पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस सोळा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या
• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील कवितेच्या ओळी वाचण्यास सांगावे व कवितेवर आधारित प्रश्न
विचारावेत.
सूर्य रोज रंगवितो आभाळाची कोरी पाटी निसर्ग राजा तुझ्या दप्तरात किती मोठी रंगपेटी!
उष्ण सोनेरी पोशाख हया सूर्याच्या अंगात उगवतो, मावळतो.
लाल केशरी रंगात बहु रंगांच्या चित्रांची, तुझ्या वहीवर दाटी।।
सुर्यफूलाच्या पिकाला रंग देतोस पिवळा
काळ्या शिवारी फुलवी शुभ कपाशीचा मळा
पिकांवर शिंपतो तू रंग हिरवा पोपटी ।।
मोठ्या रंगीत खडूने रंगवितो आभाळाला
रात्रीसाठी काळा रंग सांग किती तु आणला?
सप्तरंग हे तूच दिले इंद्रधनुष्यासाठी ।।
नमुनाप्रश्न :- १) कवितेमध्ये किती रंगांचा उल्लेख आला आहे? कोणते ?
२) निसर्गात रंगीबेरंगी अनेक गोष्टी आढळतात हे कवितेतील कोणत्या ओळीवरून समजते?
३) उष्ण सोनेरी पोशाख कोणी घातला आहे?
४) मोठी रंगपेटी कोणाच्या दप्तरात आहे?
५) इंद्रधनुतील सप्तरंगाची नावे सांगा.
वरीलप्रमाणे अजून प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादावरून कविता कितपत समजली हे जाणून घ्यावे.
+ सक्षम बनू या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कवितेचा भावार्थ समजून घेऊन कवितेचे आकलन कसे होते हे समजावून सांगावे. कवितेचा भावार्थ समजून घेणे, अपरिचित शब्दांचा अर्थ शोधणे, कवितेतील मुख्य कल्पना समजणे इ.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान
कृतिपत्रिका : 16
समजून घेऊ या : आपल्या गरजा आणि पर्यावरण, जैवविविधता संदर्भ : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 18 (पर्यावरण आणि आपण)
अध्ययन निष्पत्ती : प्राणी, वनस्पती व मानव यांच्यातील परस्परावलंबित्वाचे वर्णन करतात.
लक्षात घेऊ या : मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा आणि इतर आवश्यक साधने या पर्यावरणातील
पदार्थ वापरूनच पूर्ण होत आहेत. अतिवापर आणि साठवून ठेवण्याच्या सवयींमुळे पर्यावरणाचा वेगाने हास होत आहे. आपल्याला खालील गरजांचा एका सप्ताहसाठी किती साठा असावा? चर्चा करा.
सराव करू या :
1. पर्यावरण संतुलनावर विपरीत परिणाम झाला आहे असे मानवाने निसर्गात केलेले हस्तक्षेप कोणते ते शोधा. अ. वृक्ष तोड ब. सौर उर्जेचा वापर क. वन्यप्राण्यांची शिकार ड. नद्यांवर धरणे बांधणे
इ. राखीव वनक्षेत्राची निर्मिती फ. वाहनांचा वापर ग. पर्यावरण शिक्षण ह. वन्यजीव संरक्षक कायदे
2. पर्यावरण संरक्षणासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत?
3. पर्यावरणाचा -हास थांबवण्यासाठी तुम्ही कोणत्या कृती टाळाल? थोडक्यात लिहा.
4. चित्रात दाखवलेला प्राणी कोणता आहे? सध्या हा नामशेष झाला आहे. याचे कारण काय असावे असे तुम्हाला
वाटते?
विषय – परिसर अभ्यास 1
अध्ययन अनुभव / कृती- इयत्ता : पाचवी, विषय : परिसर अभ्यास १, प्रकरण : पृथ्वीचे फिरणे, घटक – पृथ्वीचे परिवलन
काय समजले? – वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१. पृथ्वी आपल्या परिवलन काळात कोणाभोवती फिरते?
२. विषुववृत्तामुळे कोणते दोन गोलार्ध तयार होतात?
३. उत्तर ध्रुव कोणत्या गोलार्धात आहे?
४. विषुववृत्तामूळे होणारे गोलार्ध जगाच्या नकाशात दाखवा..
अधिक सराव –
१. एका चेंडूवर विषुववृत्त दर्शविणारे वर्तुळ काढा व तयार होणाऱ्या गोलार्धना अचूक नावे द्या.
२. पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सांगा.
३. पृथ्वी स्वत:भोवती किती तासात एक फेरी पूर्ण करते?