लक्ष केंद्रित करा, bodhpar goshti in marathi
स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते तेव्हाची गोष्ट. एकदा ते भ्रमण करीत एका पुलावर पोहोचले. पुलावर काही मुलेही उभी होती. ती नदीमध्ये तरंगत असलेल्या चेंडूंवर बंदुकीने नेम धरून नेमबाजीचा सराव करीत होती. पण, कोणताही मुलगा एकही लक्ष्य भेदू शकला नाही. हे पाहून स्वामी विवेकानंदांनी एका मुलाकडून बंदूक घेतली आणि स्वतः नेम धरून गोळ्या मारणे सुरु केले.
त्यांनी पहिला निशाणा लावला आणि तो अगदीच अचूक बसला, मग एकामागोमाग एक अशा १२ गोळ्या झाडल्या. त्या सर्वच अचूकपणे चेंडूंना लागल्या. हे बघून मुले आश्चर्यचकित झाली. त्यांनी विचारले, “स्वामीजी, तुम्ही इतके अचूकपणे नेम कसे काय मारले?”
आपणास ही गोष्ट देखील आवडेल
खरे जीवनमूल्य
स्वामी विवेकानंद म्हणाले, “यात अशक्य असे काहीच नाही. मन विचलित होऊ देऊ नका. तुमचे पूर्ण लक्ष फक्त तुमच्या लक्ष्यावर असणे आवश्यक आहे. “
तात्पर्य : आपले लक्ष फक्त लक्ष्यावर केंद्रित करा. मग यश तुमचेच आहे.