♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 34

इ 5 वी   आजचा सेतू अभ्यास दिवस 33

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

कृतिपत्रिका 18

समजून घेऊया स्थलांतर

संदर्भ इयत्ता चौथी प्रकरण 18, कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल

अध्ययन निष्पत्ती ) विस्तारीत कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध ओळखतात. 2) कुटुंबातील बदल (उदा. जन्म, लग्न, बदली इत्यादींमुळे होणारे बदल) स्पष्ट करतात.

लक्षात घेऊया:

माणसांची संख्या वेगवेगळी असू शकते. ही संख्या कायम तशीच राहत नाही. ती कमी-अधिक होत असते. कुटुंबातील सदस्याच्या लग्नामुळे कुटुंबाच्या सदस्यांच्या संख्येत वाढ किंवा घट होते. लग्नानंतर काफी किंवा हिनी आपल्या घरी आल्याचे आणि आत्या किंवा ताई दुसऱ्याच्या घरी गेल्याचे तुम्ही पाहिलं असेल. पुढील चित्रे पहा.

काही वेळा शिक्षणासाठी मुले-मुली दुसऱ्या ठिकाणी जातात. तसेच कामधंदा नौकरी-व्यवसायानिमित्त घरातील व्यक्ती ठिकाणी जाऊन राहू लागतात. अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला ‘स्थलांतर करणे’ असे म्हणतात.

कुटुंबातील माणसांची संख्या जशी वाढली तसे एक शेती करून कुटूंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले. व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास होत गेला. शहरे बाढू लागली. पोटापाण्यासाठी माणस जिथे कामदा मिळेल तिथे राहू लागली. मोठी कुटुंबे विरली गेली. त्यामुळे कुटुंब छोटी झाली.

गेल्या काही वर्षात शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने दुसया राज्यात आणि परदेशात जाण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. काही वेळा कुटुंबातील एखादी व्यक्ती परदेशात असते, तर एखादी व्यक्ती आपल्याच देशातील दुसया शहरात असते. त्यामुळे कुटुंबही बदलत आहे.

पक्षीसुद्धा स्थलांतर करतात. अत्र आणि निवारा यासाठी अनेक पक्षी स्थलांतर करतात. आकाशात इंग्रजी की (V) अक्षरासारखा आकार करून उडणाऱ्या सोचा था तुम्ही पाहिला असेलय, काही पक्षी दरवर्षी ठरावीक वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. काही पक्षी दूरवर उडत जातात, तर काही जवळच्याच ठिकाणी जाऊन राहतात.

सराव करू या :

प्र. 1) तुमच्या माहितीतील स्थलांतर करून आलेल्या कुटुंबाची खालील मुद्द्यांनुसार माहिती मिळवा.

अ) त्या कुटुंबाचे मूळ गाव कोणते ?

आ) कुटुंबाचे स्थलांतर करण्याचे कारण

इ) कुटुंबप्रमुखाचा व्यवसाय कोणता?

ई) ते कुटुंब स्थलांतर करून कधी आले ते वर्ष कोणते?

प्र. 2) स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांची माहिती मिळवा व लिहा,

प्र. 3) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) स्थलांतर म्हणजे काय?

आ) तुमच्या मते पक्षी स्थलांतर का करत असतील?

इ) कुटुंबे लहान का झाली? तुमच्या शब्दात लिहा?


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment