विषय – मराठी
सर्वनाम
काही वाक्य वाचू या..
राम माझा मित्र आहे. राम हुशार आहे. रामला खेळायलाही आवडते. राम माझा मित्र आहे. तो हुशार आहे. त्याला खेळायलाही आवडते. दुसऱ्या वाक्यात राम एकदाच लिहिले आहे. नंतर ‘तो’ आणि ‘त्याला’ असे लिहिले आहे. अगदी बरोबर बोलताना किंवा लिहिताना आपण असेच करतो. सारखे काही नाव घेत नाही. एकदा नाव घेतल्यानंतर नामाच्या ऐवजी तो, ती, ते, त्याचे, त्याला, त्याने असे जे शब्द आपण वापरतो त्यांना सर्वनाम म्हणतात. सर्वनाम हे मुलांच्या व्यक्तीच्या वस्तूंच्या नावाऐवजी वापरतात असे आणखी काही शब्द पहा तुम्हाला आठवतात का?
विद्यार्थ्यांना खालील परिच्छेद वाचा
माझ्या बहिणीचे नाव सायली. तिला सगळे लाडूबाई म्हणतात. कारण ती सगळ्यांची लाडकी आहे आणि लाडूसारखी गोल आहे. तिला अजून चालता येत नाही. ती रांगत सगळ्यांकडे जाते.
1.वरील परिच्छेदातील संबंधित नाम शोधा व लिहा
2. वरील परिच्छेदात जे शब्द ठळक केले आहेत ते कोणत्या नामाऐवजी वापरले आहेत.
ते नाम खाली दिलेल्या नामामध्ये आहे का ? असेल तर त्या पुढे अशी खूण (v) करा.
लाडू [ ] माझ्या [ ] सायली [ ]

योग्य तेथे सर्वनाम वापरून खालील परिच्छेद पुन्हा लिहा.
सई एका मोठ्या खोलीमध्ये गेली. तिथे सईला मघाचा बुटका विदूषक आपले पाय वर करून हातांवर चालताना दिसला. सईला फारच राग आला. “खोटारडा!” सई ओरडली.



विषय – इंग्रजी
विषय – इंग्रजी
Template No: 9
Write a story by using the given pictures.
खाली दिलेली चित्रे पहा व त्या आधारे गोष्ट तयार करा
उदाहरणार्थ :-


विषय – विज्ञान प्रश्नपत्रिका
विद्यार्थ्यांनी खालील प्रश्नपत्रिका सोडवावी


खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१) पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते ?
उत्तर : ………………………………………….
२) श्वासोच्छवास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते ?
उत्तर : ………………………………………….
३) ही गरज तुम्ही कशी भागवता ?
उत्तर : ………………………………………….
खालील माहिती वाचा व त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहा
पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात . पृथ्वीच्या पृष्टभागापासून आपण जसजसे उंच जातो तसतशी वातावरणातील हवा विरळ होत जाते. पृथ्वीच्या पृष्टभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यंबर, आयनांबर, बाहयांबर विविध थर मानतात . पुढील आकृतीचे निरीक्षण करून वातावरणाचे थर समजून घ्या.
पृथ्वीच्या पृष्टभागापासून सरासरी १३ किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर असे म्हणतात . तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. या बदलांचे सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होतात. हवामानाशी संबंध असलेल्या सर्व घटना तपांबरातच होतात.
पृथ्वीतलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे ५० किलोमीटरपर्यंतच्या थराला स्थितांबर म्हणतात. स्थितांबरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते .
1 पृथ्वीच्या भोवती वातावरणाचे किती थर आहेत त्यांची नावे लिहा.
उत्तर : ………………………………………….
2 वातावरणातील कोणत्या थरात हवामानाशी संबंध असलेल्या घटना होतात?
उत्तर : ………………………………………….
3 ओझोन वायुचे संवर्धन तुम्ही कशा प्रकारे कराल ?
उत्तर : ………………………………………….
४ वातावरणाचे थर दर्शविणारी सुबक आकृती काढा
विषय – हिंदी
निम्नलिखित चित्र देखकर उनके नाम का उच्चारण करे और लिखिए

निम्नलिखित प्रश्न के उत्तर लिखिए
1 चित्र में देखकर वचन और लिंग के उदाहरण बताओ
जवाब ………………………………………….
2 सिक्के, औषधियाँ इन शब्दों के एकवचन लिखो।
जवाब ………………………………………….
3 गाय, हिरनी इन शब्दों के पुल्लिंग लिखो।
जवाब ………………………………………….