♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ ५ वी आजचा सेतू अभ्यास दिवस 35

इ ५ वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 35

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास

कृतिपत्रिका : 19

समजून घेऊया :

शिकण्याचा समान अधिकार

संदर्भ: इयत्ता चौथी, प्रकरण-19, माझी आनंददायी शाळा

अध्ययन निष्पत्ती : गटात एकत्र काम करत असताना एकमेकांविषयी आस्था, समानानुभूती व नेतृत्वगुण या बाबींमध्ये पुढाकार घेतात व सक्रिय सहभाग घेतात. उदा. वर्गातील (Indoor) / वर्गाबाहेरील (Outdoor) / स्थानिक / समकालीन उपक्रम आणि खेळ समजून घेतात, भोवतालच्या वस्तू / वडीलधारे / दिव्यांग यांच्यासाठी प्रकल्प करणे / भूमिका करतात.

लक्षात घेऊया :

तुम्ही सर्वजण शाळेत जाता, शाळेत आपण शिकण्यासाठी येतो. मित्रमैत्रिणी मिळवतो, एकमेकांच्या मदतीने अभ्यास करतो, खेळ खेळतो, डबा खाती, सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतो, सहलीला जातो. अशा अनेक गोष्टी आपण एकत्र करत असतो. वर्गातील प्रत्येक मुलामुलीला शिकण्यातील मजा घेता आली पाहिजे.

शाळेत वेगवेगळी मुलेमुली भेटतात. आपल्यापैकी काहींना दिसत नाही, ऐकू येत नाही, काहींना सहजपणे चालता येत नाही. या वर्गातील मित्रमैत्रिणींच्या गरजा आपल्यापेक्षा वेगळ्या आणि विशेष असतात. त्यांच्या सहवासातूनच आपल्याला त्या समजतात.

विशेष गरजा असलेल्या सर्वांनाच शिकण्याचा अधिकार आहे. शासन या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवते. आपण अशा मुलांना शाळेत जाण्यास प्रोत्साहन द्यावे. खालील चित्राचे निरीक्षण केल्यास तुम्हांला लक्षात येईल की वर्गातील शिक्षण हे सर्वाना समान असते.

दुसरीकडे मुलींचे शिक्षण पण एक समस्या आहे. शासन मुलींच्या शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध करते. मात्र घरी भावंडाना सांभाळणे, पाणी भरणे, घरकाम करणे ही कामे बहुतांश मुलींवर सोपवली जातात. त्यामुळे त्यांचे शिक्षण रखडते, बंद पडते. त्यामुळे मुलींनाही शिक्षणाचा आनंद मिळाला पाहिजे.

सराव करू या :

प्र. 1) वाक्यातील अयोग्य पर्याय खोडा.

अ) एकमेकांना मदत / वाद केल्याने कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते. ब) शाळेत आपल्याला वेगवेगळी / एकसारखी मुले-मुली भेटतात.

प्र. 2) विशेष गरजा असलेली मुले-मुली तुम्हास भेटली, तर तुम्ही काय कराल, ते लिहा.

I प्र. 3) विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी कोणत्या योजना / सुविधा शासन पुरवते? शिक्षकांशी चर्चा करून लिहा.

प्र. 4) मुलींचे शिक्षण कोण-कोणत्या कारणाने रखडते?

प्र. 5) ‘शिकण्याचा समान अधिकार’ ह्यावर घोषवाक्य बनवा. वर्गात ही घोषवाक्ये भिंतीवर चिकटवा.

प्र. 6) तुमच्या वर्गात दुसऱ्या गावाहून आलेल्या एका मुलाने नव्याने प्रवेश घेतला आहे. त्याला त्याच्या आधीच्या शाळेविषयी माहिती विचारा. शिक्षकांना लिहून पाठवा.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी