प्रामाणिकपणा | pramanik pana marathi goshti
देवपूर गावात रामराव नावाचा गावचा पाटील होता. वृद्धापकाळामुळे त्याचे निधन झाले. त्याला कोणीही वारस नसल्याने दुसरी त्याच्याच सारखी विश्वासू व्यक्ती पाटील निवडावी लागणार होती.त्या भागाच्या जमीनदाराने दिवाणजींच्यामार्फत गावच्या पाटील पदावर भरती करण्याकरिता गावात दवंडी पिटविली व अशी घोषणा केली की, ज्यांना या पदावर नियुक्त व्हायची इच्छा आहे, अशा उमेदवारांनी जमीनदार साहेबांच्या खजिनदारांना प्रथम भेटावे.
त्यानुसार, अनेक उमेदवार येऊन खजिनदाराला भेटले. खजिनदाराने त्यांच्याशी वेगळ्या तऱ्हेने बोलणे केले व त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी जमीनदार साहेबांच्या इथे येण्यास सांगितले.
खजिनदाराने जो उमेदवार निवडला त्याचे नाव देवराम होते. पण यामुळे बाकीच्या नऊ जणांनी नापसंती दर्शवत म्हटले, “मालक, हा तर खरोखरच अन्याय आहे. आम्हाला ही नोकरी देण्याचे वचन देऊन या खजिनदाराने प्रत्येकाकडून एक हजार रुपये लाच घेतली. “
यावर जमीनदार मध्येच म्हणाले,
“मीच तशी परीक्षा घेतली. तुमच्यामध्ये विश्वासूपणा नाही. या पदावर तुमच्यासारख्या लाच देणाऱ्या लोकांना नियुक्त केले तर काय खात्री की, पद मिळाल्यानंतर तुम्ही लाच घेणार नाहीत. लाच देण्यास देवरामने नकार दिला. त्यामुळे या पदावर देवराम हाच एक योग्य माणूस आहे. “
आपणास ही गोष्ट देखील आवडेल
संताची थोरवी
तात्पर्य : प्रामाणिकपणा हा अधिकारपदावरील व्यक्तीचा एक आवश्यक गुण आहे.