पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस तेविसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 23
Add text
Draw
Highlight
समजून घेऊया पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात, पदार्थाच्या अवस्था.
संदर्भ : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 24 ( पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा) अध्ययन निष्पत्ती: निरीक्षणे, अनुभव, माहिती यांची सुनियोजित पद्धतीने नोंद करतात. लक्षात घेऊ या :
सांगा पाहू!
पुस्तकातील कोणताही थोडा मजकूर फळ्यावर खडूने लिहा. लिहून झाल्यावर खडूचे निरीक्षण करा.
फळ्यावर खडूने लिहिले असता फळ्याला खडूचे कण चिकटले आणि फळा पुसल्यानंतर ते कण फळ्यापासून मोकळे झाले, हे समजले.
लोखंड किंवा तांबे कानशीने घासतानाही लोखंडाचे, तांब्याचे कण सुटे होतात. पेन्सिल, खड्डू, कागद, लाकूड, गव्हाचे दाणे, लोखंड, तांबे, कोळसा असे सर्व पदार्थ सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात.
आपल्या डोळ्यांना पदार्थांचे जे लहान कण दिसतात ते देखील अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. हे कण
एवढे लहान असतात, की ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. एखादया पदार्थाचा आपल्याला दिसू शकेल एवढा कण तयार होण्यासाठी त्या पदार्थाचे लाखो कण एकत्र असावे लागतात.
पाणी जमिनीवर पडले, की त्याचे शिंतोडे उडतात. शिंतोडे म्हणजे पाण्याचे लहान थेंब. हे थेंबही पाण्याच्या सूक्ष्म
कणांपासून बनले असतात. त्यामुळे आपल्याला भिजायला होते, म्हणजे द्रवपदार्थही कणांचेच बनलेले असतात. डांबरगोळीचे सतत वायुरूपातील लहान कणांत रूपांतर होत असते. कपड्यांमध्ये ठेवलेल्या गोळ्यांचे लहान कण कपड्यांवर बसल्यामुळे त्यांना डांबरगोळीचा वास येतो. काही दिवसांनी या गोळ्या लहान लहान होत नाहीशा होतात. रांगोळीच्या कणांचा आकार पिठाप्रमाणे बारीक असतो. रांगोळीचे रंग लहान खड्यांच्या स्वरूपातही असतात.
पदार्थांच्या अवस्थाः
निसर्गात आढळणारे सर्व पदार्थ कणरूप असतात. सामान्यपणे प्रत्येक पदार्थ एका ठराविक अवस्थेत असतो. त्यावरुन त्या पदार्थाला स्थायू, द्रव किंवा वायू पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ, अॅल्युमिनियम, कोळसा हे स्थायू आहेत. केरोसीन, पेट्रोल हे द्रव आहेत, तर नायट्रोजन, ऑक्सिजन हे वायू आहेत. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. पदार्थांमध्ये कठीणपणा, पारदर्शकता, रंग, वास, चव, पाण्यात विरघळणे असे विविध गुणधर्म असतात.
विषय – परिसर अभ्यास
अधिक सराव करू –
१. RF यासारखी तुम्हास माहीत असलेली सांकेतिक चिन्हे व खुणा यांचा संग्रह करा. ती नकाशात शोधा.
२. विविध सांकेतिक चिन्हे व खुणा यांचा फलक तयार करा.
३. तुमच्या घराच्या परिसराचा आराखडा काढा.