पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस चोविसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या
● शिक्षकांनी वर्गात सोपी, सुटसुटीत आशय असणारी चित्रयुक्त गोष्टींची पुस्तके उपलब्ध करून द्यावीत.
● गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत असणाऱ्या कथाही विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून द्याव्यात. मुलांना स्वतःला वाचन करण्याची संधी द्यावी.
> सक्षम बनू या
● शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एखाद्या कथेचे, परिच्छेदाचे, सुस्पष्ट व अचूक उच्चारांसह वाचन करून दाखवावे. मुलांना स्वतःच्या पाठीमागे वाचन करायला सांगावे. 1) वर्गातील जे विद्यार्थी उच्चार करताना अडखळतात, किंवा मागे पडतात त्यांच्याकडून अधिक सराव करून घ्यावा.
2) एकाचवेळी कथा / परिच्छेद ऐकणे व सोबत वाचणे असा सराव मोबाईलचा उपयोग करून / प्रत्यक्ष गटात / YouTube याप्रकारच्या कृतींच्या मदतीने वाचन
करून घ्यावे.
> सराव करू या.
• शिक्षक विद्यार्थ्यांना अनुवाचन करण्याच्या विविध संधी उपलब्ध करून देतील.
1) गटात अनुवाचन
2) मोबाईलवर पुस्तकातील पाठ / कथा ऐकणे व सोबत किंवा मागे म्हणणे.
> कल्पक होऊ या.
शिक्षकांनी मुलांना आवडलेल्या गोष्टीचे वाचन करण्यास सांगावे.
विषय – गणित
सोडवून पाहू….
* तुमच्या घराच्या दरवाजासाठी तोरण बनविण्यासाठी किती दोरा लागेल, अंदाज करा.
• आई, बाबां समवेत इमारत बांधकाम चालू असेल त्या ठिकाणी जाऊन मापे कशी व कोणत्या साधनाने घेतात ते पाहा व निरीक्षण कर.
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.