♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस सोळा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस सोळा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊया

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील उताऱ्यांचे वाचन करण्यास सांगावे व उताराच्या अनुषंगाने गटात चर्चा करण्यास सांगून पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्याकडून सोडून घ्यावी व त्यांच्या संकल्पना जाणून

घ्याव्या.

शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. अतुल, नयना, जॉन व सिमरन रोज तेथे थोडावेळ थांबायचे. सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे. त्याच्या हालचाली त्यांचे मन मोहून टाकायच्या. ‘कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध.” असे नयना नेहमी म्हणायची. तिला त्याच्या कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेपणा आवडायचा. जॉनला त्याची चिकाटी तर अतुलला त्याची कष्टाळूवृत्ती भावून जायची. सिमरनला वाटायचे, किती मेहनती आहे हा पक्षी ! आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो. त्यासाठी अपार मेहनत घेतो. खरंच खूपच जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे हा !”

1. वरील परिच्छेदात आलेल्या मुला मुलींची नावे.

2. वरील परिच्छेदात वर्णन केलेल्या सुगरण पक्षाचे विशेष गुण.

जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात. उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, तर शिकार होणारे प्राणी- जसे हरिण, सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात.

वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे, शिकार करण्याची पद्धत, विष्ठा व झाडा-झुडपांवरील त्यांच्या नख्यांच्या खुणा, दातांच्या खुणा, त्यांचे विविध आवाज यांवरून त्यांची आपल्याला ओळख होते. ही एक प्रकारची अरण्यलिपीच होय.

जंगलवाचनाचा आपल्याला छंद लागला, की डोळ्यांनी, कानांनी, नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो. प्राण्यांचे आवाज, पायांचे ठसे, वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात. ओढा, नदीकाठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओहळ, झाडेझुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते. कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही, कारण जंगलवाचनाचा अनुभव आपल्याला नवीनवी माहिती आणि वेगळ्याच स्वरूपाचा आनंद मिळवून देतो.

1. परिच्छेदात आलेल्या प्राण्यांची नावे.

2. प्राण्यांच्या जगाशी एकरूप करणारे घटक.

सराव करूया.

1. जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात?

2. तुमच्या घरी व शेजारी असलेल्या प्राण्यांच्या कृतीचे व आवाजाचे निरीक्षण करून तुमचे अनुभव लिहा.

+ कल्पक होऊया.

• तुमच्या परिसरातील पाच प्राण्यांच्या पावलांचे किंवा पावलांच्या ठशांचे निरीक्षण करा व ते प्राणी तुम्ही कसे ओळखले ते मित्रांना सांगा

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

4. Solved Activity/ Demo:

1) Make 4-5 groups of students and allot them a picture from the above pictures given.

2) Ask them to observe the pictures carefully and discuss on, where you see these pictures and what message is given on them and make a note of it in their books.

3) Also ask students to use Dictionary wherever required.

5. Practice:

1) Teacher-Please observe the pictures carefully and discuss where you see these messages or Notices? – Students- Roadside, Schools, Offices, Public places, Parks, Hospitals, Hotels, on goods transports vehicles etc…….

2) Teacher-now discuss the purpose of these messages?

Students- For giving information, Advertising the products, for customers information etc… 3) Teacher- Now Observe the given picture carefully and understand what message is given in the picture(Teacher gives different pictures to each group, Then asks them to circulate the pictures to cach group)

4) Teacher-One representative from each group will come in front and describe the picture and the message given

6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

1.Teachers can play a Matching activity to check students understanding (Pair work/Solo) about the places they see these notices

2. Teacher can ask students to collect or draw out the notices/Messages they come across; also they can collect news paper cut-outs about the chosen/given topics. 3) Prepare few Notices or Signs that could be useful for other students in the school.

विषय -विज्ञान 

कृतिपत्रिका : 16

समजून घेऊ या : नैसर्गिक बदल, उपयुक्त व हानिकारक बदल, शीघ्र व सावकाश बदल, परिवर्तनीय व अपरिवर्तनीय बदल, आवर्ती व अनावर्ती बदल, भौतिक व रासायनिक

संदर्भ: इयत्ता 7 वी – प्रकरण 13 – बदल: भौतिक व रासायनिक

अध्ययन निष्पत्तीः गुणधर्म, लक्षणांच्या आधारे पदार्थ व सजीवांचे वर्गीकरण करतात उदाहरणार्थ वनस्पतीजन्य व प्राणीजन्य तंतू, भौतिक व रासायनिक बदल इत्यादी