[ad_1]
या स्टेटमेंटमध्ये म्हटले की, युजरच्या कोणत्याही खासगी माहितीला धोका नाही. अॅप बनवणाऱ्या आरोग्य सेतूने पुन्हा एकदा हे स्पष्ट केले आहे. जे अॅपमध्ये आहे. ते युजरच्या लोकेशनवरून जमा करण्यात येते. त्यानंतर ते सर्व्हरमध्ये स्टोर केले जाते. त्यानंतर हे सुरक्षित, एनक्रिप्टेड आणि अनोनिम्स प्रमाणे ठेवले जाते. आरोग्य सेतू स्टेटमेंट दिल्यानंतर हॅकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या अॅप संदर्भातील काही माहितीचा लवकरच खुलासा करू, असा इशारा दिला आहे.
वाचाः आरोग्य सेतू मित्र पोर्टल लाँच, घरात बसून मिळणार आरोग्य सुविधा
आरोग्य सेतू मोबाइल अॅपला भारत सरकारने काही दिवसांपूर्वीच लाँच केले होते. हे अॅप सरकारचे अधिकृत कोविड-१९ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप आहे. या अॅपला इन्फॉर्मेटिक्स सेंटरने विकसित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केल्यानंतर या अॅपने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.
वाचाः धक्कादायक ‘लॉकर रुम’; पालकांनो, राहा सावध
आरोग्य सेतूचा असा वापर करा
>> आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यासाठी फोन नंबरची नोंदणी करा. फोन नंबर टाकल्यानंतर एक ओटीपी येईल. ते एन्टर केल्यानंतर अॅपची नोंदणी होईल.
>> त्यानंतर हे अॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचे अॅक्सिस मागेल.
>> अॅप उघडल्यानंतर पर्सनल माहिती विचारली जाईल. ज्यात लिंग, नाव, वय, व्यवसाय आणि ३० दिवसांचा प्रवासाची माहिती विचारली जाईल. तुम्ही हे पर्याय स्कीप करू शकतात.
>> त्यानंतर भाषा निवडू शकतात. संकटाच्या या काळात स्वतः कार्यकर्ता म्हणून नोंदणी करू शकतात.
>> आरोग्य सेतू अॅप हे एक सोशल ग्राफचा वापर करतो. ज्यात हाय रिस्कची एक गट माहिती पडतो. सोशल ग्राफ लोकेशनची माहिती या आधारावर बनवली जावू शकते. ज्यावेळी तुम्ही हाय रिस्कच्या गटात आले तर तुम्हाला अलर्ट मिळेल. हाय रिस्क गटात आल्यानंतर अॅप टेस्ट सेंटरला जाण्यासाठी सूचना करेल.
[ad_2]
Source link