पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस बारावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस बारावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

शिक्षकांनी बातम्यां संदर्भात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावेत.

जसे- १) तुम्ही बातम्या कोठे कोठे ऐकता पाहता ?

२) बातम्या कोणत्या विषयांवर असतात?

३) बातम्या का ऐकल्या/पाहिल्या पाहिजे?

४) बातम्यांचे उपयोग कोणते?

५) बातम्या कितपत खऱ्या किंवा खोट्या असतात असे तुम्हांला वाटते?

+ सक्षम बनू या

• खालील बातमी विद्यार्थ्यांकडून बारकाईने वाचून घ्यावी. त्याबाबतची अधिक माहिती वर्गात सांगावी. त्यावर वर्गात चर्चा आयोजित करावी.

शिक्षकांनी वरील बातमीच्या आधारे खालील प्रश्न विचारावेत.

१) वरील बातमी कोणत्या तारखेची आहे? २)वाचन प्रेरणादिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे? ३) कोणत्या विद्यार्थ्यास ‘उत्कृष्ट वाचक’ म्हणून बक्षीस देण्यात आले? ४) विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढावे यासाठी शाळेत कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील यावर गटचर्चा करा. त्याची यादी तयार करा. ६) तुमच्या शाळेत वाचनप्रेरणा दिन कशाप्रकारे साजरा करण्यात येतो?

+ सराव करू या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात, वर्तमानपत्रात इ वर्तमानपत्रे आलेल्या विविध विषयांवरील उदा. शिक्षण, आरोग्य, क्रीडा, आपत्ती इ. संदर्भातील बातम्या वाचनास द्याव्यात. त्यांवर चर्चा घडवून आणावी..

+ कल्पक होऊ या

• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे श्रवण करण्यास सांगावे.

• विद्यार्थ्यांना एखादा विषय देऊन संबंधित बातम्यांचे संकलन करण्यास सांगावे. उदा. क्रीडा.

 विषय –  गणित 

आव्हान कोपरा –

1) 24,13,758 रुपये जमा असलेल्या संस्थेने कोरोना रुग्णांना लोकवर्गणी जमा करून 29,25,807 रुपयाची मदत केली तर त्या संस्थेने लोकवर्गणी किती जमा केली असेल ?

2) 15,249 व 17,726 या संख्या घेऊन वजाबाकीचे एक उदाहरण तयार करा ?

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 12

समजून घेऊ या: दुष्काळ, जलव्यवस्थापन.

संदर्भ : इयत्ता पाचवी, पाठ क्रमांक 16 – पाणी

अध्ययन निष्पत्तीः दुष्काळाची कारणे सांगता येतात, जलव्यवस्थापनाचे मार्ग स्पष्ट करतात.

1. तुमच्या आजूबाजूला कुठे दुष्काळी भाग आहे का ? ते शोधा आणि तेथील दुष्काळी परिस्थिती कमी करण्यासाठी उपायोजना सुचवा.

2. तुमच्या परिसरात जवळपास कुठे धरण बांधलेले असल्यास त्याबाबत माहिती गोळा करा अथवा कुठे पाणी अडवले असल्यास तेथे आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीसोबत जाऊन भेट द्या व त्या भेटीचे वर्णन लिहा.

3. वर्तमानपत्र मासिकात छापून आलेल्या विविध जलव्यवस्थापन पद्धतींच्या चित्रांचा संग्रह करून त्यापासून एक चित्र

संग्रह वही तयार करा.

 विषय –  परिसर अभ्यास  

करून पाहूयात –

१. पाठ क्र. ०१ इतिहास म्हणजे काय?’ मधील ऐतिहासिक साधने वाचन कर.

२. घरात आई भाजी करत असताना कोणत्या कृती करत असते, ते निरीक्षण कर.

आवश्यक साहित्य घरातील विविध वस्तू व पदार्थ उदा. टेबल, साखर, आंतरजाल, मोबाईल

अध्ययन अनुभव / कृती – इयत्ता पाचवी, विषय: परिसर अभ्यास २, घटक १०. ऐतिहासिक काळ उपघटक

– १०.२ पर्यंत

काय समजले? वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही, –

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१. ऐतिहासिक काळ केव्हा सुरु झाला?

२. मानव विविध पदार्थ, वस्तूंवर संस्करण का करत असावा?

३. कलांची निर्मिती कशी झाली?

४. संस्कृती अर्थ लिही.

अधिक सराव करू –

१. नवाश्मयुगीन संस्कृतींचा विकास नद्यांच्या खोऱ्यांमध्ये कसा झाला?

२. नवाश्मयुगीन संस्कृतींमधून नागरी संस्कृती कशा उदयाला आल्या?