पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस चोविसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या
. भाषेच्या व्याकरणाचे विविध घटक ओळखतात व त्यांचा वापर करून लेखन करतात.
• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरील चित्र दाखवून चित्राचे निरीक्षण करावयास सांगावे. चित्रात काय काय दिसते ते विचारावे.
• चित्रातील कोणत्या शब्दांना पर्यायी/समानार्थी शब्द वापरता येतील ते शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारावे व त्याची यादी विद्याथ्र्यांकडून तयार करून घ्यावी.
• शिक्षकांनी चित्रातील शब्दांचे समानार्थी शब्द लिहावयास सांगावे किंवा तोंडी विचारावे. राहिलेल्या शब्दांचे अर्थ स्पष्ट करावेत.
+ सक्षम बनू या
शिक्षकांनी समानार्थी शब्द म्हणजे काय ते उदाहरणे देऊन स्पष्ट करावे. पुढील वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा सांगा किंवा लिहा.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून पुढील कविता म्हणून घ्यावी.
उदा. देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कवितेतील शब्दांसाठी पर्यायी /समानार्थी शब्द शोधण्यास सांगावे.
कवितेतील शब्दांना शोधलेले पर्यायी शब्द कवितेत मूळ शब्दाच्या जागी पालायला सांगावे. परमेश्वरा तुझे किती छान गगन
छान उजेड रवी देतो
असे करताना मूळ कवितेचा अर्थ बदलतो का याविषयी विद्याथ्यांशी चर्चा करावी.
+ सराब करू या
१. शिक्षकांनी विद्यार्थाचे गट करून शब्दकार्डाच्याद्वारे समानार्थी शब्दांचा सराव घ्यावा. २. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक ४७ व ५१ वरील समानार्थी शब्दांचा
स्वाध्याय सोडविण्यास सांगावा.
+ कल्पक होऊ या
• शिक्षकांनी पुढील कृती विद्यार्थ्याकडून करून घ्यावी.
१. तुमच्या आवडीचे गाणे किंवा कविता घेवून त्यातील कोणत्या शब्दांचे समानार्थी शब्द
सांगता येईल ते
शोधा व ते कवितेत घालून कविता वाचा. कवितेचा अर्थ बदलतो का ते पहा
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका: 24
समजून घेऊया लोकसंख्या वाढ, जमिनीतील पाण्याची पातळी
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण 24, आपण परिसर धोक्यात आणत आहोत का ? अध्ययन निष्पत्ती : निरीक्षण / अनुभव / माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध घटनांच्या आकृतिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (लोकसंख्या वाढ व त्याची कारणे, परिणाम)
लक्षात घेऊया :
लोकसंख्या वाढ
खाली दिलेल्या दोन्ही चित्रावरून असे लक्षात येते की, पूर्वपेक्षा सध्याच्या काळात लोकसंख्या वाढ खूप
प्रमाणात झाली आहे.
1951 साली जवगणवा झाली. त्या वेळी आपल्या देशाची 36 कोटी होती. 2011 साली जनगणना झाली. त्या
वेळी आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटी होती.
गेल्या 60 वर्षात आपल्या देशाची लोकसंख्या तिपटीने वाढली. अजूनही ती वाढत आहे. आपण ज्या वस्तू
परिसरातून गरजेपोटी घेतो, त्यांची मागणी अतोनात वाढली. त्याचे नुकसान खालीलप्रमाणे झाले. 1) खेडेगावांमध्ये रोजगार मिळेनासा झाला. रोजगारासाठी खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागले.
2) शहरांमध्ये दाटीवाटी होऊ लागली लोकांना रहायला जागा मिळेना. शहराभोवती शेती होती. मोकळ्या जागा
होत्या. तिथे बवीन वसाहती आणि रस्ते बांधण्यासाठी तिथली झाडे तोडावी लागली.
3) शहरांमध्ये कामावर जाण्यासाठी खूप मोठी अंतरे पार करावी लागतात. म्हणून शहरातले लोक वाहने खरेदी करू लागले. शहरांमध्ये ही वाहने धूर ओकत फिरू लागली. शहरातल्या हवेत हा धूर मिसळू लागला. त्याचा परिणाम म्हणून शहरांमधील लोकांना असवाचे विकार होऊ लागले.
4) लोकसंख्या वाढल्यामुळे कधीकधी शहरात सांडपाण्याची व्यवस्था कोलमडते. त्यामुळे भर वस्तीत पाणी साचते. त्यात डास वाढतात. डासांमुळे हिवताप, डेंगी, हत्तीरोग, चिकनगुनिया या रोगाचा प्रसार होतो. शहरातल्या वस्तीवर लोकसंख्यावाढीचा खूप वाईट परिणाम होतो.
जमिनीतील पाण्याची पातळी
पाणी ही सर्व सजीवांची एक महत्वाची गरज आहे. हळूहळू लोकसंख्या वाडू लागली. पाऊस मात्र तेवढाच पडतो. त्यामुळे पाणी अपुरे पडू लागले. पावसाचे बरेचसे पाणी वाहून जाते. ते उपयोगी पडावे म्हणून आपण धरणे बांधून पाणी अडवू लागलो. काहीजण विहीरी खणण्याऐवजी कूपनलिका खोदू लागले. पाणी उपसण्यासाठी हातपंप वापरू लागले. पंपांमध्ये सुधारणा झाली. डिझेल वापरून चालवता येईल अशा यांत्रिक पंपाचा शोध लागला. विजेवर चालणाऱ्या पंपाचाही शोध लागला. पूर्वी हे पाणी पारंपरिक पद्धतीने दिले जाई. पाणी उपसण्यासाठी रहाटगाडग्याचा आणि मोटेचा वापर केला जाई. आता शेतीला पाणी देण्यासाठी अनेक ठिकाणी डिझेल विजेचे पंप वापरतात. पूर्वी मोटा जितके पाणी उपसत होत्या, हे यांत्रिक पंप त्यापेक्षा कितीतरी पट जास्त पाणी उपसतात. याचा परिणाम म्हणून जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने संपत चालला आहे.
विषय – परिसर अभ्यास
पहिले काही आठवूया: उत्तरे सांगा.
१) तुमच्या कुटुंबात एकूण किती सदस्य आहेत ?
२) तुमच्या कुटुंबातील सर्वात जास्त वय कुणाचे आहे ?
कुटुंब आणि शेजारात होत असलेले बद्दल :- हा पाठ परिसर अभ्यास भाग-१ पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक ११०,१११,११२, ११३,११४ वर दिलेला आहे.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
1) शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे का झाले ?
2) माणूस स्थलांतर का करतो ?
3) कुटुंबातील सर्वात व्यक्ती मरण पावली तर आपल्या जीवनात काय फरक पडतो?
उपक्रम :
1 ) शेजारच्या पाच कुटुंबाची माहिती मिळवा
2 ) माझा शेजारी या विषयावर दहा ओळी निबंध लिहा
(3) पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह करा