इ 5 वी सेतू अभ्यास दिवस 17
विषय – मराठी
क्रियापदाचा लेखनात वापर
खालील चित्रात मुलगी काय करत आहे ?

उत्तर मुलगी हसत आहे
क्रियापद – हसत आहे .
या प्रामाणिक खालील चित्रातील क्रियापदे वहीत लिहा

वाक्यात कोणती क्रिया केली आहे हे आपल्याला क्रियापदामुळे कळते पण त्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो हे महत्त्वाचे. 1) ज्या शब्दामुळे केलेली क्रिया तर कळतेच पण वाक्याचा अर्थही पूर्ण होतो त्याला वाक्याचे क्रियापद म्हणतात.’ 2) वाक्याचा अर्थ पूर्ण करणे क्रियापदाचे मुख्य काम आहे, वाक्यात त्याची जागा कुठे आहे ही गोष्ट महत्त्वाची नसते .
3) याच वाक्यात क्रियापद शेवटी येते पण काही अशी वाक्ये सांगतील की त्या वाक्यात क्रियापद मध्यभागी कुठेही आले आहे. (उदा. १) इंद्रनील मला तुझा पेन देतोस का थोडावेळ ? २) आणाल का औषधे घरी येताना ? )
4) काही वाक्यात दोन क्रियापदे असतात पण वाक्याचा अर्थ एका क्रियापदानेच पूर्ण होतो म्हणून असे क्रियापद मुख्य क्रियापद मानले जाते. (उदा. राहुलने झाडाचे आंबे तोडून सर्वांना वाटले. या वाक्यात तोडून व वाटले ही दोन क्रियापदे आहेत पण वाटले या क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला आहे म्हणून वाटले हे क्रियापद आहे.) मुख्य
5) क्रियापदांचा वाक्यांमध्ये वापर होत असताना मूळ क्रियापदाची वेगवेगळी रूपे वापरली जातात. (उदाहरणार्थ :-उठणे हे क्रियापद आहे याचा वाक्यात वापर होत असताना आम्ही पहाटे उठतो, राम खुर्चीवरून उठला, शबाना उठून उभी राहिली. अशी वेगवेगळी रूपे वापरली जातात याला क्रियापदांची रूपे व अशा वापराला क्रियापद चालवणे असे म्हणतात उठणे हे या वरील सर्व वाक्यातील क्रियापदाचे मूळरूप आहे.

विषय – गणित

खालील गुणाकाराची उभी मांडणी पद्धत समजावून घ्या व आपल्या वहीत लिहा


विषय – इंग्रजी
Template No -17
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत
What’s your favourite dish? तुमचा आवडता पदार्थ कोणता ?
Ans:-……………………………….
Who is your favourite player? तुमचा आवडता खेळाडू कोण ?
Ans:-………………………
Which song do you like to sing?तुम्हाला कोणते गाणे गायला आवडते
Ans:-………………………
खालील प्रश्न तुमच्या मित्राला / मैत्रिणीला विचारून उत्तरे लिहा


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
हा पाठयांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग -२) या पाठ्यपुस्तकात पान क्र. ५५ वर आहे.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१) तानाजी मालुसरे यांचे गाव कोणते?
२) आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे असे कोण म्हणाले ?
कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार कोण होता?
३) गड आला, पण सिंह गेला:
4) तानाजीच्या भावाचे नाव काय होते?
5) सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला?
6) शिवराय हळहळून काय म्हणाले?
उपक्रम – तुझ्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची यादी कर.
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा