पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस आठवा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस आठवा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

कृती १ – योग्य गतीने, आरोह-अवरोह व विरामचिन्हे यांची दखल घेऊन वेळेत गोष्टीचे प्रकटवाचन करणे. कार्यपद्धती – एका गोष्टीचे प्रकट वाचन करावे. ही गोष्ट वाचताना, आवाजातील बदल म्हणजेच चढ-उतार ठेवणे, विरामचिन्ह यांच्या जागी थांबणे, चेहन्यावरील हावभाव बदलणे या क्रिया करून घ्याव्यात. पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, अवतरण चिन्ह या विरामचिन्हांचा अर्थ लक्षात आणून द्यावा. तसेच पुस्तक कसे धरावे, डोळे आणि पुस्तक यातील अंतर किती असावेहे कृतीतून दाखवावे. तसेच दृष्टीचा आवाका म्हणजे एका दृष्टिक्षेपात किती शब्द वाचले जावेत तसेच वाचताना आकलनासाठी एकाग्रता कशी महत्त्वाची आहे हे स्पष्ट करावे. वाचनाचा वेग ४० ते ८०शब्द प्रतिमिनिट हळूहळू कसा वाढवावा हे सांगावे. मजकुराचे आकलन झाले की वाचन वेग वाढतो. याच वेळी गोष्टीवर आधारित प्रश्न कसे तयार करावे आणि कसे विचारावे. याचेही प्रात्यक्षिक दाखवावे.

+ सक्षम बनू या

कृती – गटात सहावीच्या पाठ्यपुस्तकातील निवडक उताऱ्यांचे प्रकटवाचन करून प्रश्न निर्मिती करणे. – कार्यपद्धती – किमान पाच विद्यार्थ्यांचा एक गट तयार करावा. पाठ्यपुस्तकातील वीस ओळी असलेले उतारे निश्चित करून विद्यार्थ्यांना त्याचे प्रकट वाचन करावयास लावावे. एका विद्यार्थ्याचे प्रकट वाचन चालू असताना बाकीचे विद्यार्थी ऐकतील आणि उतारा वाचनानंतर त्याने कसे वाचले? यावर चर्चा करण्यास सांगावे. ही चर्चा आरोह-अवरोह आणि विराम चिन्हाचा अर्थ लक्षात घेऊन वाचन यावर आधारित असावी.

त्याच गटातील मुले प्रश्न तयार करण्यास सांगावे व त्यावर चर्चा घडून आणावी. मुलांना बहुपर्यायी प्रश्न तयार करण्यास सांगावे. गटातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रकट वाचन होईपर्यंत ही कृती चालू ठेवावी.

+ सराव करू या

कृती – अपूर्ण गोष्टीचे प्रकटवाचन करून गोष्ट पूर्ण करणे. कार्यपद्धती गोष्टीच्या बैंक मधील निवडक गोष्टी विद्यार्थ्यांसमोर ठेवाव्यात. त्यातील गोष्टीचे मध्यापर्यंत प्रकटवाचन करावयास लावावे. योग्य ठिकाणी त्याचे वाचन थांबवून त्याला गोष्ट पूर्ण करण्यास सांगावी. गोष्टीचे लेखन करून घ्यावे तसेच लिहिलेल्या गोष्टीचे आरोह अवरोहासहित वाचन घ्यावे.

+ कल्पक होऊ या

कृती – पत्रे, रोजनिशी, अभंग, यांचे प्रकट वाचन करणे. कार्यपद्धती -परिसरातील ज्येष्ठ व्यक्ती व आंतरजालाचा वापर करून काही रोजनिशी, पत्रे, अभंग याचे संकलन करून घ्यावे. यांचे प्रकट वाचन विद्यार्थ्याकडून जोडीत करून घ्यावे. प्रकटवाचनानंतर दोघांमध्ये चर्चा करण्यास सांगावी. वाचन करताना आरोह अवरोह व गती बाबत आपल्या जोडीदाराचे निरीक्षण करण्यास सांगावे. या कृतीत विद्यार्थी एकमेकांचे मूल्यमापन करता करता स्वयंमूल्यमापनही करतील याकडे लक्ष द्यावे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

b) What was the wild boar doing one day?

 c) How did the fox tease the wild boar? 

d) Why was the wild boar sharpening its tusks? 

e) What does the story tell us?

B) Look at the following pictures carefully. Read the sentences. Match the sentences with the pictures.

विषय -विज्ञान

कृतिपत्रिका : 08

समजुन घेऊ या : अस्थिसंथा व्याख्या, हाडांचे प्रकार.

संदर्भ : इयत्ता सहावी प्रकरण 8. आपली अस्थिसंस्था व त्वचा

अध्ययन निष्पत्ती : जीव आणि विविध प्रक्रिया यांची नामनिर्देशित आकृती / प्रवाह तक्ते काढतात. उदा. फुलांचे भाग, सांधे, गाळण प्रक्रिया, जलचक्र ई.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

पहिले काही बाबी आठवूयात:

१) वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली?

२) गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे त्याद्वारे कोणती मुल्ये प्रकट होतात?

३) खिचन धर्माची शिकवण काय सांगते?

४) इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते ?

५) इस्लाम धर्माचा कोणता ग्रंथ प्रसिद्ध आहे?

करून पाहूयात :

१) भक्ती चळवळीच्या माध्यमातून धार्मिक समन्वयासाठी कोण कोणत्या संतांनी समाजाला उपदेश केले ते

शोध ?

१) महाराष्ट्रातील संत एकनाथांनी धार्मिक समन्वयासाठी कोणते प्रयत्न केले ते सांगा.

उत्तर:…………………

२) संत बसवेश्वरांचा कार्याचा धार्मिक समन्वयासाठी समाजावर कोणता परिणाम झाला?

उत्तर:…………………

३) संत कबीर यांनी हिंदू व मुस्लीमांचे ऐक्य साधण्यासाठी कोणते प्रयत्न केले?

उत्तर:…………………

४) चक्रधर स्वामींनी कोणता पंथ प्रवर्तित केला ?व समाजाला धार्मिक समन्वयासाठी कोणते उपदेश केले ?

उत्तर:…………………

काय समजले?

२) वरील कृती केल्यावर तुला पाठ क्र. रा ३ . धार्मिक समन्वय संदर्भात काय समजले. ते थोडक्यात लिहा ?

उत्तर:…………………

 विषय –  भूगोल