गोड शिक्षा , god shiksha , marathi goshti , goshti
सारसपूर राज्याचा राजा हा एक उदारमतवादी आणि विद्वान राजा होता. त्याला लोक देवाचा अवतार मानत. पण त्याच्या राजधानीत एक असा माणूस होता, जो प्रत्येक वेळी राजावर टीका करत असे. हे माहीत असूनही राजा शांतच राहिला होता. पण या माणसाचा उपद्रव वाढतच गेला.
एक दिवस राजाने त्याबद्दल गहन विचार केला. मग त्याने आपला एक नोकर त्या माणसाकडे पाठविला. त्याच्यासोबत एका बैलगाडीवर गव्हाची गोणी, साबण, गुळ असे सामानही पाठविले.
या गोष्टी पाहून त्या मनुष्याला खूपच गर्व वाटला. राजा त्याला घाबरला असल्याने त्याने या गोष्टी पाठविल्या आहेत, असे त्याला वाटले. घरात ते सामान ठेवून तो गर्वाने राजगुरूंकडे गेला. संपूर्ण हकीकत त्यांना सांगून तो म्हणाला, “गुरुदेव ! हे पहा, राजा मला घाबरला असल्याने त्याने या गोष्टी पाठविल्या आहेत. “
आपणास ही गोष्ट देखील आवडेल
मोठ्या पदासाठी योग्यता
राजगुरु म्हणाले, “हा तुझा गैरसमज आहे! अरे, राजाने या भेटवस्तूंद्वारे तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, तू नेहमी निंदा करीत असतोस, पण, कधीकधी चांगल्या गोष्टी देखील करत जा. राजाने पाठविलेला गहू तुझ्या रिकाम्या पोटासाठी आहे. साबण हा तुझ्या शरीराची घाण स्वच्छ करण्यासाठी आहे, आणि हा गुळ तुझ्या कडू वाणीस गोड करविण्यासाठी दिला आहे. “
तात्पर्य : इतरांची सतत निंदा ना करता त्यांच्यातील चांगल्या गोष्टीही पहाव्यात