पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस तेविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस तेविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक नवीन गाणे अभिनयासह म्हणायला सांगावे. गाण्यातून उमजलेल्या अर्थावरून शिक्षकाने चित्र काढून घ्यावी आणि त्याचे सादरीकरण घ्यावे.

+ सक्षम बनू या

• कवितेच्या अर्थाबाबतीत विद्यार्थ्यांची मते जाणून घ्यावीत

पाठ्यपुस्तकातील फुलपाखरू कवितेबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधावा व कवितेचे अभिनायासहित सादरीकरण घ्यावे.

+ सराव करू या

• कवितांना / गाण्यांना चाली लावण्याच्या स्पर्धा घ्याव्या.

कविता गायनाच्या स्पर्धा घ्याव्या.

+ कल्पक होऊ या

आवडणारा पक्षी, प्राणी किंवा इतर कोणताही आवडणारा विषय घेऊन गाणे तयार करून त्याचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न करा.

• कल्पना करा की तुम्ही फुलपाखरू आहात, तर तुम्ही कुठे जाल? काय बोलाल? कुणाशी बोलाल?

संबंधित वेशभूषा करून एखादी वेगळी कविता/ गाणे गायन करण्याचा प्रयत्न करा.

 विषय –  गणित 

थोडं समजून घेऊ

विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल, तर फायदा होतो. त्याला नफा म्हणतात. 

खरेदीच्या किमतीपेक्षा कमी रक्कम विक्रीतून मिळते, तेव्हा होणान्या नुकसानाला तोटा म्हणतात. 

तोटा =खरेदी किंमत -विक्री किंमत

• नफा =विक्री किंमत- खरेदी किंमत

चला सराव करूया

रामभाऊंनी 500 किलोॉम तांदूळ 22000 रुपयांस विकत घेतला व प्रति किलोग्रॅम 48 रुपयांनी सर्व तांदूळ विकता, तर त्यांनाकिती रुपये नफा झाला ?

500 किलोग्रॅम तांदळाची खरेदीची किंमत 22000 रुपये आहे.

500 किलोग्रॅम तांदळाची विक्रीची किंमत = 500X48 24000 रुपये विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त आहे म्हणून नफा झाला -2000

नफा =विक्री किंमत- खरेदी किंमत

=24000-22000

= 2000

या व्यवहारात रामभाऊंना 2000 रुपये नफा झाला.

सोडवून पाहू

1. दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयांचा खरेदी केली व तीच सायकल 3400 रुपयांस विकली, तर त्याला किती नफा झाला? 

2. सुनंदाबाईनी 475 रुपयांना दूध खरेदी केले. त्या दुधाचे दही से 700 निकले, सरांना किती नफा झाला? 

3. दिवाळीत महिला बचतगटाने चकल्या तयार करण्यासाठी 15000 रुपयांचा कच्चा माल खरेदी केला. तयार झालेल्या | चकल्या विकून त्यांना 220.50 रुपये मिळाले, तर बचतगटाला किती नफा झाला?

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.