♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 18

इ  6 वी  सेतू अभ्यास दिवस 18

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास |News in marathi

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१) तुम्ही बातम्या कोठेकोठे ऐकता, पाहता? 

उत्तर : …………………………………………

२) बातम्या कोणत्या विषयांवर असतात?

उत्तर : …………………………………………

३) बातम्या का ऐकल्या/पाहिल्या पाहिजे? 

उत्तर : …………………………………………

४) बातम्यांचे उपयोग कोणते?

उत्तर : …………………………………………

५) बातम्या कितपत खऱ्या किंवा खोट्या असतात असे तुम्हांला वाटते?

उत्तर : …………………………………………

खालील बातमी वाचा व त्या खालील असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१) कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो?

२) वरील बातमी कोणत्या तारखेची आहे? 

३) वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे? 

४) कोणत्या विद्यार्थ्यास ‘उत्कृष्ट वाचक’ म्हणून बक्षीस देण्यात आले? 

५) विद्यार्थ्यांमध्ये वाचनकौशल्य वाढावे यासाठी शाळेत कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील यावर गटचर्चा करा. त्याची यादी तयार करा.

६) तुमच्या शाळेत वाचन प्रेरणा कशा प्रकारे साजरा करण्यात येतो?

विषय  – गणित आजचा सेतू अभ्यास

1. गुणाकार करा. multiplication ,how to teach multiplication to grade 2

multiplication techniques

(1) 327×92

(2) 807 × 126

(3) 567 × 890

(4) 4317 x 824

(5) 6092 x 203

(6) 1177 x 99

(7) 456 x 187

(8) 6543 × 79

(9) 2306 x 832

(10) 6429 × 509

(11) 4,321 x 678

(12) 20,304 x 87

2. ‘प्लॅस्टिक टाळा’ या अभियानात 745 विदयाथ्र्यांनी प्रत्येकी 25 कागदी पिशव्या तयार केल्या, तर एकूण किती कागदी पिशव्या तयार झाल्या ?

3. एका वनराईमध्ये एका रांगेत 215 याप्रमाणे 132 रांगांत औषधी वनस्पतींची रोपे लावली, तर त्या वनराईमध्ये एकूण किती रोपे लावण्यात आली ?

4. एका संगणकाची किंमत 27,540 रुपये आहे तर तशाच 18 संगणकांची किंमत काढा.

5. ‘इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड’ या योजने अंतर्गत विज्ञान प्रकल्पाचे साहित्य खरेदी करण्यासाठी एका विद्यार्थ्याला ₹5000 देण्यात आले. एका तालुक्यातील 154 विदयार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला, तर त्या तालुक्यात या योजनेसाठी किती निधी देण्यात आला ?

6. एका दुचाकी वाहनाची किंमत 53, 670 रुपये आहे, तर अशा 35 वाहनांची किंमत काढा,

7. एका तासात 3600 सेकंद असतात, तर 365 तासांत किती सेकंद असतील ?

विषय  – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास

Template No: 18 

animals name in english alphabetical order , arrange in alphabetical order worksheets

Put the words in each row in alphabetical order

अल्फाबेटीकल ऑर्डर प्रमाणे खालील शब्द  लावा 

 1. Book ,boy, brown, biscuit, ball

2. Frog, Fish, Farmer, Father, Friend

3. Cab, clove, clean, cat, camel 

4. Steam, chop, Mix, grate, Boil 

Read the words in a row. Arrange them in alphabetical order. Also try to guess and then find the meaning of all these words from a standard dictionary or online dictionary. 

खालील शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावा व त्या शब्दांचे अर्थ लिहा आपण या ठिकाणी ऑनलाइन डिक्शनरीचा वापर करू शकता

1. Pear, Peach, Potato, Plum

Ans. …….., ………., ………, ………. 

2.Dolphin, Kangaroo, Whale, Octopus

Ans. ……….., ………., …………, …………

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

खालील माहिती वाचा व त्याखाली असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर लिहा  images of homo erectus

अगोदरच्या पाठात तू प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे पहिले, या पाठात मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे पाहू. कुशल मानव म्हणजे हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव. याच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया, कैनिया या देशांच्या परिसरात मिळाला. लुई लिकी या शास्त्रज्ञाने कुशल मानवाला होमो हॅबिललिस हे नाव दिले. लटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ मानव आहे तर हॅबिलीस याचा अर्थ हाताचा कुशलतेने वापर करणारा. कुशल मानव दोन पायांवर उभे राहून चालू शकत होता, परंतु त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता. या मानवाचा मेंदू एप वानारापेक्षा मोठा असला तरी चेहरा व हात-पायांची वैशिष्ट्ये बऱ्याच प्रमाणात सारखीच होती. कुशल मानवाने निर्माण केलेल्या दगडी हत्यारांचा उपयोग मांस खखडणे, हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडे फोडणे यासाठीच होत. कुशल मानव छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा तसेच खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी फळे केंद मुळे इत्यादी गोळा करत असावा.

ताठ कण्याचा मानव ताठ इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा म्हणून त्याला होमो इरेक्टस नाव देण्यात आले. हा मानव समूहाने राहत होता. कुशल मानवाच्या तुलनेत याचा मानवाचा मेंदू हा अधिक विकसित होता. जंगलात लागणारे वणवा पाहून या मानवाला अग्नीची ओळख झाली होती परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र अवगत झाले नव्हते. हत्यारे पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होती. आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडात ताठ कण्याच्या मानवाचे अवशेष व त्यांनी तयार केलेली हत्यारे मिळाली आहेत.

शक्तिमान मानव नावाप्रमाणेच या मानवाची शरीरयष्टी धिप्पाड होती. याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील निअॅडरथल येथे मिळाले म्हणून त्यांना निअँडरथल मॅन असे म्हणतात. ताठ कण्याच्या मानवापेक्षा मेंदू अधिक विकसित होता. हे मानव गुहांमध्ये राहत असत. दगडांच्या मोठ्यापासून आणि गोटे तासून निघालेले छिलके अशा दोहोंपासून वेगवेगळी हत्यारे बनवत असत. शिकारीतून मिळालेल्या चामड्याचे कपडे वापरत असे. या मानवाने अग्नीचा शोध लावला असे म्हणता येईल. कारण कठीण लाकडांच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याने साधलेली होती. बुद्धिमान मानवांशी संघर्ष, पर्यावरणातील बदलांशी जुळवून न घेता आल्याने सुमारे ३०००० वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला, असे करें १४ पद्धतीच्या आधारे सांगितले जाते.

बुद्धिमान मानव विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव म्हटल्या गेले. सेपियन म्हणजे बुद्धिमान, बुद्धिमान मानवाला होमो सेपियन असे म्हणतात. युरोपमध्ये या मानवाला क्रोमैनॉन म्हणून ओळखले जाई. या मानवाचे अवशेष आफ्रिका आशिया, आणि युरोप या खंडांमध्ये सापडले आहेत. बुद्धिमान मानव आपल्या गरजेनुसार विविध प्रकारचे हत्यारे आणि अवजारे बन त्यासाठी तो दगड आणि हाडाचा किंवा लाकडाचा वापर करत असे. बुद्धिमान मानवाचे स्वस्यंत्र पूर्णपणे विकसित झाले होते, त्यामुळे ध्वनीच्या विविध प्रकारचे उच्चार त्याला करता येऊ लागले होते. स्वरयंत्र म्हणजे घशातील आवाज निर्माण करणारा भाग. प्रत्यक्ष निरीक्षण आपल्या कल्पनाशक्तीच्या आदरणीय तो चित्र काढू लागला आणि कलात्मक वस्तूसुद्धा तयार करायला लागला होता.

प्रगत बुद्धीचा मानव प्रगत बुद्धीचा मानव यालाच होमो सेपियन सेपियन असे म्हणतात. या

मानवाच्या मेंदूची क्षमता आणि त्याचबरोबर आकलन क्षमता सतत विकसित होत गेली. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आधुनिक मानव म्हणजे आपण आपल्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात. अनुवांशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनुकशास्त्र असे म्हणतात. याच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंशी असल्याचे आढळून आले आहे. मग शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज होते असे म्हणता येते. स. पू. सुमारे ११,००० ते इ.स.पू. १०,००० च्या सुमास आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले. त्याच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला व तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. प्रत्येकच प्राणी अन्न मिळण्याची मूलभूत गरज पूर्ण करतो. परंतु आधुनिक मानव त्यावरच समाधान मानत नाही तर आपल्या कल्पनेतून बुढी कौशल्यातून त्याने स्वतःचे जीवन समृद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आला आहे याच प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि मानवाचा विकास होत आला आहे.

वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.

उत्तर : …………………………………………

या प्रश्नांची उत्तरे शोधू

उत्तर : ………………………………………….

1 कुशल मानवाचे अवशेष कोठे सापडले?

उत्तर : ………………………………………….

2 अग्रीचा वापर कोणत्या मानवाने केला?

उत्तर : ………………………………………….

3 शक्तिमान मानवावे हत्यारे कशी तयार केली?

उत्तर : ………………………………………….

4 कोणत्या मानवाचे स्वरयंत्र विकसित झाले होते?

उत्तर : ………………………………………….

5 आनुवंशिकता म्हणजे काय?

उत्तर : ………………………………………….

विषय  – हिंदी आजचा सेतू अभ्यास

निम्नलिखित चित्र के बारे में  बताएं | 

जानकारी बताओ  

1 डाकिया

2  सैनिक

 3 किसान