♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस पंधरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस पंधरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

(शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कविता वाचून दाखवावी. कविता पुन्हा वाचायला सांगावी. ही कविता वाचून त्यांच्या मनात काय विचार आले ते स्वतः च्या शब्दात लिहून काढायला सांगावे. उतारा, कविता मुलांच्या अनुभवविश्वाशी निगडीत असावी.)

+ सक्षम बनू या

36

राज्योधन न प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

(शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कवितेवर आधारित प्रश्न विचारून विद्यार्थ्याना बोलते करावे. विचारप्रवृत्त

करावे. स्वतःच्या कविता लिहिण्याचा सराव द्यावा.)

उदा. आपण सारे शाळेत जाऊ.

(या ओळीने सुरवात करून कविता पूर्ण करायला सांगावी)

+ सराव करूया

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना द्यावी.

आपल्या आवडत्या पदार्थाबद्दल मित्रासोबत चर्चा करा.

तो पदार्थ बनवण्यासाठी कोणते पदार्थ लागतात ? त्याची कृती काय ते लिहा.

• गरज पडल्यास आपल्या आईची, मित्राची मदत घ्यावी.

+ कल्पक होऊ या

 विषय –  गणित 

विदयार्थी मित्रानो तुम्हाला सर्वाना आय. पी. एल. बघायला नक्की आवडत असेल म्हणूनच आपण आय.पी.एल. वर आधारित एका स्तंभालेखाचे निरीक्षण करणार आहोत. आय. पी. एल. मध्ये मुंबई इन्डियन्स ने पॉवर प्ले मध्ये बनवलेल्या सहा सामन्यातील धावांचा तपशील खालील स्तंभालेखामध्ये दर्शविलेला आहे.

आता आपण स्तंभालेख समजावून घेऊयात..

1. आडव्या अक्षावर ( X अक्षावर ) समान अंतरावर सहा सामने क्रमाने दाखवले आहेत.

2. उभ्या अक्षावर (Y अक्षावर ) समान अंतरावर प्रत्येक सामन्यातील पॉवर प्ले मधील धावा दाखवल्या आहेत.

3. प्रत्येक सामन्यात पॉवर प्ले मध्ये किती धावा केल्या आहेत ते आपल्याला स्तंभाच्या उंचीवरून समजेल. उदाहरणार्थ पहिल्या स्तंभाची उंची 40 आहे म्हणजेच पहिल्या सामन्यात मुंबई इंडिअन्स ने पॉवर प्ले मध्ये 40 धावा केल्या आहेत, याप्रमाणे प्रत्येक स्तंभाच्या उंचीवरून इतर सामन्यातील धावा तुम्ही सांगू शकता.

वरील स्तंभालेखावरून आपण दिलेली माहिती तक्त्यात खालीलप्रमाणे मांडू शकतो.

1. उभ्या रेषेवर (Y अक्षावर ) कोणती माहिती दर्शवली आहे ?

2. आडव्या रेषेवर (X अक्षावर ) कोणती माहिती दर्शवली आहे ?

3. सर्वाधिक धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत व किती ?

4. सर्वात कमी धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत व किती ?

5. कोणत्या दोन सामन्यांमध्ये समान धावा केल्या आहेत व किती ? वरील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा व तुमच्या शिक्षकांकडून किंवा पालकाकडून तपासून घ्या.

सोडवून पाहू

खालील स्तंभालेखाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 

 विषय –  इंग्रजी 

Learning Activity/Experience: –

1. Makes two group X and Y.

2. Selects 4 Students from each group.

3. Distribute strips of types of statements with only naming to X Group. 4. Distribute types of sentences which having sentences and signs to ‘Y’ group.

5. ‘Y’ group stands in the form of circle. for example, circle ‘x’ group ‘y’ group. 6. Rings a poem on mobile. students of both circles start to run when music of poem stop, students also stop.

7. Then they check as their partner having same strips with types of sentence and strips

with having sentences of type with symbol. 8. That pair is winner pair. They read sentences & sign.

9. In the same way play the game.

10. Both were having strips like student of ‘X’ group (statement). Students of ‘Y

‘groups (I like my….)

4. Solved Activity/ Demo: – For example

Statements- This is a friendly dog.

Question What’s the time? Are you ready? Commands and orders – Come here.

Exclamations- How nice!

5. Practice: –

In a group of students play this activity.

6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement: –

Name the types of the following sentences:

1) Are you ready to help? ……………..

2) How foolish we are! ……………..

3) I am here on my school project. ……………..

4) What are you doing? ……………..

5) Open the door. ……………..

विषय -विज्ञान 

कृतिपत्रिका : 15

समजून घेऊ या : चुंबक, चुंबकत्व, शोध, चुंबकीय पदार्थ, अचुंबकीय पदार्थ. संदर्भ : इयत्ता 6वी, प्रकरण 15 – चुंबकाची गंमत. अध्ययन विष्पत्ती : शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा दैनंदिन जीवनात वापर करतात.

सराव करूया :

1) तुमच्या घरी कोणकोणत्या उपकरणांमध्ये चुंबकाचा वापर केला आहे त्याची यादी करा.

2) तुमच्या आसपासच्या पदार्थांमधून चुंबकीय पदार्थ व अचुंबकीय पदार्थ ओळखा. त्यांचे खालील तक्त्यात वर्गीकरण

करा.

4 ) असे का होते ?

a) पिन होल्डर उलट धरला तरी त्यामध्ये ठेवलेल्या टाचण्या खाली पडत नाहीत.

(b) फ्रिजचे दार लावत असताना एका ठराविक अंतरावर ते आपोआप बंद होते आणि पुन्हा ओढल्याशिवाय उघडत नाही.

5) चित्रात दिसणाऱ्या यंत्राचे नाव लिहा व त्याचा वापर कुठे कुठे होते ते शोधून लिहा.