उद्देश्य व विधेय ऑनलाइन टेस्ट संदिप सर 25th October 202525th October 2025 by sandeepwaghmore वाक्याचे भाग (उद्देश्य व विधेय) – ऑनलाइन चाचणी वाक्याचे भाग (उद्देश्य व विधेय) - सराव चाचणी **विद्यार्थी नाव:** विभाग (अ) : उद्देश्य विभाग ओळखा तिला मी आई म्हणतो. (१) तिला (२) ताई (३) मी (४) तिला ताई म्हणतो मुग्यांचे सामर्थ्य संघटनेत आहे. (१) संघटनेत (२) मुग्यांचे सामर्थ्य (३) मुग्यांचे (४) संघटनेत आहे मुलाच्या प्रेमापोटी हिरकणीने धाडस केले. (१) हिरकणीने (२) मुलाच्या प्रेमापोटी (३) धाडस केले (४) मुलाच्या हिरकणीने सर्कशीत धमाल उडवून दिली विदूषकाने. (१) सर्कशीत (२) धमाल (३) उडवून दिली (४) विदूषकाने सारे ससे पळू लागले. (१) ससे (२) सारे ससे (३) पळू लागले (४) सारे शिकाऱ्याच्या जाळ्यात वाघ अडकला. (१) शिकाऱ्याच्या (२) जाळ्यात (३) वाघ (४) अडकला शीलाशिवाय विद्या फुकाची आहे. (१) विद्या (२) फुकाची (३) शीलाशिवाय (४) शीला शिवाय विद्या रिमझिमत्या पावसात सत्परंगी इंद्रधनुष्य दिसले. (१) रिमझिमत्या पावसात (२) इंद्रधनुष्य (३) दिसले (४) सप्तरंगी इंद्रधनुष्य विभाग (ब) : विधेय विभाग ओळखा महात्मा गांधी पंचा नेसू लागले. (१) गांधी (२) नेसू लागले (३) महत्मा गांधी (४) पंचा नेसू लागले भैरुची गाय गवत खाते. (१) भैरुची (२) गवत (३) गवत खाते (४) भैरुची गाय रंगीबेरंगी फुलपाखरे फुलांवर बागडतात. (१) बागडतात (२) फुलांवर बागडतात (३) फुलपाखरे (४) रंगीबेरंगी फुलपाखरे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. (१) फार महत्त्वाचा आहे (२) आजचा दिवस (३) महत्त्वाचा आहे (४) फार आहे खूप हसू आले लोकांना. (१) लोकांना (२) हसू आले (३) खूप हसू आले (४) आले हरणाचे पाडस गोंडस असते. (१) पाडस (२) असते (३) हरणाचे पाडस (४) गोंडस असते वेशीच्या पलीकडे चारमिनार आहे. (१) चारमिनार (२) वेशीच्या पलीकडे आहे (३) चारमिनार आहे (४) पलीकडे आहे गावाजवळून नदी वाहत होती. (१) होती (२) गावाजवळून (३) नदी (४) गावाजवळून वाहत होती विभाग (क) : मिश्र प्रश्न 'सारे ससे उड्या मारू लागले.' या वाक्यातील उद्देश्य कोणते ? (१) सारे ससे उड्या (२) ससे (३) ससे उड्या (४) सारे ससे 'नदी गावाजवळून वाहत होती.' या वाक्यात विधेय भाग कोणता ? (१) गावाजवळून वाहत होती. (२) होती (३) नदी वाहत होती. (४) वाहत होती पुढील वाक्यातील विधेय कोणते ? 'राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते.' (१) भारताचे पंतप्रधान (२) राजीव गांधी (३) पंतप्रधान होते (४) भारताचे पंतप्रधान होते. उद्देश्य व विधेय हे \_\_\_\_\_\_\_\_ चे दोन भाग होत. (१) क्रियापद (२) वाक्य (३) शब्द (४) विशेषण रिकाम्या जागी योग्य विधेयाने वाक्य पूर्ण करा : कैरी \_\_\_\_\_\_\_\_ (१) गरे करावेत (२) वेलीला लागते (३) तिखट असते (४) आंबट असते. निकाल पहा व सबमिट करा