♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 18

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 18 

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

स्वल्पविराम आजचा वापर कोठे कोठे होतो हे खालील माहिती वाचून समजून घ्या

आएकाच वाक्यात एकाच प्रकारचे शब्द म्हणजे अनेक नामे, अनेक विशेषणे, अनेक क्रियापदे, वाक्यांचे लहान तुकडे वगैरे एकापाठोपाठ एक यादी केल्यासारखे आले तर ते एकमेकांपासून वेगळे दाखविण्यासाठी स्वल्पविरामाचा वापर होतो.

1) रहीमच्या पिशवीत मोबाईल, बॅट, कॅमेरा व पुस्तके आहेत. ( या वाक्यात वस्तूंच्या नावांची म्हणजे नावांची यादी आहे व दोन वस्तूंच्या नावांमध्ये स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केल्यामुळे विविध वस्तूंच्या नावांचा उल्लेख स्पष्टपणे जाणवत आहे. )

2) दुकानातून बाहेर पडलेला तो माणूस बुटका, जरासा लठ्ठ, गबाळा आणि साधाभोळा दिसत होता. ( या वाक्यात त्या व्यक्तीचे वर्णन करणाऱ्या शब्दांची म्हणजे विशेषणांची यादी आहे दोन विशेषणांमध्ये स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केल्यामुळे विविध विशेषणांचा उल्लेख स्पष्टपणे जाणवत आहे.) (3) आरतीने पिशवीतून सगळ्या भाज्या काढल्या, वेगळ्या केल्या निवडल्या, धुतल्या चिरल्या आणि डब्यांमध्ये भरून ठेवल्या. (या वाक्यात क्रियापदांची यादी आहे)

4) आभाळातून बर्फाचे छोटे पुंजके तरंगत, हेलकावत, झोके घेत, अलगद जमिनीवर टेकत होते या वाक्यात क्रियाविशेषण यांची यादी आहे .( दोन

क्रियाविशेषणांमध्ये स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केल्यामुळे विविध क्रियाविशेषणांचा उल्लेख स्पष्टपणे जाणवत आहे.) ब) वाक्यातील अशा यादी असलेल्या शेवटच्या शब्दानंतर स्वल्पविराम देत नाहीत कारण तिथे थांबण्याची गरज नसते.

क) अशा यादीत दोनपेक्षा अधिक शब्द असतील तरच स्वल्पविरामांचा वापर केला जातो. दोनच शब्द असल्यास ‘आणि’ किंवा ‘व’ अशा उभयान्वयी म्हणजे दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अव्ययांनी काम भागते.

ड) यादी संपल्याचे लक्षात यावे म्हणून शेवटचे दोन शब्द स्वल्पविरामाऐवजी आणि’ किंवा ‘व’ वापरून वेगळे दाखवले जातात. इ) खूप मोठे वाक्य असेल व त्या वाक्यात दोन क्रिया दर्शवणारी क्रियापदे असतील तर पहिल्या क्रियेच्या वाक्यानंतर स्वल्पविराम वापरला जातो. व दुसऱ्या वाक्यानंतर मग पूर्णविराम दिला जातो. ( स्वराजने बाजारात जाऊन आंबे आणले, ते आईला आमरस करण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊन दिले). फ) संबोधन दर्शवताना स्वल्पविरामाचा वापर होतो (उदाहरणार्थ:- मुलांनो, कामाला लागा.)

(पुढील परिच्छेद वाचा व योग्य ठिकाणी स्वल्पविरामांचा वापर करून तो परिच्छेद पुन्हा लिहा.)

स्वराली व तिच्या मित्र मैत्रिणींनी पुरंदर किल्ल्यावर सहलीला जायचे ठरवले सहलीला त्यांच्यासोबत मीना रहीम ज्यूली व हरप्रीत गोंदया चिंगी हे मित्र- मैत्रिणी होते प्रत्येकाने दोन-दोन पदार्थ आणायचे ठरवले दुपारी जेवताना सर्वांनी आपापल्या पिशवीतून पदार्थ बाहेर काढले व कागदावर ठेवले कागदावर शेंगदाणे फुटाणे भेळ चकली करंजी शेंगदाण्याची चटणी अळूची वडी चिक्की लाडू पराठा थालीपीठ नाचणीची भाकरी भात हे पदार्थ जमा झाले दिवसभरात त्यांनी प्राणिसंग्रहालय वस्तुसंग्रहालय किल्ला धरण प्रदर्शन या ठिकाणी भेट दिली

विषय  – गणित आजचा सेतू अभ्यास

विषय  – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास

Template No -18 

Imagine you have some treasure you want to hide. Decide where to hide it on the map below and keep it in your mind. Don’t tell your partner! Help your partner to reach the treasure by giving instructions.

कल्पना करा की आपल्याकडे काही खजिना आहे ज्यास आपण लपवू इच्छित आहात. खाली नकाशावर कुठे लपवायचे हे ठरवा आणि ते आपल्या मनात ठेवा. आपल्या जोडीदारास सांगू नका! सूचना देऊन आपल्या जोडीदाराला तिजोरीत पोहोचण्यास मदत करा.

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

राज्याभिषेक सोहळा : हा पाठयांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग -२) या पाठ्यपुस्तकात पान क्र. ५०,५८५१ वर आहे.

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1) शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा कोठे केली होती?

उत्तर : ………………………………………….

२) शिवरायांनी राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली ?

उत्तर : ………………………………………….

३) राज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले?

उत्तर : ………………………………………….

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१) शिवरायांचा राज्याभिषेक केव्हा झाला?

उत्तर : ………………………………………….

२) शिवरायांनी राज्यभिषेकापासून कोणता शक सुरु केला?

उत्तर : ………………………………………….

३) मासाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का वाहू लागले?

उत्तर : ………………………………………….


दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा