्यांची कार्ये)

सराव करूया :

1) सांगा पाहू मी कोण ? 

अ) माझे काम तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचवणे.

उत्तर –  …………………………………..

ब) माझे काम संपूर्ण शरीरभर रक्त फिरते ठेवणे,

उत्तर –  …………………………………

2) व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे का वाटते?

उत्तर –  …………………………………

3) काही वेळेस आपल्याला जेवतांना उसका का लागतो ?

उत्तर –  …………………………………

4) दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे का? कारण लिहा,

उत्तर –  …………………………………

 विषय –  परिसर अभ्यास  

पहिले काही आठवूया :- दिलेल्या अक्षरांवरून योग्य शब्द तयार करा.

अ) ता ग प्रड प

आ) व रायशि  ………………………………

इ) खा अ ज न ल फ ………………………………

प्रतापगडावरील पराक्रम :- हा पाठयांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग -२) या पाठ्यपुस्तकात पान क्र.३२ ते ३६ वर आहे.

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१) अफजलखानाने कोणता विडा उचलला ?

………………………………

२) प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला?

………………………………

३) अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले?

………………………………

उपक्रम : खालील चित्रातील अंगरक्षक वस्तूंची नावे त्याखालील चौकटीत लिहा.