शाळा नोंदणी या बटनावर क्लिक केल्यानंतर शाळा नोंदणी फॉर्म उपलब्ध होईल. तो भरण्यासाठी खालीलप्रमाणे मुद्देनिहाय सूचना देण्यात येत आहेत.
UDISE सांकेतांक –
• या मुद्दयापुढील चौकटीत आपल्या शाळेचा 11 अंकी UDISE सांकेतांक टाईप करून Enter बटन प्रेस करावे.
• त्यानंतर SCHOOL NAME या रकान्यात आपल्या शाळेचे नाव दिसेल. सदर नाव आपल्या शाळेचे असल्यास Is this your school name ? या रकान्यातील Yes बटनावर क्लिक करावे अन्यथा No बटनावर क्लिक करावे.
शाळेचे पूर्ण नाव –
• या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेले नाव आपोआप (By Default) येईल.
सूचना – शाळा माहिती प्रपत्रात शाळेच्या नावात काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.
शाळा व्यवस्थापन प्रकार –
• या मुद्दयापुढील चौकटीच्या ड्रॉप डाऊन लिस्ट मधील अचूक पर्याय निवडा. (ड्रॉप डाऊन लिस्ट – जिल्हा परिषद, महानगरपालिका, राज्य शासन, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित, खाजगी मान्यताप्राप्त विनाअनुदानित, खाजगी मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित, मान्यताप्राप्त स्वयं अर्थसहाय्यित, कटकमंडळ व केंद्र शासन)
शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम –
आपल्या शाळेत जो अभ्यासक्रम शिकविला जातो, तो पर्याय अचूकपणे निवडा.
• एकापेक्षा जास्त अभ्यासक्रम शाळेत शिकविले जात असतील तर जेवढे पर्याय लागू आहेत तेवढे सर्व पर्याय निवडावेत.
• येथे निवडलेला / निवडलेलेच अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी उपलब्ध होतील.
लक्षात ठेवा –
• केवळ महाराष्ट्र शासनाचा (एमएससीईआरटी) अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील विद्यार्थी गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीस पात्र ठरतात.
CBSE / ICSE व इतर अभ्यासक्रमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही. (संदर्भ : शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. १५/११/२०१६)
ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीचा अभ्यासक्रम नोंदविल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर राहील. अशा मुख्याध्यापकांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात येईल.
शाळा माध्यमScholarship exam
● या मुद्द्याच्या ड्रॉप डाऊनमध्ये उपलब्ध असलेल्या पंधरा माध्यमांपैकी (मूळ व सेमी इंग्रजी माध्यमांसह) शाळेस लागू असलेले माध्यम निवडा.
● एकापेक्षा अधिक माध्यमातून शिक्षण दिले जात असेल तर जेवढया माध्यमातून शाळेत शिक्षण दिले जात आहे तेवढया सर्व माध्यमांच्या पर्यायांची अचूकपणे निवड करावी.
● येथे निवडलेले / निवडलेली माध्यमेच विद्यार्थ्याच्या ऑनलाईन आवेदनपत्रात उपलब्ध होतील.
शाळेचा प्रकार
• आपली शाळा ‘आश्रमशाळा’ असल्यास ड्रॉप डाऊनमधील पहिल्या तीन पर्यायांमधून योग्य तो पर्याय निवडावा.
• आपली शाळा कोणत्याही प्रकारची आश्रमशाळा नसल्यास ‘आश्रमशाळा व्यतिरिक्त इतर शाळा’ हा शेवटचा पर्याय निवडावा.
क्षेत्र
या मुद्द्याच्या ड्रॉप डाऊनमधून शाळेच्या क्षेत्राची अचूक निवड करावी.
• राज्यातील ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखालील सर्व गावे / वस्तीमधील (लोकसंख्या विचारात न घेता) शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गणना “ग्रामीण” (RURAL) भागात करण्यात यावी.
• तसेच नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका परिक्षेत्रातील शाळांची गणना “शहरी” (URBAN) भागात करण्यात यावी. शाळा ज्या क्षेत्रात आहे तेच क्षेत्र ग्राह्य धरण्यात येईल. (संदर्भ- शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५. दि. १५/११/२०१६)
लक्षात ठेवा-
ग्रामीण व शहरी क्षेत्रासाठी वेगवेगळे शासनमान्य शिष्यवृत्ती संच आहेत. चुकीचे क्षेत्र निवडल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील. अशा मुख्याध्यापकांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात येईल.
शाळेचा ईमेल आयडी –
● शाळेचा ईमेल आयडी इंग्रजी स्मॉल लेटर्समध्ये व अचूक फॉरमॅटमध्ये टाईप करावा.
• त्यानंतर Confirm School Email Id या रकान्यामध्ये शाळेचा ईमेल आयडी इंग्रजी स्मॉल लेटर्समध्ये व अचूक फॉरमॅटमध्ये पुन्हा टाईप करावा.
• येथे नोंदविलेल्या ईमेल आयडीवर आपणास Username व Password पाठविण्यात येईल.
शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का ?
• या मुद्दयापुढील होय / नाही पैकी योग्य पर्याय निवडावा.
शाळेचा पूर्ण पत्ता –
• स्थानिक पत्ता –
• घर नंबर, सर्व्हे नंबर, रस्ता, वॉर्ड, पेठ, क्षेत्र व जवळची खूण चौक, स्टेशन, स्टैंड, हॉस्पीटल, इत्यादीच्या जवळ अशी माहिती या मुद्दयासमोरील चौकटीत शाळेचा पूर्ण पत्ता इंग्रजी कॅपिटल लेटर्स मध्ये टाईप करा.
• येथे शाळेचे नाव टाईप करण्याची आवश्यकता नाही.
गाव / शहर
• या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेले शाळेचे गाव / शहर आपोआप (By Default) येईल.
• त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.
पोस्ट
• या मुद्दयाखालील चौकटीत पोस्ट (पोस्टाचे ठिकाण व गाव) इंग्रजी कॅपिटल लेटर्स मध्ये टाईप करा.
● जिल्हा
या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेला शाळेचा जिल्हा आपोआप (By Default) येईल.
• त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.
तालुका / तहसिल –
या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेला शाळेचा तालुका / तहसिल आपोआप (By Default) येईल.
• त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.
• पिनकोड –
• या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेला शाळेचा पिनकोड आपोआप (By Default) येईल.
• त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकांच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.
• दूरध्वनी क्रमांक
STD कोडसह शाळेचा दूरध्वनी क्रमांक नमूद करावा. शाळेस दूरध्वनी नसल्यास मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक टाकावा.
शाळा संलग्नता शुल्क –
• हे शुल्क दरवर्षी शाळेने भरणे आवश्यक आहे. NTS किंवा NMMS परीक्षेसाठी शाळा संलग्नता शुल्क भरले असले तरीही शिष्यवृत्ती परीक्षेकरीता शाळा संलग्नता शुल्क रु. 200/- भरणे अनिवार्य राहील.
मुख्याध्यापकाची माहिती –
• या मुद्दयामधील पाच वेगवेगळया चौकटीत अनुक्रमे मुख्याध्यापकांचे आडनाव, प्रथम नाव, मधले नाव, मोबाईल क्रमांक (१० अंकी), ईमेल आयडी अचूकपणे टाईप करा.
• येथे नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर आपणास Username व Password पाटविण्यात येईल. उपरोक्तनुसार सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून माहिती अचूक असल्याची खात्री करुनच Submit बटनावर क्लिक करावे.
शाळा माहिती प्रपत्र ( School Profile)
● शाळा नोंदणी मधील Submit बटनावर क्लिक केल्यानंतर शाळा नोंदणी प्रपत्रात नमुद केलेल्या शाळेच्या ईमेल आयडी व मुख्याध्यापकाच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या Username व Password च्या आधारे लॉगीन करावे.
● त्यानंतर शाळा नोंदणी प्रपत्रामध्ये नमुद केलेली सर्व माहिती आपणास दिसेल. त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.
● संपर्कासाठी वैकल्पिक मोबाईल क्रमांक अथवा दुरध्वनी क्रमांक नमुद करावा.
● मुख्याध्यापकांचा फोटो व स्वाक्षरी शाळा माहिती प्रपत्रात अपलोड करणे अनिवार्य आहे.
➤ मुख्याध्यापकांचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपध्दती ८.५ से. मी. X ४.५ से. मी. आकाराच्या पांढऱ्या कागदावर रंगीत फोटो चिकटवून त्याखाली काळया शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावी. सदरचा फोटो व स्वाक्षरी स्कॅन करावी.
➤ फोटो व स्वाक्षरी JPG. JPEG किंवा PNG या फॉरमॅटमध्ये सेव्ह करावी.
➤ फोटो व स्वाक्षरीच्या फाईलची साईज १०० kb पेक्षा जास्त नसावी.
उपरोक्तनुसार सर्व माहिती भरून झाल्यानंतर Submit & Confirm बटनावर Click करावे.
•puppss School RegistrationSubmit & Confirm बटनावर Click केल्यानंतर माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना दिनांक २९-११-२०२१
इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक, दि. ७ जुलै २०२१ अन्वये ग्रामीण भागातील कोरोना मुक्त गावात इ. ८ वी ते इ.१२ वीचे दि.१० ऑगस्ट २०२१ अन्वये ग्रामीण भागात इ.५ वी ते इ.७ वी व शहरी भागातील इ. ८ वी ते इ. १२ वी तसेच दि. २४ सप्टेंबर, २०२१ अन्वये शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा दि.०४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
एकुणच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी व महापालिका हद्दीतील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि. ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. या विभागाच्या दिनांक ०७ जुलै २०२१ च्या परिपत्रकामध्ये ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तर दि. १० ऑगस्ट २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका/नगरपंचायत/ ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
परिपत्रकाची मुद्देसूद माहिती सहज सोप्या पद्धतीने
२.१ सदर समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी.
(i) शाळा सुरु करण्यापूर्वी संबंधित शहरात/ गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
(ii) सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद शिक्षणाधिकारी यांनी व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन १००% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
(ii) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
(iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही • लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.
(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत तसेच कोविडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांची सुध्दा कोरोना चाचणी करुन घ्यावी.
२.२) शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.
२.३) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी
(२.३) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
२.४) वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.
३. शासन परिपत्रक, दिनांक ७ जुलै, २०२१, दिनांक १० ऑगस्ट, २०२१ नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह दिनांक २४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकातील अतिरिक्त मार्गदर्शक सूचना एकत्रित करुन वरील प्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ व परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
४. दि. १ डिसेंबर २०२१ पासून ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा.
५. दि. १ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा.
६.वरील मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त शासनाने कोविड-१९ संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करावे
शाळा सुरु करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छत्ता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना
1. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे :
शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे.
• तापमापक (Thermometer), जंतूनाशक, साबण-पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावे. वापरण्यात येणारे तापमापक हे calibrated contactless infrared digital thermometer असावे.
• ज्या ठिकाणी वाहतूक सुविधेचा वापर करण्यात येणार आहे अशा शाळांनी मुख्याध्यापकांच्या नियंत्रणाखाली वाहतुक आराखडा तयार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरीता वाहतुकीसाठी वापरात येत असलेल्या वाहनांचे वेळो-वेळी निर्जंतुकीकरण करावे.
• एखाद्या शाळेत विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन सेंटर) / कोविड सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थलांतर करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करुन हस्तांतर शाळेकडे करावे.
२. शिक्षकांची कोविड-१९ बाबतची चाचणी:
संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ साठीची ४८ तासापूर्वीची RTPCR चाचणी करावी. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सदर चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. सदर प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करावी
• ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल positive असतील त्यांनी कोविड मुक्त झाल्यानंतरच शाळेत उपस्थित राहवे. शाळेच्या प्रमुखांनी आजारी असल्याच्या कारणामुळे कर्मचाऱ्यास रजेवर राहण्याची परवानगी देण्यात यावी.
ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल negative आहेत त्यांनी शाळेत उपस्थित राहताना कोविड-१९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच कोविड १९ बाबतची लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरीत चाचणी करावी.
शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण ( दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश द्यावा.
३. बैठक व्यवस्था : •
वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमांनुसार असावी.
वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.
बैठक व्यवस्थेमध्ये दोन विद्यार्थ्यां दरम्यान ६ फुटांचे अंतर असावे.
• विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णतः झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे.
४. शारीरिक अंतर (Physical distancing) च्या नियमांच्या अंमलबजावणीकरिता विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे :
शाळेत दर्शनी भागावर Physical distancing, मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना प्रदर्शित कराव्यात.
थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
. शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फूट इतके शारीरिक अंतर (Physical distance) राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्हे जसे चौकोन, वर्तुळ इत्यादींचा वापर गर्दी होणारी ठिकाणे, जसे पाणी पिण्याच्या सुविधा, हात धुण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे इत्यादीच्या ठिकाणी करण्यात यावा.
• शारीरिक अंतर (Physical distance) राखण्यासाठी जेथे शक्य असेल तेथे येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात
५. शाळेतील कार्यक्रम आयोजनावरील निर्बंध :
परिपाठ, स्नेह संम्मेलन, व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक- पालक बैठका शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात.
६. पालकांची संमती व पालकांनी घ्यावयाची दक्षता :
विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी वरील विषयी चर्चा करावी.
• आजारी असलेल्या किंवा लक्षण असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये.
७. विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांना कोविड-१९ च्या संदर्भातील आव्हाने व त्याबाबतची त्यांची भूमिका याबाबत जागरुक करणे:
• शाळा सुरु करण्यापूर्वीच विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांच्यात जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने पत्रके, पत्रे व सार्वजनिक घोषणांच्या माध्यमांचा वापर करुन पुढील मुद्द्यांबाबत कार्यवाही करावी:
वैयक्तिक स्वच्छता व नेहमी वापरण्यात येणारे पृष्ठभागांचे निर्जंतुकीकरण इत्यादीबाबत काय करावे किंवा काय करु नये याबाबतच्या सुचना.
शारीरिक अंतर पालनाचे (Physical distancing) चे महत्व.
• कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी आवश्यक स्वच्छताविषयक सवयी.
कोविड- १९ बाबतच्या गैरसमजुती.
कोविड-१९ ची लक्षणे आढळल्यास शाळेत जाणे टाळणे.
• मास्कचा वापर करावा
• हात सातत्याने साबणाने स्वच्छ करावेत.
• केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या सुचनांनुसार, सर्वच कर्मचारी जे (कोविड १९च्या अनुषंगाने) अधिक उच्च धोक्याच्या पातळीमध्ये आहेत, जसे वयोवृद्ध कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी व जे कर्मचारी औषध उपचार घेत आहेत, त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यांनी शक्यतो विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊ नये.
८. शाळेतील उपस्थितीबाबतच्या धोरणांमध्ये सुधारणा करणे:
विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमती वर अवलंबून असेल.
१००% उपस्थितीबाबत देण्यात येणारी पारितोषिके कोविड-१९ परिस्थितीमुळे सद्य:परिस्थितीत देऊ नये. भविष्यामध्ये कोविड परिस्थिती सुधारल्यानंतर नियमित शाळा सुरु झाल्यानंतर अशी पारितोषिके देता येतील.
९. शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण करणे आवश्यक
• शाळा सुरु करण्यापूर्वी त्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.
शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणिबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे.
संविधान दिन विशेष ऑनलाइन प्रश्नमंजुषा प्रमाणपत्रासह संविधान दिन निमित्त या वेबसाइट तर्फे ऑनलाईन टेस्ट घेण्यात येत आहे.विद्यार्थी शिक्षक यामध्ये सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचे व सर्टिफिकेट मिळवण्याचे नियम आपला ईमेल आयडी व्यवस्थित टाईप करावा ईमेल आयडी चुकल्यास प्रमाणपत्र उपलब्ध होणार नाही . प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकदाच स्पर्धा देण्याची संधी मिळणार आहे. आपले 10 पैकी 9 प्रश्न … Read more
राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू; पहिली ते चौथीचे वर्गही भरणार
All schools in-maharashtra to reopen from 1st december-2021
राज्याच्या कोविड टाक्स फोर्सनेही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याबाबत हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानुसार आता येत्या १ डिसेंबर पासून पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू होत आहेत. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुद्देसूद माहिती सहज सोप्या पद्धतीने
1.राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू
2.पहिली ते चौथीचे वर्गही भरणार
3.पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय मात्र तूर्त ऐच्छिक असणार आहे
4. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. 5.कोविड-१९ संबंधित खबरदारीचे उपाय आणि एसओपी लवकरच जारी करण्यात येतील.
6.या मुलांपैकी पहिलीतली मुलं अद्याप शाळेतच आलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्या पालकांशी संवाद साधण्यात येईल
7.सर्व मुलांसाठी सुरक्षित, आरोग्यदायी वातावरण तयार करण्यात येईल
8.राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन शाळा सुरू होण्यासंबंधी माहिती दिली
विद्यार्थ्यांनी खालील दोन्ही विषयांचा अभ्यास करावा
1.विषय – इंग्रजी
या विषयाचा पाठ समजावून देण्यासाठी व्हिडिओ दिलेला आहे व त्या वर आधारित प्रश्न दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम व्हिडीओ पहावा व त्यानंतर प्रश्नाचे उत्तरे आपल्या वहीत लिहावीत.
वरील विषयाचा आजचा घरचा अभ्यास पाहण्यासाठी
2 .विषय – विज्ञान
या विषयाचा पाठ समजावून देण्यासाठी व्हिडिओ दिलेला आहे व त्या वर आधारित प्रश्न दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम व्हिडीओ पहावा व त्यानंतर प्रश्नाचे उत्तरे आपल्या वहीत लिहावीत.
विद्यार्थ्यांनी खालील दोन्ही विषयांचा अभ्यास करावा
1.विषय – इंग्रजी
या विषयाचा पाठ समजावून देण्यासाठी व्हिडिओ दिलेला आहे व त्या वर आधारित प्रश्न दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम व्हिडीओ पहावा व त्यानंतर प्रश्नाचे उत्तरे आपल्या वहीत लिहावीत.
वरील विषयाचा आजचा घरचा अभ्यास पाहण्यासाठी
2 .विषय – विज्ञान
या विषयाचा पाठ समजावून देण्यासाठी व्हिडिओ दिलेला आहे व त्या वर आधारित प्रश्न दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम व्हिडीओ पहावा व त्यानंतर प्रश्नाचे उत्तरे आपल्या वहीत लिहावीत.
विद्यार्थ्यांनी खालील दोन्ही विषयांचा अभ्यास करावा
1.विषय – इंग्रजी
या विषयाचा पाठ समजावून देण्यासाठी व्हिडिओ दिलेला आहे व त्या वर आधारित प्रश्न दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम व्हिडीओ पहावा व त्यानंतर प्रश्नाचे उत्तरे आपल्या वहीत लिहावीत.
वरील विषयाचा आजचा घरचा अभ्यास पाहण्यासाठी
2 .विषय – विज्ञान
या विषयाचा पाठ समजावून देण्यासाठी व्हिडिओ दिलेला आहे व त्या वर आधारित प्रश्न दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम व्हिडीओ पहावा व त्यानंतर प्रश्नाचे उत्तरे आपल्या वहीत लिहावीत.