♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस सोळा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस सोळा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

कृती१- शब्द, म्हणी व वाक्प्रचार यांची यादी करून वाचन करणे.

कार्यपद्धती प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकातील पाठाचे वाटप करून त्यातील नवीन शब्द, म्हणी व वाक्प्रचार याची यादी तयार करण्यास सांगावे. त्यांचे अर्थ लिहून प्रकट वाचन घ्यावे.

+ सक्षम बनू या

कृती- शब्दकोश बनवून शब्दकोशातील शब्दांचे अर्थ शोधून लिहिणे व त्याचे वाचन घेणे. कार्यपद्धती विद्यार्थ्याने लेखन केलेले शब्द आकारविल्हे यानुसार त्याची मांडणी करून घ्यावी व नवीन शब्दांचा शब्दकोश तयार करावा. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शब्दकोशातील शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना शब्दकोश व इतर साहित्य उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थी स्वतः त्याचे अर्थ शोधून ते शब्दकोशामध्ये लिहितील व त्याचे वाचन करतील. यावेळी शिक्षकांनी सुलभन करावे..

+ सराव करू या

कृती शब्दकोशातील शब्दांचे, म्हणींचे व वाक्प्रचाराचे अर्थासह गटात प्रकटवाचन घेणे. कार्यपद्धती शब्दकोशातील कठीण शब्दांचे प्रकटवाचन करून दाखवावे. वाक्प्रचार व म्हणी यांचे योग्य वाचन कसे करते करतात हे उदाहरणासह मांडावे. यानंतर वर्गातील उत्तम वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शब्द, म्हणी व वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ यांचे प्रकट वाचन करण्याची संधी द्यावी. त्यानंतर हळूहळू उर्वरित सर्वच विद्यार्थ्यांचे प्रकट वाचन घ्यावे. वाक्प्रचारांचे वाचन घेत असताना विद्यार्थ्यांना त्याचा वाक्यात उपयोग करायला सांगून अर्थाचे आकलान तपासावे.

कल्पक होऊ या

कृती शब्द, म्हणी, वाक्प्रचार यांच्या आधारे गोष्ट लिहून, वाचून दाखविणे. कार्यपद्धती – ही कृती गटात घ्यावी. गटातील इतर सदस्याने विद्यार्थ्यांना निवडक शब्द, म्हणी द्यावेत. विद्यार्थी त्या आधारे गोष्ट लिहून घ्यावी. गटात तिचे वाचन करून घ्यावे.

उदा. खालील म्हणींवर आधारित गोष्ट लिहा व तिचे प्रकट वाचन करा.

१. अति तेथे माती.

२. पळसाला पाने तीनच.

३. काखेत कळसा गावाला वळसा.

 विषय –  गणित 

थोडं समजून घेऊ

2 ने विभाज्यतेची कसोटी : संख्येच्या एककस्थानी 0,2,4,6,8 यांपैकी कोणताही अंक असेल, तर ती संख्या 2 ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 2 ने भाग जातो.

15 ने विभाज्यतेची कसोटी : संख्येच्या एककस्थानी 0,5 यांपैकी कोणताही अंक असेल, तर ती संख्या 5 ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 5 ने भाग जातो.

10 ने विभाज्यतेची कसोटी: संख्येच्या एककस्थानी 0 असेल, तर ती संख्या 10 ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 10 ने

भाग जातो.

3 ची विभाज्यतेची कसोटी: जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 3 ने विभाज्य असते. उदा. 924, 315, 849, 255.

4 ची विभाज्यतेची कसोटी : जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 4 ने विभाज्य असते. उदा. 756, 924, 212, 848, 252.

9 ची विभाज्यतेची कसोटी: जर कोणत्याही संख्येमधील अंकांच्या बेरजेला 9 ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 9 ने विभाज्य असते.

उदा. 756, 324, 252, 828, 999.

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान

कृतिपत्रिका : 16

समजून घेऊ या : विश्व म्हणजे काय ?, दीर्घिका व तारे संदर्भ : इयत्ता सहावी प्रकरण 16- विश्वाचे अंतरंग

अध्ययन निष्पत्ती :

1) विश्वातील विविध घटक जसे तारे, ग्रह उपग्रह यांचे निरीक्षण करून त्यांचा तुलनात्मक अभ्यास करतात. 2) इंटरनेट, माहिती संप्रेषणाची विविध साधने व तंत्रे वापरून विविध संकल्पना, प्रक्रिया यांची माहिती घेतात.

सराव करु या.

1) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

a) आपली सूर्यमाला कोणत्या दीर्घिकेत आहे?

(b) आकाशगंगा या दीर्घिकेचे दुसरे नाव कोणते आहे?

c) दीर्घिकांचे किती व कोणते प्रकार आहेत ते लिहा.

2) काळोख्या रात्री आकाश निरीक्षण करा. आकाशात तारे व ग्रह यांचे निरीक्षण करा. कोणकोणत्या रंगांचे तारे तुम्हाला पाहायला मिळाले? त्याची वहीत नोंद करा.

3) काळोख्या रात्री निरभ्र आकाशाचे चित्र काढा.

4) निरभ्र अंधाऱ्या रात्री उत्तर दिशेला असणारा ध्रुवतारा कसा ओळखाल?

5) मोठ्या व्यक्तींकडून (आजी, आजोबा) ताऱ्यांच्या, ग्रहांच्या गोष्टी ऐका. 6) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत ?

ब) सूर्यमालेतील अंतर्गत ग्रहांची नावे लिहा.

क) सूर्यमालेत केंद्रस्थानी असलेल्या ताऱ्याचे नाव लिहा.

7) सूर्यमालेतील खालील ग्रहांचा योग्य क्रम लावा. (पृथ्वी, मंगळ, नेपच्यून, बुध, शनी, युरेनस, गुरु, शुक्र )