इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 33

इ 5 वी   आजचा सेतू अभ्यास दिवस 33

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास


समजून घेऊया जडणघडण

संदर्भ इयत्ता चौथी प्रकरण 17, माझी जडणघडण

कृतिपत्रिका 17

अध्ययन निष्पत्ती: कुटुंब / शाळा / शेजार या ठिकाणी निरीक्षण केलेल्या / अनुभवलेल्या समस्यांवर स्वतःचे मत मांडतात. (उदा. साचेबद्धपणा/ भेदभाव/ बालहक्क)

लक्षात घेऊया :

लहानाचे मोठे होताना आपण अनेक छोट्या-मोठया गोष्टी शिकत जातो. त्यातून आपल्या सवयी घडत जातात. आपल्या आवडीनिवडी ठरत जातात. हळूहळू आपले विचार पक्के होऊ लागतात. यालाच आपली जडणघडण होणे’ असे म्हणतात.

वरील चित्रांचे निरीक्षण करा.

हे प्रसंग सर्वांच्या घरात तसेच आजूबाजूला आपण बाहेर वावरताना होत असतात. यातूनच आपण चांगले संस्कार शिकत जातो; यासाठी घरातील वातावरण व सभोवतालचे व्यक्ती जे करतात त्यांच्या अनुकरणातून आपण संस्कार आणि खूप काही नवीन गोष्टी शिकत असतो. वरील तिन्ही चित्रांमध्ये कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, शेजारी असे अनेक लोक दिसत आहेत त्यांच्याकडूनही आपल्याला खूप काही शिकायला मिळते.

अवतीभवती बघून आपण अनेक गोष्टी शिकत असतो. आपल्या मित्रमैत्रिणी कशा बोलतात? कोणते कपडे घालतात? कोणते खेळ खेळतात? अभ्यास कसा करतात? हे अनेकदा आपण नकळतपणे शिकतो, क्याचदा शेजात्यांनी आपल्याला लहानपणापासून पाहिलेले असते. आपल्याविषयी त्यांना जिव्हाळा असतो. शेजाऱ्यांमुळे आपल्याला चांगल्या सवयी लागू शकतात. चांगला शेजार आपल्या जडणघडणीत महत्वाचा असतो.

सराव करू या :

प्र. 1) तुम्हाला येणाऱ्या प्रार्थनेच्या चार ओळी लिहा.

प्र. 2) गटाने खेळल्या जाणाऱ्या खेळांची नावे लिहा.

प्र. 3) काय कराल ते लिहा.

अ) शाळेत जाताना तुमचा मित्र पाय घसरून चिखलात पडला.

ब) बागेत दोन लहान मुलांचे भांडण सुरु आहे.

क) मांजराचा पाय गटारावरील जाळीत अडकला आहे.

प्र.4) तुम्हाला माहीत असणाऱ्या तुमच्या एका शेजाऱ्यांची पुढील माहिती मिळवा व वहीत लिहा.

अ) शेजाऱ्यांचे आडनाव काय आहे?

ब) शेजारी बोलली जाणारी भाषा कोणती?

क) त्यांच्या कुटुंबात किती माणसे आहेत ?

ड) त्यांच्याकडे बनवला जाणारा तुमच्या आवडीचा एक पदार्थ कोणता?

इ)शेजार्‍या कडे कोणकोणती झाडे, रोपे आहेत त्यांची नावे लिहा.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment