महिला दिन  साजरा का केला  जातो ? ।  Women’s Day all information 2022 

महिला दिन  साजरा का केला  जातो ? ।  Women’s Day all information 2022 Women’s Day 2022 : 8 मार्च हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी महिलांच्या सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा सन्मान  म्हणून  हा  उत्सव, साजरा केला जातो. women’s day information in marathi 

8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात महिला दिन Women’s Day साजरा  म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. जागतिक महिला दिन साजरा करण्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे व त्याला एक विशेष असा इतिहास देखील  आहे.  काय आहे हा  जागतिक महिला दिना साजरा   करण्या मागचा  इतिहास ?  व जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी का साजरा केला जातो  ?  [ महिला दिवस कब मनाया जाता है और क्यों ] या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या  पोस्ट  मध्ये मिळणार आहेत तेव्हा ही पोस्ट संपूर्ण वाचा. women’s day speech ,women’s day anchoring script in marathi

     जगभरातील स्त्रियांना  विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता  मग ते युरोप किंवा  अमेरिका.  स्त्रियांना मतदान करता येत  नव्हते .आपल्याला देखील मतदानाचा हक्क मिळावा यासाठी देशभरातील स्त्रिया आपल्या आपल्या पद्धतीने आंदोलन संघर्ष करत होत्या .याच दरम्यान  सन 1890 मध्ये अमेरिकेत `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’  स्त्रियांना  मतदानाचा हक्क मिळावा म्हणून ही संघटना स्थापन झाली 

 काय आहे महिला दिनाचा इतिहास :

न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात एकत्र आल्या व त्यांनी काही मागण्या केल्या त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे  होत्या . 

  • महिला कामगारांना देखील कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी
  •   महिला कामगारांचे कामाचे तास  दहा तासांची  असावे  जास्त असू नये . 

  या प्रमुख मागण्या करण्यात आल्या तसेच या मागण्या बरोबर स्त्रियांना देखील मतदानाचा हक्क मिळावा त्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये अशा देखील मागण्या या अमेरिकन कामगार स्त्रियांनी करण्यात आल्या होत्या . 

अमेरिकेतील स्त्रियांनी हे जे आंदोलन केलं होतं ती तारीख होती 8 मार्च 1908 . अमेरिकेतील स्त्रियांच्या या आंदोलनाने व स्त्रियांनी  स्वतःच्या हक्कासाठी  घेतलेला पुढाकार पाहून  क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित  झाली . 

 पहिला महिला दिन कधी साजरा करण्यात आला ?

दिनांक 28 फेब्रुवारी 1909 ला न्यूयॉर्क मध्ये पहिला महिला दिन साजरा करण्यात आला 

 1910 साली अमेरिकेतील  कोपनहेगन  या ठिकाणी दुसरी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद  घेण्यात आली होती .  या महिला परिषदेमध्ये 8 मार्च 1908  रोजी स्त्री कामगारांनी केलेल्या इतिहासिक आंदोलन  व आपल्या हक्कासाठी  घेतलेला पुढाकार  यांच्या स्मरणार्थ 8 मार्च  हा दिवस  जागतिक महिला  दिन  Women’s Day म्हणून साजरा केला जावा असा ठराव मांडण्यात आला व तो  पास  देखील झाला . 

  म्हणून संपूर्ण जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. एक महिला ही अनेक भूमिका बजावत असते कधी ती आई असते कधी ती पत्नी असते कधी ती घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी गृहिणी असते अशा स्त्रीचा ,  समाजातील प्रत्येक महिलेचा सन्मान  नेहमीच केला  पाहिजे . 

जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो? 

जागतिक महिला दिन दर वर्षी 8 मार्च रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.

 भारतातील  महिला दिन 

  जागतिक महिला दिन हा भारतामध्ये सर्व प्रथम 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला .  8 मार्च 1971 रोजी पुण्यामध्ये   महिलांचा मोठा मोर्चा काढण्यात आला.  तसेच जागतिक संघटना यूनो  यांनी देखील  1975 हे वर्ष ‘जागतिक महिला वर्ष’  म्हणून जाहीर केले होते  

 एकविसाव्या शतकातील महिला दिन happy women’s day 2022 date             

   आज आपण 21 व्या शतकामध्ये आहोत .  आज संपूर्ण जगभरात महिला दिन अतिशय उत्साहात साजरा केला जातो .  आज महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत .  आधुनिक काळाबरोबर महिलादेखील उच्चशिक्षित झालेल्या आहेत.  महिलांमध्ये असणाऱ्या शिक्षणाच्या    प्रसारामुळे  महिलांना त्यांच्या हक्काची अधिकारांची  माहिती देखील आहे .  8 मार्च हा दिवस संपूर्ण क्षेत्रामध्ये  महिला दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. women’s day in marathi

 जागतिक महिला दिन २०२२ ची थीम काय आहे ?

Ans. या वर्षासाठीच्या ‘जागतिक महिला दिन 2022 ची थीम मराठी मध्ये ही आहे, “Gender equality today for a sustainable tomorrow” म्हणजेच “येणाऱ्या उज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता”

          अगदी लहान मुलीपासून  गृहिणी  ते  उच्च पद भूषविणाऱ्या सर्व महिलांना  जागतिक महिला दिनाच्या  हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

 मित्रानो तुम्हाला माहिती  नक्कीच   आवडली असेल तर  मग लगेचच आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर या माहितीची लिंक शेअर करा . 

आपणास हे देखील आवडेल 

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती

का केला जातो मदर्स डे साजरा ?

 येथे क्लिक करा 

सुंदर हस्ताक्षर सराव 

 येथे क्लिक करा