पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस पंधरा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
How to make a paper clip float!
How is this possible? With a little thing we scientists call SURFACE TENSION. Basically it means that there is a sort of skin on the surface of water where the water molecules hold on tight together. If the conditions are right, they can hold tight enough to support your paper clip. The paperclip is not truly floating, it is being held up by the surface tension. Many insects, such as water striders, use this “skin” to walk across the surface of a stream. Let’s try it. We need clean dry paper clips, tissue paper, a bowl of water and pencil with eraser. Take a bowl and fill it with water. Fill the bowl with water. Try to make the paper clip float…not much luck, huh? Tear a piece of tissue paper about half the size of a dollar bill. GENTLY drop the tissue flat onto the surface of the water. GENTLY place a dry paper clip flat onto the tissue (try not to touch the water or the tissue). Use the eraser end of the pencil to carefully poke the tissue (not the paper clip) until the tissue sinks. With some luck, the tissue will sink and leave the paper clip floating!
Read the text again, underlining the actual instructions. On a separate sheet of Paper; draw a flow chart that shows the instructions in the correct order.
4. Solved Activity/ Demo:
Students enlist the material like “bowl”
Students highlight the steps and draw a flow chart. It should start with
“Take a bowl and fill it with water”.(this will be the first stage)
5. Practice:
Try the experiment yourself without taking help of flow chart.
6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:
Try the experiment yourself without taking help of flow chart.
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 15
समजून घेऊ या: स्त्रायुसंस्था, पचनसंस्था
संदर्भ: इयत्ता सातवी, प्रकरण 12 मानवी स्नायू व पचनसंस्था
अध्ययन निष्पत्ती: नामनिर्देशित आकृत्या / प्रवाह तक्ते काढतात. उदा.- मानव आणि वनस्पतींच्या इंद्रियसंस्था, रेशीम
किड्याचा जीवनक्रम, इत्यादी.
सराव करू या..!
1. काय होईल ते सांगा. जर आपल्या शरीरामधील हृदयाच्या स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण झालेच नाही तर….
2. पुढे दिलेल्या क्रियांचे वर्गीकरण करा. सायकल चालविणे, अन्नाचे पचन, श्वसन, पतंग उडविणे, बोलणे, हृदयाचे
आकुंचन-प्रसरण
ऐच्छिक क्रिया
अनैच्छिक क्रिया
3. समजा तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना स्नायूदुखीची समस्या निर्माण झाली तर त्यांना स्नायूच्या बळकटीसाठी कोणते उपाय सुचवाल ?
4. दोरीवरच्या उडया मारतांना कोणत्या स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण होत असेल, हे तुमच्या स्वतः च्या अनुभवातू लिहा.
5. फक्त नावे लिहा.
अ) कोणत्या इंद्रियामार्फत पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात?
आ) ग्लुकोजचा साठा करणारी ग्रंथी.
6. बाजूच्या आकृतीमध्ये मानवी पचनसंस्थेचे वेगवेगळे भाग P, Q, R, S या अक्षरांनी दर्शविलेले आहेत. यापैकी कोणत्या भागात प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होते?
7. राहुलने सकाळी एक ग्लास दूध प्यायले. दुधाचे पचन होत असतांना त्यातील प्रथिनांवर कोणत्या क्रिया होत असतील. हे तुमच्या शब्दात सांगा,
विषय – इतिहास ना.शास्त्र
पहिले काही बाबी आठवू
1) उद्देशिकेतील उद्दिष्टे कोणती आहेत?
2) स्थानिक शासन संस्था म्हणजे काय?.
3) तुमच्या गावात कोणती स्थानिक शासन संस्था आहे?
करून पाहूयात –
१) ईशान्येकडील राज्यांची सूची तयार करा. तेथील राज्यांच्या राजधानीची शहरे कोणती?
२) संघराज्य शासनपद्धतीनुसार अधिकाराची विभागणी कशाप्रकारे केली आहे याची सूची
खालील तक्त्यात तयार करा.
या प्रश्नांची उत्तरे शोधू –
प्रश्न १ : संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा
प्रश्न २ : निवडणुका घेणारी यंत्रणा
प्रश्न ३ : दोन सूचींव्यतिरिक्त असलेली सूची
प्रश्न ४ : सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
प्रश्न ५ : न्यायाधीशांची नेमणूक कोण करते?
अधिक सराव करू –
१) ७वी चे नागरिकशास्त्र विषयाचे पाठ्यपुस्तकातील यामध्ये दिलेला कृती व स्वाध्याय सोडवा.
२) आचारसंहितेविषयी माहिती मिळवा. व लिहा.